आजचा सुधारक, जानेवारी २००० मधील नंदा खरे यांचा ‘एका आमंत्रणपत्रिकेचा पंचनामा’ हा लेख परत परत वाचला. इथे कै. मृणालिनी देसाई, या गांधीवादी लेखिकेची आठवण होणे अपरिहार्य आहे. ज्या काळी मिश्रविवाह हेच एक धाडस होते, त्या काळात महाराष्ट्रीय मृणालिनीने गुजराती पतीशी विवाह केला. पतीच्या कुटुंबात ती समरस झालीच पण देसाई कुटुंबीयांनीही या बहूचा प्रेम-आदर राखला. गुजराती समाजात, विवाहप्रसंगी झडणा-या जेवणावळी पाहून गरिबांचा कळवळा असणा-या मृणालिनीने अशा प्रसंगी न जेवण्याचा निर्णय घेतला. नवी बहू ‘नाही’ म्हणतेय हे पाहून हळूहळू सर्व देसाई कुटुंबानेच अशा जेवणावळींवर बहिष्कार घातला.
मासिक संग्रह: मार्च, २०००
‘माझं घर’च्या निमित्ताने
‘माझं घर’ या जयंत पवार लिखित नाटकाचा प्रयोग नुकताच पाहिला. जयंत पवार हे प्रायः समस्याप्रधान नाटकलेखक म्हणून जसे परिचित आहेत तसेच सकस नाट्यसमीक्षक म्हणूनही सुपरिचित आहेत. हेही नाटक एक कौटुंबिक समस्या घेऊनच तुमच्या समोर येते, पण ते केवळ तुमच्यापुढे समस्या ठेवत नाही तर तिला उत्तरही देते.
नवरा कलावंत! आपल्याला जपावे, फुलवावे ही त्याची बायकोकडून अपेक्षा. बायको ही केवळ गृहिणी नाही तर ती बँकेत नोकरी करणारी + घर सांभाळणारी + सासूबाईंची सेवा करणारी + आपल्या अकरा वर्षांच्या मुलीची सर्वार्थाने काळजी घेणारी एक स्त्री आहे.
आगरकरांच्या विद्याभूमीत आजचा सुधारक
अकोल्याला आगरकरांची दोन स्मारके, एक तिथले जिल्हापरिषद आगरकर हायस्कूल आणि दुसरे मनुताई कन्या शाळा. सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी आगरकरांनी ज्या सरकारी हायस्कुलात विद्या घेतली त्याला आता सरकारने त्यांचे नाव दिले आहे. मनुताई कन्याशाळेची कहाणी वेगळी आहे. आगरकरांनी अकोल्याला भागवतमामांच्याकडे राहून विद्या केली. त्यांपैकी अनंतराव भागवतांची मुलगी मनुताई चार वर्षे नाममात्र वैवाहिक जीवनाचे कुंकू लावून बालविधवा झालेल्या. आगरकरांच्या प्रेरणेने पुण्याला मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेऊन अकोल्याला त्यांनी प्रौढ स्त्रियांसाठी मोफत शिक्षण देणारे वर्ग काढले. पुढे ह्या वर्गांना लेडिज होम क्लास असे नाव देण्यात आले. तेथील शिक्षिका फुकट शिकवीत.
सॉक्रेटीस: सत्यप्रेमी की स्वार्थप्रेमी?
सॉक्रेटीसचे स्थान पौर्वात्य अन् पाश्चात्त्य संस्कृतीत ध्रुवाच्या तान्यासारखे अढळ होऊन बसले आहे. माझे अमेरिकन शिक्षक त्याच्या कार्याची मुक्त कंठाने प्रशंसा करून त्यानेच जनकल्याणासाठी तत्त्वज्ञान स्वर्गातून पृथ्वीवर आणले असे मोठ्या अभिमानाने ठासून सांगत. त्यावेळी मला नेहमी आम्हाला शिकविणा-यांना अशा शिक्षकांचा तत्त्वज्ञानाचा अभ्यास किती एकांगी असतो ह्याची चांगली कल्पना येई. मी एकदा चर्चेच्या वेळी म्हणालो, “सर, प्लेटोच्या पुस्तकांतील साक्रेटीसने आत्म्याच्या अमरत्वाबाबतची व पुनर्जन्माबाबतची केलेली चर्चा माझ्यासारख्या भारतीय विद्यार्थ्याला नवीन अशी वाटत नाही. ह्याची सांगोपांग चर्चा आमच्या उपनिषदांत व गीतेत मी वाचली आहे. त्यामुळेच सुप्रसिद्ध अमेरिकन तत्त्वज्ञ एमर्सन हा उपनिषदांची जगातल्या उत्तम वाङ्मयात गणना करीत असे.”
गोमांसभक्षण: एक ऐतिहासिक वास्तविकता
डिसेंबर १९९९ आ. सु.च्या अंकात मित्रवर्य डॉ. भाऊ लोखंडे यांचा ब्राह्मणांचे गोमांसभक्षण या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेला लेख वाचला. लेखावरील प्रतिक्रिया वाचनात आल्या. लेखकाच्या हेतूविषयी त्यांत चर्चा आहे. पण ऋग्वेदकाली ब्राह्मण गोमांस खात नसत असे विधान या प्रतिक्रियावाद्यांनी केलेले नाही. याचा अर्थ असा की भाऊंचा पूर्वपक्ष त्यांना मान्य असावा. उत्तरपक्ष करण्यासाठी त्यांनी ऋग्वेदाचे सांस्कृतिक अध्ययन केले नसावे. डॉ. लोखंडे ह्यांनी संशोधनात्मक लेखात ऋग्वेद ते भवभूती (सातवे शतक) या कालखंडील मांसभक्षणाचा पुरस्कार करणारी वचने दिलेली आहेत. सोमेश्वराच्या मानसोल्लास (१२ वे शतक) या संस्कृत ग्रंथात महाराष्ट्रात प्रचारात असणा-या मांसभोजनात डुकराच्या मांसापासून किती प्रकारचे पदार्थ बनतात त्याची पाकक्रिया सांगितली आहे (तिसरा उल्लास) या अशा लेखामुळे कर्मठांचा दुर्वास होऊ शकतो.
म. गांधींचे उपोषण व हिंदुत्ववादी
आजचा सुधारकच्या जानेवारी २००० च्या अंकात श्री. वि. ग. कानिटकर आणि श्री. माधव रिसबूड यांची म. गांधींच्या शेवटच्या उपोषणाबाबतची पत्रे वाचली. त्यांच्या मते म. गांधींचे हे उपोषण भारताने पाकिस्तानला ५५ कोटी रुपये द्यावेत यासाठीच होते. याबाबतची वस्तुस्थिती ध्यानात यावी म्हणून लिहीत आहे.
देश भारत व पाकिस्तान यांच्यामध्ये विभाजित झाल्यानंतर भारतातील मालमत्तेचेही वाटप झाले. भारतातील शस्त्रास्त्रे व दारूगोळा निर्माण करणारे कारखाने भारतातच राहावेत आणि त्याबदली पाकिस्तानला ७० कोटी रुपये द्यावेत असा करार झाला. त्यांतील १५ कोटी रुपयांचा हप्ता पाकिस्तानला देण्यात आला होता.
स्वदेशी? की विवेकी आयात!
स्वदेशीबद्दलची विविध ठिकाणची चर्चा ऐकताना किंवा वाचताना असे लक्षात आले, की खरा प्रश्न स्वदेशी विरुद्ध परदेशी असा नसून आयात करावयाच्या वस्तूंमध्ये/सेवांमध्ये निवड करण्याचा आहे. आपले भारत राष्ट्र हे अमेरिकेप्रमाणे (U.S.A.) श्रीमंत नाही. अमेरिकेला कोणत्याही गोष्टींची अमर्याद आयात करणे सध्या तरी परवडते. पण भारत हे गरीब राष्ट्र आहे. आयातीवर आपण अमर्याद खर्च करू शकत नाही. आपण वस्तू व सेवा निर्यात करून जेवढे परकीय चलन मिळवू तेवढ्या परकीय चलनात विकत घेता येतील एवढ्याच वस्तू किंवा सेवा आपण आयात केल्या पाहिजेत. अल्पकाळासाठी आपण त्यापेक्षा जास्त आयात करून त्याची किंमत कर्ज, मदत, परकीय गुंतवणूक यांच्याद्वारे भागवू शकतो, पण कर्ज व्याजासकट परत करावे लागणार, परकीय गुंतवणुकीवर लाभांशही द्यावा लागणार, व परकीय गुंतवणूक केव्हाही काढून घेतली जाऊ शकते.
प्रिय वाचक
प्रिय वाचक,
आजचा सुधारक गेली दहा वर्षे आपल्या मगदुराप्रमाणे पुरोगामी विचारांचा प्रसार-पुरस्कार करीत आहे. हा पुरोगामी विचार काय आहे नि काय नाही याचा थोडा ऊहापोह करू या. पुरोगामी – म्हणजे पुढे जाणारा. नुसता परिवर्तनशील नाही.
पण पुढे म्हणजे कुठे? ‘पुढे’ ही सापेक्ष कल्पना आहे. विवाद्य आहे. दिशा सापेक्ष. म्हणून आम्हाला अपेक्षित दिशा कोणती आहे, कोणती नाही याचा खुलासा केला पाहिजे.
आमची दिशा आहे मानवधर्माची, समतेची, न्याय्य व्यवस्थेची, व्यक्तिस्वायत्ततेची. याला आम्ही विवेकवाद म्हणतो. दिशा मानवधर्माची म्हणून आम्हाला विशिष्ट समूहाच्या धर्माच्या बंधनापलीकडे जाणे ही पुढची दिशा वाटते.
प्रजोत्पत्तीचा परवाना
अमेरिकेतील ‘सेंट्रल मिचिगन कॉलेज’ चे एक अधिकारी आणि मानसशास्त्रज्ञ डॉ. ट्राउट म्हणतात की ‘आईबापांना प्रजोत्पत्तीकरता परवाना लागेल’ असा कायदा पुढेमागे झाल्याशिवाय राहणार नाही. अन्नाच्या दृष्टीने जगाची लोकसंख्या कमाल मर्यादेपर्यंत वाढली म्हणजे पुढे अशी खबरदारी घ्यावी लागेल की फक्त सुप्रजाजननाच्या दृष्टीने योग्य आईबापांसच मुले व्हावीं. अर्थात् विवाहाची परवानगी सर्वांना असावी, पण सर्वांनाच मुले होऊ द्यावी असा याचा अर्थ नव्हे. आनुवंशिक दोषांमुळे कितीतरी मुलांच्या आयुष्याचा नाश होतो, इतकेच नव्हे तर यामुळे एकंदर समाजाला निकृष्ट दशा येते. याला प्रतिबंधक उपाय एवढाच की परवान्याशिवाय कोणाला मुले होऊ देऊ नयेत आणि असा परवाना फक्त मनाने व शरीराने सुदृढ लोकांनाच मिळावा.