दोन महिन्यांपूर्वी श्री. मोहनी येथे आले होते त्या वेळी डिसेंबर महिन्यात पुण्यात काही कार्यक्रम घेण्याचे विचार बोलले होते. त्याचे पुढे काय झाले? आम्हाला नागपूर एका बाजूस पडल्यासारखे वाटते. पश्चिम महाराष्ट्र वैचारिक बाबतींत बराच पुढारलेला आहे. आपल्या विचाराच्या पूर्व-पश्चिम महाराष्ट्रातल्या मंडळींना एकमेकांस पाहू दे तरी. मग विचार सुरू होतील. एखादी मध्यवर्ती जागा घेतली तरी चालेल. वैचारिक वादळ जोराने सुरू झाले आहे. आपल्या विचारांना गती देणे जरूर आहे. आपल्या सल्लागार मंडळीपुढे हा विचार मांडावा.*
श्री. वा. किर्लोस्कर
४४७, सिंध हौ. सोसायटी, औंध, पुणे – ४११ ००७
*टीप : आता पुणे येथे जानेवारी ६ रोजी सायंकाळी ६ वाजता साधना सभागृहात वाचक मेळावा घेत आहोत.
मासिक संग्रह: जानेवारी, २०००
विवेकाच्या गोठी
१९९९ च्या निवडणुका झाल्या, आणि आता त्याबाबत चर्चा चालू आहे. या निवडणुका वारंवार घ्याव्या लागतात आणि त्यामुळे राष्ट्राच्या जनतेवर खर्चाचा बोजा टाकला जातो असे म्हटले जाते.
परंतु भारताचे एकूण उत्पन्न दीड लाख कोट रुपये आहे व त्यापैकी फक्त एकहजार कोट निवडणुकीवर खर्च होतो. यापेक्षा कितीतरी अधिक खर्च मंत्र्यांच्या राहणीसाठी, मोटारीसाठी, विमानासाठी आणि अनेक पुढा-यांच्या सुरक्षा-व्यवस्थेसाठी खर्च होतो. तसेच, अणुबॉम्बसाठी पंधराहजार कोट खर्च केले आणि पाकिस्तान घाबरले नाहीच!
या निवडणुकीच्या काळात पंधरा दिवस अनेक तरुण बेकारांना रोजीरोटी मिळते आणि त्यांचे हे दिवस आनंदात जातात.
हे प्रभो विभो, अगाध किति तव करणी!- ब्रह्मदेवाचा दिवस
धर्मग्रंथांचा विज्ञानाशी मेळ घालताना सनातन लोक तारेवरची कसरत कशी करतात याचे उदाहरण. ईश्वराने ६ दिवसांत जग निर्माण केले आणि सातव्या दिवशी विश्रांती घेतली असे बायबलात सांगितले आहे. आणि अशा प्रकारे विश्व ३ हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात आले असेही ते म्हणते. आता शास्त्रज्ञांच्या मते पृथ्वीचे वय कोट्यवधी वर्षांचे आहे. ते मानले पाहिजे. पण मग बायबल मधील विसंगती दिसेल आणि त्याचे माहात्म्य कमी होईल. म्हणून १९०९ साली एक ख्रिस्ती तज्ज्ञांची समिती बसवण्यात आली. त्यांनी निकाल दिला की ‘दिवस’ या शब्दाचा नेहमीचा अर्थ म्हणजे ‘२४ तास’ असा न घेता ‘दिवस’ म्हणजे ‘अनिश्चित काळ’ असा घ्यावा.
एका आमंत्रणपत्रिकेचा पंचनामा
ही आमंत्रणपत्रिका एका मखमलीसारख्या कापडाच्या वीतभर लांब लिफाफ्यात होती. लिफाफा बंद राहण्यासाठी ‘व्हेल्क्रो’चे तुकडे लावले होते, व लिफाफा गोंडे लावलेल्या सोनेरी गोफाने बांधलेला होता. आतमध्ये एका सात इंच लाव नक्षीदार लाकडी दांडीला पाच इंच रुंद व पंधरा इंच लांब सॅटिन-रेशीम जातीचा कापडी पट जोडलेला होता. त्याची गुंडाळी करून तिला एका सोनेरी गोफाने बांधले होते. या गोफात एक कार्ड ओवले होते, ज्याच्या एका बाजूवर पत्रिका पाठवणाच्या कुटुंबाचे नाव व पत्ता छापलेला होता. दुस-या बाजूला आमंत्रितांची नावे लिहिण्यासाठी जागा होती.
पटाच्या वरच्या भागात गणपतीचे चित्र व दोहो बाजूस ‘प्रसन्न झालेल्या कुलदैवतांची नावे होती.
वाचा – दिवाळी अंकांचा परामर्श
परामर्शासाठी दिवाळी अंक आलेले आणि आणलेले विपुल आहेत. आलेल्या अंकांची पोच स्वतंत्रपणे दिली आहे. निवडक साहित्याचा परामर्श घ्यायचा म्हटले तरी एक लेख पुरणार नाही. परामर्शाचा एक अंश म्हणून या लेखाकडे पाहावे.
दर्जेदार दिवाळी अंक देण्याची परंपरा ‘मौज’ने कायम राखली आहे. मुखपृष्ठ गेल्या पिढीतले विख्यात चित्रकार त्रिन्दाद यांनी केलेले दुर्मिळ पोर्टेट आहे. जोडीला त्याचे सुधाकर यादव-कृत रसग्रहण वाचले की आस्वादनात भर पडते. समाजातल्या समस्यांचा गंभीरपणे ऊहापोह करणारे तिन्ही लेख लक्षणीय आहेत. त्यात स. ह. देशपांडे आहेत.
हे तीनही लेख खूप माहितीपूर्ण आणि तरीही रोचक आहेत.
इंग्रजीला पर्याय नाही
इंग्रजीविरुद्धचा गहजब तसा नवीन नाही. भाषाभिमान्यांनी अनेकदा विविध माध्यमांतून इंग्रजीच्या वाढत्या प्रभावाबाबत चिंता व्यक्त केलेली आहे. मातृभाषेतूनच सर्व शिक्षण द्यावे-घ्यावे ही कल्पना तत्त्वतः मलाही मान्य आहेच. परंतु सद्यः परिस्थितीत हा आग्रह धरणे म्हणजे आपण होऊन स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कु-हाड मारण्यासारखे आहे. तिसरे सहस्रक उगवते आहे. कोणी कितीही नाही म्हटले तरी जागतिकीक र ण (ग्लोबलायझेशन) अटळ आहे . इंटरनेटमुळे तर संदेश दळणवळण-आर्थिक व वाणिज्य व्यवहार या क्षेत्रांतील सर्व पारंपारिक व्यवस्था मोडीत निघाल्या आहेत. अशा वेळी केवळ स्वदेश स्वभाषा ह्यांसारख्या उदात्त, भव्य परंतु अमूर्त आणि प्रसंगी अव्यावहारिक भावनांच्या भरवशावर पुढे जायला नकार देणे फारसे हितकर वाटत नाही.
महाराष्ट्राच्या राजधानीत मराठी भाषा कोप-यात
एक वृत्तान्त :
मराठी भाषेची सद्यःस्थिति आणि भवितव्य या विषयावर कोकण मराठी साहित्य परिषदेत (को.म.सा.प.) परिसंवाद झाला. प्रत्यक्षात ‘महाराष्ट्राच्या राजधानीत मराठी भाषा कोप-यात’ अशा शब्दात विषय मांडला तरी आशय तोच.
न्यायमूर्ती राजाभाऊ गवांदे हे परिसंवादांचे अध्यक्ष होते. आणि मुंबईसकाळचे संपादक राधाकृष्ण नार्वेकर, महाराष्ट्राचे सेवानिवृत्त भाषासंचालक डॉ. न. ब. पाटील आणि सुरेश नाडकर्णी हे वक्ते होते. मराठीची आणि मराठी माणसाची महाराष्ट्राच्या राजधानीतून हकालपट्टी होत आहे, द्रव्यबळ आणि स्नायुबळ हेच प्रभावी ठरत आहेत, असा मुद्दा अध्यक्षीय भाषणात मांडला गेला. नार्वेकरांनी वृत्तपत्रसृष्टीतील मराठीची गळचेपी निदर्शनास आणली.
मांसाहार – उपयुक्ततावादी!
प्राचीन काळच्या भारतीय समाजात मांसाहाराला मान्यता होती, हे डॉ. लोखंडे यांच्या लेखात (१०.९) वयाच पुराव्यांच्या मदतीने दाखवले आहे. पण पूर्वी काय होते आणि ते का बंद झाले, हा एक दृष्टिकोन झाला. मांसाहाराला विरोध करण्यामागची एक सरळसरळ उपयुक्ततावादी भूमिका अशी –
सूर्यप्रकाशाची ऊर्जा वापरून वनस्पतींची वाढ होते. वनस्पती खाऊन शाकाहारी जीव जगतात. अशा जीवांना खाऊन मांसाहारी जीव जगतात. या तीन्ही ऊर्जा-रूपांतरांची कार्यक्षमता सुमारे पंधरा टक्क्यांएवढी (एक-सप्तमांश म्हणा) आहे. म्हणजे वनस्पती खाऊन एक कॅलरी ऊर्जा घेण्यात सात कॅलरी सूर्यप्रकाश परहस्ते ‘खाल्ला जात असतो.
मंटो नावाचे बंड
येत्या १८ जानेवारीला मंटो मरून ४५ वर्षे होतील. वयाच्या ४३ व्या वर्षी तो वारला. काही समीक्षकांच्या मते तो उर्दूतला सर्वश्रेष्ठ कथाकार होता. नोकरीच्या शोधात अमृतसरहून मुंबईला आला अन् चित्रपट-व्यवसायात शूटींगच्या वेळी संवाद दुरुस्त करून देणारा मुन्शी म्हणून नोकरीला लागला. लवकरच ‘मुसव्विर’ (चित्रकार) या उर्दू सिनेसाप्ताहिकाचा संपादक म्हणून त्याला जरा प्रतिष्ठेची नोकरी मिळाली. ‘बद सही लेकिन नाम तो हुवा’ अशा बेहोशीत लिहायचा. स्वतःबद्दल फार थोडे सांगणारा
मंटो म्हणतो, “माझ्या आयुष्यात सांगण्यासारख्या तीनच गोष्टी. एक माझा जन्म, दुसरे, माझे लग्न आणि तिसरे माझे लिहिणे.
प्राचीन आर्यसंस्कृति – १
समाजस्वास्थ्याच्या नोवेंबरच्या अंकात ‘चमत्कारिक खटला’ या मथळ्याखाली फ्रायबुर्ग (जर्मनी) येथील ओटो व त्याची बहीण एलीझ यांवर निषिद्ध समागमाबद्दल १९२८ साली झालेल्या खटल्याची हकीकत आली आहे. सदर खटल्यांतील पुरावा बनावट होता असे पुढे दिसून आले तरी लोकहिताच्या दृष्टीने शिक्षा ताबडतोब पुरी। होणे इष्ट असल्यामुळे अपील अर्जाचा निकाल होईपर्यंत ती तहकूब करता येत नाही असा जबाब आरोपीच्या वकिलास देण्यांत आला.
निषिद्ध-समागमाचे योगाने इतर कोणाचे नुकसान होत नसल्याने असले खटलेच गैर आहेत. पण प्रजेच्या पापाचा हिस्सा यमाच्या दरबारांत राजाच्या खात्यावर चढवला जातो अशी राजकत्र्यांची समजूत असल्यास व निषिद्ध समागम हे पातक मानल्यास बहीणभावाच्या निषिद्ध संबंधाबद्दल राज्यकर्त्यांनी खुनशी वृत्ति दाखवणे क्षम्य होईल.