ब्राह्मणांचे गोमांसभक्षण

धार्मिक दृष्टीने गोहत्या हा विषय संवेदनशील असला तरी सत्यशोधन कोणालाही आक्षेपार्ह वाटू नये. वैदिकवाडमयाचे व प्राचीन संस्कृत, पालि-प्राकृत साहित्याचे जे विद्वान यांच्या संशोधनातून व खुद्द वेदांतून मूळ वचने देऊन प्रस्तुत निबंध सज्ज केला आहे.
रजनीकांत शास्त्री, साहित्य सरस्वती, विद्यानिधि –
(१) “ऋग्वेद के अध्ययनसे पता चलता है कि वैदिककाल में जौ और गेहूं खेतों की आज तत्कालीन हिन्दुओंके मुख्य खाद्य पदार्थ थे।… मांसभोजनभी उस कालमें बहुत प्रचलित था और आधुनिक हिन्दू जनता यह जानकर चौक उठेगी कि अन्य खाने योग्य पशुओंके मांस की तरह गोमांस भी खाद्य पदार्थों में सम्मिलित था”
(हिंदु जाति का उत्थान ओर पतन पृ. १६)
श्री भगवतशरण उपाध्याय आपल्या ‘खून के छीटें इतिहास के पन्नोपर’ या ग्रंथात पृ. ३२ वर म्हणतातः
(२) “उसकी विपत्तियों के शमन के निमित्त मैंने (अर्थातू ब्राह्मण ने) अनेक प्रकारोंके यज्ञों की अभिसृष्टि की-नरमेध, गोमेध, अश्वमेध आदि की! मेरे लिए (ब्राह्मण के लिए) तब कोई पदार्थ, कोई जीव अभक्ष्य न था — गाय, घोडा कुछ भी नहीं। गाय – विशेषकर बछडा – तो अतिथियोंको विशेष प्रिय था! …. यज्ञार्पित वस्तु को मैंने सेव्य और खाद्य घोषित किया! सभी स्वाद, खाद्य और पेय पदार्थ देवार्थक थे – सुरा और आमिष (मांस) तो विशेषतः … यज्ञ में अर्पित प्रत्येक वस्तु ज्य? ही नहीं, अवश्य ग्राह्य थी। और इस प्रकार सोम की मर्यादा बढी! मेरे सारे देवता हिंस्र और आमिषभोजी थे । इंद्र सोम पीता और गोमांस खाता था” (पृ. ३२)
महामती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा धर्मशास्त्राचा अभ्यास सखोल होता. ते लिहितात –
(३) “That the Aryans of the Rigveda did kill cows for purposes of food and ate beef is abundantly clear from theRigveda itself. In Rigveda (X.86. 14) Indra says – They cook for me one fifteen plus twenty oxen. The Rig veda (X. 91. 14) says that for Agniwere sacrificed horses, bulls, Oxen, barren cows and rams, From the Rigveda (X. 72.6) it appears that the cow was killed with a sword or axe.”
(“The Untouchables’-By Dr. B. R. Ambedkarp. 87-88)

वैदिक धर्मानुयायांना, ब्राह्मणांना अभक्ष्य असे काही नव्हते. गायीची कालवड तर त्यांना विशेष प्रिय होती. कोणकोणत्या गायी बळी द्याव्यात याचे तपशील द्यायला वैदिक ऋषी विसरत नाहीत.
ऋग्वेद
*(४) (ऋ १०/८६/९३) हे (इन्द्रपुत्र) वृषाकपि पत्नी! तू धनवन्ती, सुपुत्री व सुंदर पुत्रवधू आहेस. तुझ्या प्रिय व सुखकर हविर्द्रव्याचे इंद्र भक्षण करो. तुझे बैल इंद्र खाऊन फस्त करो.
(५) १०/२८ हे इन्द्रा! अन्नाच्या इच्छेने जेव्हा तुझ्यासाठी हवन करतात तेव्हा यजमान दगडी पाट्यावर त्वरित सोमरस तयार करतात. तू तो पितोस. यजमान वृषभ (बैल) शिजवतात. तू तो खातोस.
हाच आशय ऋ १०/८६/१४ त आहे.
आता म्हशींसंबंधी उल्लेख पाहा.
(६) हे इन्द्रा! प्रीतिभाजन (प्रेमाला लायक) मरुद्गण स्तोत्रे गाऊन तुमचे वर्धन करतात. पूषन् व विष्णु तुझ्यासाठी १०० म्हशी शिजवतात व तीन पात्रे पूर्ण भरतील एवढा वृत्रनाशक व मादक सोम (रस) गाळतात.
ऋ १०/११/१४ मध्येही बैल, घोडे आणि पौरुषरहित मेंढ्यांची आहुती घेणा-या अग्नीचे हृदयपूर्वक स्तवन आहे. ऋ १०/८९/१४ मध्ये गोवधस्थळां (कसाईखाना) चा उल्लेख आढळतो. सोमाची वेल गाईच्या कातड्यावर कुटून सोमरस काढणे (ऋ ९/ ७९/४) हेही प्रकार वर्णिले आहेत.
* या नंतरच्या अंकित अवतरणांचे मूळ संस्कृत वचन लेखाशेवटी पाहा.

मधुपर्क
हा मेजवानीचा प्रकार आजही चालू आहे. विवाहप्रसंगी वर वधूपित्याकडे येतो तेव्हा त्याचे मधुपर्काने स्वागत करतात. मधुर द्रव्यांच्या मिश्रणापासून तो करतात. राजा, ऋत्विज, शिष्ट-अतिथी यांसाठी गोमांसयुक्त मधुपर्क सांगितला आहे. श्राध्दांचे वेळी पितरांसाठी समांसमधुपर्क शास्त्रोक्त आहे.
अतिथिके मधुपर्कमे कोई दुसरे पशंका नही विशेषतः गाय का मांस आवश्यक था. इसलिए अतिथिके लिये गोदत्या की बात इतनी सामान्य हो गयी थी की अतिथि का नामही ‘गोघ्न’ पड गया था। अर्थात् गोहत्या करनेवाला । (अनुवादकौसल्यायन पृ. १०३)
गाय नसल्यास मधुपर्कात बकरीचे मांस चालते बौधायन गृह्य सूत्राप्रमाणे मांसाशिवाय मधुपर्क होऊच शकत नाही. वसिष्ठस्मृति म्हणते.
(७) पितर, देव नि अतिथी यांच्या पूजेत पशुहिंसा ग्राह्य आहे. यज्ञात आणि मधुपर्कात तसेच देवतांच्या व पितरांच्या (श्राद्धादि) कामातच पशुवध करावा अन्यथा नाही असे मनुवचन आहे.
भवभूतीच्या उत्तररामचरित नाटकातला एक संवाद फार बोलका आहे. वाल्मिकीच्या आश्रमात वसिष्ठाचे आगमन झाले. त्यावेळी झालेल्या पाहुणचाराबद्दल दोन शिष्यांचा संवाद आहे. एक शिष्य (सौधातकि) दुस-याला (भांडायन) म्हणतो.
(८) सौधा. – ‘अहो, आल्या आल्या त्यांनी त्या बिचाया कल्याणीला – कालवडीला मटकावले’
भांडा. – मधुपर्क समांस असावा हे वेदवचन शिरसावंद्य मानणारे गृहस्थाश्रमी वेदशास्त्रसंपन्न अतिथीसाठी गाय, पुष्ट बैक किंवा बकरा कापतात. (कापावे) या श्रुतिवचनाला धर्मसूत्रकार प्रमाण मानतात.
वसिष्ठस्मृतीच्या ४ थ्या अध्यायात शिष्टजनांचे आतिथ्य कसे करावे याबद्दल लिहिले आहे, –
(९) आपल्याकडे ब्राह्मण किंवा राजकुलोत्पन्नव्यक्ती वा अभ्यागत आले तर त्यांच्यासाठी धष्टपुष्ट बैल किंवा बोकड रांधला पाहिजेत. यांचे आतिथ्य असेच करतात. मनुला गोमांस ग्राह्य –
मनूने यज्ञात देवांसाठी आणि श्राद्धात पितरांसाठी होणारी पशुहिंसा हिंसाच नाही असे मानले. मनूने भक्ष्य प्राण्यांची जंत्री दिली त्यात उंटाचाच तेवढा अपवाद आहे. गायीचा नाही.
(१०) पाठीन, रोहू इ. मासे खाण्यायोग्य असून हव्य (देवतांसाठी) व कव्य (पितरांसाठी) म्हणून विहित (शास्त्रोक्त) आहेत. राजीव सिंहतुंड व शशाल्क मासेही भक्षणीय आहेत. (मनुस्मृति ५.१६) पाचनखे असणा-यांत उंटाशिवाय गोह, गेंडा, कासव, ससा, साही, सेई, तसेच एका बाजूला दात असणायांत उंटाप्रमाणे गाय, बैल, बकरी हेही येतात. मनूने उंट तेवढा वगळला, गाय नाही हे लक्षणीय आहे. गोहत्या मनु महापातक समजत नाही, (चोरी, मद्यपान मात्र त्याला महापातक वाटते.) त्याला ते उपपातक वाटते. तो म्हणतो,
(११)गोहत्या, जाति – कर्माने दूषित मनुष्यद्वारा यज्ञयाग, परस्त्रीगमन, आत्मविक्रय, गुरू, माता-पितात्याग, स्वाध्याय त्याग, अग्नी व पुत्रत्याग (ही उपपातके आहेत.) मनु. ११.५९
(१२)मनु काही प्रकरणी मांसाहार आवश्यक समजतो. उदा ५.३५ पाहा. यज्ञात व श्राद्धात यथाविधि नियुक्त झाल्यावर जो मनुष्य मांस खात नाही, तो मृत्यूनंतर २१ जन्म पशुयोनीत जन्म घेतो. महर्षि व्यासांचाही दाखला असाच आहे.
(१३)यज्ञात अथवा श्राद्धात नियुक्त होऊनही ब्राह्मणाने मांसाशन केले नाही तर तो पतित होतो. ३। ५५ ।।
वरील अवतरणांवरून हे सिद्ध होते की, स्मृतिकारांनी गोमांसभक्षण निषिद्ध तर ठरविलेच नाही. उलट मधुपर्काच्या माध्यमातून आवश्यक मानले. आणि यज्ञीय हिंसेला अहिंसा म्हटले. गाय पवित्र म्हणूनच वध्य
गाय पवित्र मानली म्हणून आराध्य देवतेला बळी देण्यास सर्वोत्तम ठरली. वाजसनेय मतानुसार गाय व बैल पवित्र अर्थात् वध्य आहेत. (धेन्वनड्वाहौमेध्यौ वाजसनेयने।) आपस्तंब धर्मसूत्रात, ‘गाय व बैल पवित्र आहेत म्हणूनच ते खाल्ले पाहिजेत’ (१.५/१४/१९) असे म्हटले आहे. शतपथ ब्राह्मणात याज्ञवल्क्य म्हणतो, गोमांसभक्षणाने (माझे) शरीर बलवान होते म्हणून मी ते खाणारच. (“ तदु होवाच याज्ञवल्क्योऽश्नोम्येवाहं मांसलं चेभवतीति”) धर्मशास्त्राचे प्रसिद्ध इतिहासकार महामहोपाध्याय पां. वा. काणे लिहितात –
“वैदिक काळात गाय पवित्र मानली जात नव्हती असे नाही. परंतु तिच्या पवित्रतेच्याच कारणामुळे वाजसनेय संहितेत गोमांस खाल्ले पाहिजे, अशी व्यवस्था दिली आहे.”
याचा अर्थ गोमांसभक्षण हे धार्मिक विधीचे एक अंग होते.
गोमेध यज्ञातील गोहत्या
‘गोमेध’ या शब्दाचा अर्थ शब्दकल्पद्रुमात दिला आहे तो असा, “यज्ञविशेषः। स्त्रीका पशुतो मंत्रेषु स्त्रीलिंग पाठात् । तस्य लक्षणसप्तशफत्व – नवशफत्व – भग्नशृंगत्व – कोणत्व – छिन्नकर्णत्वादि दोषराहित्यम् । तस्य प्रयोगः सर्वोऽपि छागपशुवत् । यजमानस्य स्वर्ग फलम् । गोश्च गोलोक प्राप्तिः।
याचा अर्थ असा की, हा एक यज्ञविशेष आहे. येथे गौ म्हणजे स्त्रीगोपशु (बैल किंवा बकरा नव्हे) कारण मंत्रात स्त्रीलिंग पाठ आहे. त्या गायीची ही लक्षणे असली पाहिजेत की, “ती सात खुर, नऊ खुर असलेली किंवा शिंगे तुटलेली, एक डोळां अंध असणारी किंवा कान फाटलेली नसावी. तिचा (यज्ञात) प्रयोग पूर्णपणे बकच्याप्रमाणे असावा. (गोमेध) यज्ञाचे फळ यजमानाला स्वर्ग व गायीला गोलोकाची प्राप्ती हे आहे.
यज्ञात एकाच वेळी शेकडो हजारो गायी कापल्या जात. बौद्ध व जैन साहित्यात या पशुहिंसेची निंदा करणारी, निषेधपर वचने आहेत.
गवालम्भ हा गोमेध याचाच समानार्थक शब्द आहे. शब्दकल्पद्रुमात अमरकोशाच्या आधारे आलम्भ’ म्हणजे ‘वध’ हाच अर्थ दिला आहे. आपट्यांच्या कोशात आलम्भ (आ + लभ् + घञ् + मुम्) चा अर्थ killing असाच आहे.
राजा रन्तिदेवाचे गोमेध
रन्तिदेव हा चंद्रवंशीय राजा. दुष्यन्त व शकुंतलेचा पुत्र भरत, त्यापासून पुढे सहावा वंशज. त्याने यज्ञात व एरवीही आतिथ्यासाठी प्रचंड प्रमाणावर गोसंहार केला. गायींच्या कातड्यांमधून निघालेल्या रक्तापासून चर्मण्वती नामक नदी निघाली. आजच्या बुंदेलखंडातील चंबळ हीच ती प्राचीन चर्मण्वती. कालिदासाच्या मेघदूतात रन्तिदेवाच्या या यज्ञकर्मांचा उल्लेख आहे.
हा दाखला काव्यातला म्हणून गौण लेखू नये. महाभारताला तर इतिहासग्रंथ मानतात. त्याच्या वनपर्वात २०८ अध्यायातील श्लोक ८-९ मध्येही या घटनेची नोंद आहे. तेथे म्हटले आहे की, रन्तिदेवाच्या पाकशाळेत रोज दोन हजार गायी कापल्या जात. गोमांसयुक्त अन्नदानामुळे रन्तिदेवाची कीर्ती अद्वितीय झाली आहे.
यज्ञातील बळीला स्वर्गप्राप्ती
यज्ञात बळी दिलेला पशू उठून सशरीर स्वर्गात जातो. केवळ यजमानाला नव्हे तर पशूलाही स्वर्ग मिळतो असा तर्क धूर्त ब्राह्मणांनी मांडला आहे. मनुस्मृतीने याच मताचा अनुवाद केला आहे. – मनु म्हणतो,
(१४)वेदाचे तत्त्व जाणणारा ब्राह्मण पूर्वोक्त मधुपर्कादि कर्मात पशुहिंसा करतो व स्वतःबरोबरच (बळी दिलेल्या) प्राण्याला उत्तम गती मिळवून देतो. (मनु ५.३२)
बापाचाच बळी का नको?
चार्वाकांनी या तर्काला चोख उत्तर दिले आहे, ते म्हणतात, अग्निष्टोम यज्ञात मारलेला पशू जर स्वर्गात जातो तर मग यजमान आपल्या पित्याचाच बळी का देत नाही? (म्हणजे त्याला लौकर स्वर्गप्राप्ती होईल).
पशुहत्येमुळे वेद निंद्य ठरले
बेसुमार पशुहत्येमुळे चार्वाक, जैन व बौद्धधर्मग्रंथांतच नाही तर हिंदुधर्मग्रंथांतही वेदनिंदा आढळते. श्रीमद्भागवत या ग्रंथात, पशुवध करणा-या बर्हि नावाच्या राजाला नारद कठोर शब्दांनी दूषणे देतात. भागवतातील चवथ्या स्कंधातील अध्याय २५, श्लोक ७ व ८ या दृष्टीने वाचनीय आहेत.
(१६)नारद म्हणाले, “हे प्रजापालनकर्त्या राजा! तू निर्दयपणे हजारो प्राण्यांची यज्ञात हत्या केली आहे. हे सर्व (प्राणी) तुझ्या मृत्यूची वाट पाहत आहेत. तू मरशील तेव्हा हे सर्व (प्राणी) तु दिलेल्या यातनांचे स्मरण करून त्याचा बदला घेतील. क्रोधाविष्ट होऊन यमराजाच्या घरी ते आपल्या वज्राप्रमाणे तीक्ष्ण शिंगांनी तुझे शरीर छिन्नभिन्न करतील.”
व्यासांच्या काळात जनता पशुवधाला कंटाळली होती. यज्ञयागादींवरून तिची श्रद्धा उडाली होती. जनतेची नाराजी आणि विरोध जैन आणि बौद्ध साहित्यात व्यक्त झाला आहे. बौद्ध व जैन ग्रंथांचे आधार
(१७)सर्व वेदांत पशुवध सांगितला आहे. आणि यजन हे पापकर्ममिश्रित आहे म्हणून यज्ञ करणा-यांची दुष्कर्मे त्यांचे रक्षण करू शकत नाहीत असा ‘उत्तराध्ययन सूत्र’ या जैनग्रंथात हरिकेशबलाच्या कथेत यज्ञाचा निषेध आहे. बौद्धांच्या ‘सुत्तनिपात’ या ग्रंथात ‘ब्राह्मण-धम्मिय सुत्तात’ पुढील गाथा आहेत.
(१८) मेंढराप्रमाणे नम्र आणि घडाभर दूध देणा-या गायी पायाने, शिंगाने किंवा दुस-या कोणत्याही अवयवाने कोणाचीही हिंसा करीत नाहीत त्या गायींना (ब्राह्मणांच्या आज्ञेमुळे इक्ष्वाकु राजाने शिंगांना धरून ठार मारले. याप्रमाणे गायींवर शस्त्रप्रहार झाल्यामुळे देव, पितर, इंद्र, असुर आणि राक्षस अधर्म झाला म्हणून आक्रोश करते झाले. पुढे भगवान म्हणतात, “पूर्वी जगात तीनच रोग होते – इच्छा, क्षुधा आणि वार्धक्य. परंतु आता पशुहिंसेमुळे ते ९८ झाले आहेत.”
महापंडित राहुल सांकृत्यायन म्हणतात, “ऐतिहासिक तौरसे देखने पर बुद्ध के पहले किसी काल में भी बिना पशुहिंसा के यज्ञ नहीं होते थे.” भगवान बुद्धांनी यज्ञस्थळी स्वतः जाऊन बळी देण्यासाठी बांधलेल्या प्राण्यांना जीवदान दिल्याचे उदाहरण ‘दीघ्घनिकाया’ तील ‘कुटदंतसुत्तात’ मिळते. ते असे, ‘मगध देशातील खाणुमत गावी कुटदंत ब्राह्मणाने, सातशे बैल, सातशे गोव्हे, सातशे मेंढ्या आणल्या होत्या. परंतु भगवंताच्या उपदेशामुळे कुटदंताने पशुवध केला नाही. शरणागत कूटदंताने भगवंतास म्हटले, “भो गौतम, या प्राण्यांना मी यूपांपासून मोकळे करतो. त्यांना जीवनदान देतो. ताजे गवत खाऊन व थंड पाणी पिऊन ते शीतल छायेत आनंदाने राहोत.”
(१९)ज्या यज्ञात प्राणिहत्या होते ते यज्ञ खर्चाचे व फलहीन असतात. म्हणून तेथे सद्वर्तनी महर्षी जात नाहीत. असे भगवंताचे मत आहे. ‘कोसलसुत्ता’ तील वृत्तांत वाचनीय आहे. भगवंत म्हणाले, ‘अश्वमेध, पुरुषमेध, सम्यक्पाश, वाजपेय, आणि निर्गल हे यज्ञ मोठ्या खर्चाचे आहेत. परंतु ते महाफलदायक नाहीत. गायी, बकरे आणि मेंढे ज्यांत मारले जातात तेथे सद्वर्तनी महर्षी जात नाहीत. परंतु ज्या यज्ञात प्राणिहिंसा होत नाही, जे लोकांना आवडतात अशा यज्ञांत सद्वर्तनी महर्षी जातात. म्हणून सुज्ञ पुरुषाने असा यज्ञ करावा. हा यज्ञ महाफलदायक आहे.
गोहत्येला पाप समजणा-या अगणित हिंदुधर्मीयांना वर सादर केलेल्या प्रमाणांबद्दल काय म्हणायचे आहे? वेदोक्त धर्म आणि आधुनिक हिंदुधर्म यांच्यात साम्य किती आणि भेद किती हे वाचकानेच ठरवावे.
संदर्भ :-
(४) वृषाकपायि रेवती सुपुत्र आदु सस्नुषे ।
घसत्त इन्द्र उक्षणः प्रियं काचित् करं हविर्विश्वस्मादिन्द्र उत्तरः।। ऋ. १०।८६।१३
(५) अद्रिणाते मन्दिन् इन्द्र तूयान्सुत्वनि सोमान् पिवसित्वमेषाम्
पचन्ति ते वृषभां अत्सि तेषां पृक्षेण यन्मघवन् ह्यमानः । ऋ. १०| २८ ।
(६) वर्धान्य यं विश्वे मरुतः सजोषाः पचच्छतं महिषां इन्द्रतुभ्यम् ।
पूषा विष्णुस्त्रीणि सरांसि धावान वृत्रहणं मदिर मंशुभस्मै ।। ऋ. ६ । १७ ।११।।
(७) पितृदेवातिथिपूजाया पशु हिंस्यात्! मधुपर्क च यज्ञे च, पितृदैवत कर्माणि । अत्रैव च पशु हिंस्यान्नान्यथेत्यऽब्रवीन्मनुः।।
(८) भांडायन – समांसो मधुपर्क इत्याम्नायं बहुमन्यमानाः श्रोत्रियाभ्यागताय वत्सरी, महोक्ष, महाजं वा निर्वपन्ति गृहमेधिनः तं हि धर्मसूत्रकाराः समामनन्ति।
(९) अथापि बाम्हणस्य वा राजन्याय वा अभ्यागताय वा महोतं वा महाजं वा पचेत् । एवमस्यातिथ्यं कुर्वन्तीति ।
(१०) पाठीन रोहितावाघौ नियुक्ती हव्यकव्ययो।
राजीवान् सिंहतुण्डाश्च सशल्कांश्चैच सर्वशः।५।१६ ।।
श्वाविधं शल्यकं गोधा खड्गकर्मशशास्तथा।
भक्षान् पञ्चनखेवाहुरनुष्ट्रांश्चैकतोदतः।५।१८।।
(११) गोवधोऽयाज्य-संयाज्य पारदार्यात्मविक्रयाः।
गुरु मातृ-पितृ-त्यागः स्वाध्यायाग्न्यो सुहास्यच ।। ११ । ५९
(१२) नियुक्तस्तु यथा न्यायं यो मांसं नात्ति मानवः।
स प्रेत्य पशुतां याति संभवानेकविंशतिम् ।। मनु. ५। ३५ ।।
(१३) … क्रती श्राद्धे नियुक्ती वा अनश्नन पतति द्विज ।३।५५।।
(१४) “एव्वर्थेषु पशुन्हिंसन्वेदतत्वार्थविद् द्विजः ।
आत्मानं च पशुचैव ममयत्युत्तमां गतिम् ।। नुम । ५। ३२ ।।
(१५) पशुश्चेन्निहितः स्वर्ग ज्योतिष्टोमें गमिष्यति।
स्वपिता यजमानेन यत्र कस्मान्न हिंस्यते ।।
(१६) भो भो प्रजापते राजन् पशुन् पश्य त्वयाध्वरे।
संज्ञापितान् जीवसंधान निघूर्णन सहस्त्रशः ।। ४ । २५ । ७ ।।
एते त्वा सम्प्रतीक्षन्ते स्मरन्तो वैशसं तवं ।
संपरेतमयः कुटैछिन्दन्त्युत्थित मन्यवः ।। ४।२५।८ ।।

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.