नोव्हेंबर ‘९९ चा आजचा सुधारकचा अंक वेगळा व लक्षणीय वाटला. लेखांचे विषय अधिक वैविध्यपूर्ण व समाजापुढील वेगवेगळ्या प्रश्नाकडे लक्ष वेधणारे वाटले. अभिनंदन!
डॉ. सुभाष आठले
२५,नागाळा पार्क,
कोल्हापूर – ४१६००३
संपादक, आजचा सुधारक, यांस,
नोव्हेंबरचा अंक खूप माहितीपूर्ण वाटला. समान्यपणे १ ल्या पानांवर थोर व्यक्तींच्या लेखनातील एखादा महत्त्वाचा मुद्दा उद्धृत केलेला असतोच. यावेळच्या अंकातील हमीद दलवाईंचे मुस्लिम समाजाच्या सामाजिक सुधारणाबाबतचे विचार दिलेले आहेत. त्यातील शेवटचे वाक्य तर फारच महत्त्वाचे आहे.
पूर्वीच्या एका अंकातील ‘संपादकीया’ वर मी टीकाटिप्पणी कळवली होती व आपण ती छापलीही होती.