पुण्याला सुधारकचे आजी-माजी मिळून सुमारे २५० वर्गणीदार, नागपूर दूर एका टोकाला, पुणे मध्यवर्ती, तिथे सुधारकच्या सहानुभूतिदारांचा – हितचिंतकांचा एक मेळा होऊ देत, परस्परांच्या गाठी-भेटी होतील विचारांची देवाण घेवाण होईल अशा. आपुलकी वाढवणाच्या सूचना काही बुजुर्गाकडून येत. त्या आम्हालाही हव्याशा वाटणारयाच होत्या. डिसेंबरच्या शेवटी ख्रिसमसच्या सुट्यांमध्ये काही विदेशस्थ वाचक मायदेशी असण्याची शक्यता हा एक जादाचा मुद्दा. या सगळ्यांचा संदर्भ देऊन सहकारी संपादक श्री दिवाकर मोहनींनी पुण्याच्या वाचक-मेळाव्याची घोषणा केलेली. (आ. सु. – सप्टेंबर-९९)
जानेवारीच्या ६ तारखेला हा मित्रमेळा ठरला. स्थळ साधना सभागृह.
मासिक संग्रह: फेब्रुवारी, २०००
‘साँस’च्या निमित्ताने थोडेसे –
साँस ही टी. व्ही. च्या स्टार प्लस चॅनेलवरील मालिका शंभरावर एपिसोड्स होऊन अजून चालू आहे. ही मालिका खरोखर सरस आहे. मालिकेचा विषय साधा जिहादाचा आणि एका गंभीर समस्येला स्पर्श करणारा आहे. एका विवाहित पुरवा या विवाहबाह्य संबंधाची ही कथा आहे. पुरुष प्रथम परिणामांची पर्वा करीत पारो, cण तोही त्यांत भरडला जातो हे दाखविताना त्यात प्रबोधनाचा अभिनिवेश नसे. तो एक प्रांजळ असा कलात्मक आविष्कार वाटतो.
ही कथा एका साध्या, सुखी, उच्च मध्यमवर्गीय कुटुंबात घडते. गौतम आणि प्रिया कपूर यांचे सधन, सुखवस्तु घर, दोन शाळेत जाणारी मुले, १५ वर्षांचा रुळलेला संसार अशी सर्वसाधारण परिस्थिती आणि त्यांच्या सरळ जीवनात मनीषा नावाचे वादळ येते.
अचमत्कारी साधु श्री. वामनराव पै (सद्गुरु, बी. ए. ऑनर्स, वगैरे)
चमत्कारी बाबा, महाराज, योगी वा तांत्रिक यांना विरोध करणे सोपे व सोयीचे आहे. या लोकांच्या खोटारडेपणास बेपर्वाई, शुद्ध बावळटपणा, वगैरेंची जोड मिळून त्यांना हातोहात पकडणे वा कुठल्याही कायद्याखाली डांबणे, या गोष्टी शक्य होतात. अर्थात, हे सर्व असूनदेखील हे महंत ठिकठिकाणी प्रकट होतच असतात व अनेक लोकांना फसवतच असतात. त्यांना जरब बसविणे हे त्यामुळेच महत्त्वाचे काम असते. अंधश्रद्धा निर्मूलन समिती (महाराष्ट्र वा “अ. भा.”) वा तत्सम संस्था हे काम करीत असतात.
अशा जनजागृतीच्या मोहिमांचा एक परिणाम म्हणून बरेचसे चमत्कारी’ बुवा ‘छुपे चमत्कारी’ बनतात.
दलितांसाठी आरक्षण
मागासलेपणासाठी दारिद्र्याबरोबरच सामाजिक व सांस्कृतिक कारणे असतात. घरात व भोवतालच्या समाजात शैक्षणिक वातावरण नसणे, मुलांनी शिकावे अशी तळमळ आई-वडलांना व संबंधित समाजाला नसणे हे एक महत्त्वाचे कारण मागासलेपणाला असते. तसेच उच्चवर्णीयांनी नाउमेद करणे, संधी न देणे, दडपून टाकणे हेही एक महत्त्वाचे कारण असते. त्यामुळे आरक्षणासाठी जात हा महत्त्वाचा निकष असावा हे योग्यच आहे. मतभेद उद्भवण्याची कारणे मुख्यतः तीन –
१. जात हा एकमेव निकष असावा की धर्म, दारिद्र्य, अपंगत्व, स्त्रीत्व हे देखील निकष आरक्षणासाठी असावे? उदा. आज आरक्षणासाठी पात्र असलेल्या हिंदूधर्माच्या व्यक्तीने ख्रिश्चन किंवा मुस्लीम, किंवा बौद्ध धर्म स्वीकारला, तर लगेच त्याचे मागासलेपण जाऊन तो आरक्षणाला अपात्र होईल काय?
ब्राह्मणेतर चळवळ
कॉ. शरद पाटील ह्यांनी समाज प्रबोधन पत्रिकेच्या सप्टें. ऑक्टो. १९७८ च्या अंकात ब्राह्मणेतर चळवळीवर एक प्रदीर्घ लेख लिहून मार्क्सवाद भारतातील जातीय गुंतागुंत समजून घेण्यास असमर्थ असल्यामुळे त्याचा विचार पुन्हा झाला पाहिजे असे प्रतिपादन केले आहे. कॉ. शरद पाटील ह्यांचे विचार कितपत बरोबर आहेत ते पाहण्यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न आहे.
कॉ. नारायण देसाई लिहितात : “वर्गविग्रहाची धग जेव्हा जेव्हा असह्य झाली तेव्हा तेव्हा बहुजनसमाज नव्या धर्माला घेऊन पुढे आला. शास्त्या वर्गाचे बंदे पंडित-पुरोहित नेहमी ह्या नवधर्मावर तुटून पडत. परंतु बहुजनसमाजाचे बंड प्रभावी ठरून शेवटी शास्त्या वर्गाला एका निराळ्याच मार्गाचे बहुजनसमाजाला हतबल करावे लागे.
प्राचीन आर्यसंस्कृति – २
पुराणांत व इतिहासग्रंथांतहि भाऊबहिणीच्या लग्नाचे उल्लेख आलेले आहेत. पुराणांत राजांच्या वंशावळी दिलेल्या आहेत. त्यांत राजाची राणी ही कोणत्या राजाची कन्या हे दिलेले असते. काही ठिकाणी पितृकन्या असा उल्लेख असतो, ती कन्या पितृलोकांतील असा अर्थ टीकाकार करतात, पण तो अर्थ बरोबर नाही. बापाची मुलगी हा खरा अर्थ आहे. म्हणजे लग्न सख्ख्या बहिणीबरोबर किंवा सावत्र बहिणीबरोबर झाले असेल.
पुराणांत अगदी जुना असा संबंध अंग व त्याच्या बापाची मुलगी सुनीथा यांचा आहे. यांचाच पुत्र वेनराजा. वेन हा पुराणांत तर प्रसिद्ध आहेच, परंतु वेदांतहि त्याचे नांव अनेकदा आलेले आहे.
प्रिय वाचक
१. ६ जानेवारीला पुण्याला झालेल्या सुधारक-मित्रमेळाव्याचा वृत्तान्त या अंकात आहे. तो सविस्तर आहे असा आमचा दावा नाही. मुख्य पाहुणे आणि अध्यक्ष यांच्या भाषणातला आणि दुस-याही वक्त्यांच्या बोलण्यातला प्रशंसेचा भाग गाळला आहे. सूचना, टीका-टिप्पणी यांना प्राधान्य दिले आहे. साधनाचे संपादक श्री नरेन्द्र दाभोलकर आणि सुधारकचे चाहते-वाचक श्री. प्रकाश व मंजिरी घाटपांडे यांच्या भरीव सहकार्यामुळे हा मेळा शक्य झाला. तसेच ज्यांचा नामोल्लेख आम्ही केला नाही अशाही अनेकांच्या मदतीचा जेवढा उपयोग झाला तेवढाच त्यांच्या उपस्थितीचाही झाला. या सर्वांचे आभार.
यावेळी काही गोष्टी करायच्या राहून गेल्या.
खरी पूजा
जर ह्या विश्वातील अद्ययावत वस्तुजाताच्या मुळाशी त्यांना धारण करणारी, चालन करणारी, किंवा जिच्या क्रमविकासाचे ते परिणाम होत आले आहेत अशी जी शक्ति आहे तिला देव म्हणावयाचे असेल तर त्या देवाने हे सारे विश्व, मनुष्यास त्याचा मध्यबिंदु कल्पून केवळ मनुष्याच्या सुखसोयीसाठीच निर्मिले ही भावना अगदी भाबडी, खुळी, आणि खोटी आहे.
काही झाले तरी मनुष्य हा ह्या विश्वाच्या देवाच्या खिसगणतीतही नाही. जशी कीडा, मुंगी, माशी, तसाच ह्या अनादि-अनंत कालाच्या असंख्य उलाढालीतील हा मनुष्यही एक.
विश्वाच्या देवाशी, वाटच्या भिकारड्याने सम्राटाशी जोडू पाहावा तसा कोणताही बादरायण संबंध जोडण्याची लालची हाव मनुष्याने आमूलाग्र सोडून द्यावी.
चर्चा
– डॉ. वसंत चिपळोणकर
आजचा सुधारक हे वैचारिक मासिक चालवून आपण महाराष्ट्रात प्रबोधनाचे जे कार्य करीत आहात त्याबद्दल आपले अभिनंदन. ‘चुकीच्या वर्तनासाठी जातीला जवाबदार धरण्यात येऊ नये’ हा विचार किंवा ‘गेली हजार वर्षे दलितांवर स्त्रियांवर सातत्याने अन्याय होत आला आहे. हे विधान बरोबर वाटले. मी यात भर घालून म्हणेन या धर्ममार्तंडांनी हिंदूंच्या आचारावर अनेक कालबाह्य विघातक नैतिक निबंध घालून हिंदुमनुष्याची अन्यायाला प्रतिकार करण्याची शक्तीच कामकुवत केली. जागतिक विचारांशी त्याचा संपर्क तोडून हिंदुसमाजाची प्रगती थांबविली त्याचे एक दुर्बल, कर्तृत्वहीन लाचार व्यक्तींनी भरपूर अशा समाजात रूपांतरण केले.
पत्रव्यवहार
संपादक, आजचा सुधारक, यांस,
डिसेंबर ९९ चा आपला अंक मिळाला. मी गेली ९ वर्षे आपले मासिक नियमित व काळजीपूर्वक वाचले आहे. ते मला आवडलेही आहे. त्याने मला विचार करायची दिशा दाखवलेली आहे. तसेच देव, धर्म, जात व त्या संबंधित विषयाचे विचार मी वाचले व पटले आहेत.
लेखक, विषय, तेच तेच आपण प्रसिद्ध करता आहात. एखाद्या यत्तेत चांगल्या प्रकाराने पास झाल्यावर त्या वर्गातच परत बसून शिकल्यावर जसे वाटते तसे मला वाटत होते. म्हणून ह्यापुढे आपले मासिक पाठविणे बंद करावे. दुस-या मासिकाची वर्गणी मी भरली आहे.