मासिक संग्रह: ऑक्टोबर , १९९९

पत्रव्यवहार

संपादक, आजचा सुधारक, यांस
जून महिन्याच्या अंकातील श्री. किर्लोस्कर, श्री. पांढरे यांचे पत्र आणि संपादकीय मला खूप आवडले. श्री. किर्लोस्करांचा लेख चांगला आहे असे म्हणणे म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेणे होय. त्यांचे भारतीय संस्कृती आणि बुद्धिवाद आणि चार्वाक ही नाटके माझ्या संग्रही आहेत.
परंतु त्यांनी मूर्तिभंजक होण्यास सांगितले आहे ते मात्र तितकेसे पटत नाही. याबाबत लो. टिळकांची गोष्ट सांगतो. लोकमान्य टिळकांकडे एकदा शिवराम महादेव परांजपे गेले आणि त्यांना म्हणाले की, “तुम्ही सशस्त्र लढ्याची घोषणा का करीत नाही?” त्यावर टिळक म्हणाले, “तू मला ५०० माणसे अशी आणून दे, की जी मरावयास तयार आहेत.”

पुढे वाचा

कामशास्त्री कर्वे (नव्या चरित्राच्या निमित्ताने)

माणूस मृत्यूनंतर मोठा होतो. कर्त्यांच्या बाबतीत हे विशेषच खरे आहे. येत्या १४ ऑक्टोबरला त्यांच्या मृत्यूला ४६ वर्षे होतील. या काळात त्यांची दोन चरित्रे प्रसिद्ध झाली. ‘उपेक्षित द्रष्टा’ हे दिवाकर बापटांचे १९७१ साली आणि य. दि. फडक्यांचे ‘र. धों. कर्वे’ १९८१ साली. सध्या उपेक्षित योगी या नावाचे त्यांचे एक नवे चरित्र आमच्याकडे अभिप्रायार्थ आले आहे, ‘पूर्वीची चरित्रे अपुरी व अनभिज्ञ वाटल्याने हा नवा ग्रंथप्रपंच’ (पृ १८)’ असा दावा प्रस्तुत लेखकाने केला आहे. लेखक बेळगावचे श्री मधुसूदन गोखले यांनी आपण ४० वर्षे कुटुंबनियोजन क्षेत्रात काम केले आणि १२ वर्षे एका पदव्युत्तर संस्थेत प्राध्यापकी केली, असे सांगितल्यामुळे पुस्तकाबद्दल अपेक्षा उंचावतात.

पुढे वाचा

स्त्री-पुरुष (१९९९ मॉडेल)

आधी ताज्या वैद्यकीय संशोधनाचा आढावा घेऊ –
(क) स्त्रियांची प्रतिरक्षा-व्यवस्था (Immune System) पुरुषांच्या तशाच व्यवस्थेपेक्षा बरीच जास्त प्रमाणात नियंत्रित असते. शरीरात ‘घुसणाच्या बाहेरच्या जीवाणूंशी स्त्रियांची शरीरे जास्त जोमाने लढतात, तर पुरुषांच्या बाबतीत हा प्रतिसाद (तुलनेने) सौम्य असतो. गर्भारपणात मात्र स्त्रियांची प्रतिरक्षा-व्यवस्था बरीच मंदावते, पण बाळंतपण होताच ती पुन्हा पूर्ववत होते. प्रतिरक्षेच्या कार्यक्षमतेतील या चढउतारांचा संबंध स्त्रियांना जास्त प्रमाणात सतावणा-या ल्यूपस (Lupus), संधिवात ‘व मल्टिपल स्क्लेरॉसिस वगैरे आजारांशी लावला गेला आहे. या सर्व आजारांमध्ये शरीरांची प्रतिरक्षा-यंत्रणा शरीराच्याच उपांगांशी झगडू लागते!
(ख) सरासरीने पाहता पुरुषांना ज्या वयात हृदयविकाराचा पहिला झटका येतो, त्यापेक्षा स्त्रियांना असे झटके दहा वर्षे उशीराने येतात – पण झटक्याच्या वेळी वयस्क असल्याने स्त्रिया अशा झटक्यांमुळे दगावण्याचे प्रमाण पुरुषांच्या प्रमाणापेक्षा जास्त असते.

पुढे वाचा

सर्वधर्मसमभाव म्हणजे घाबरगुंडी!

सर्वसाधारणपणे “धर्मनिरपेक्षता” म्हणजे राज्यसत्ता व धर्मसत्ता यांचा काडी-मोड. तसेच वैयक्तिक पातळीवर धर्मनिरपेक्षता म्हणजे नोकरी, धंदा, शैक्षणिक प्रवेश, प्रवास, इ. ‘न-धार्मिक’ क्रियांत धर्म विचारात न घेता वागणूक देणे वा घेणे.
“सर्वधर्मसमभाव” हे मात्र मोठेच गौडबंगाल आहे. धार्मिक बाबतींत सर्व धर्म समानच असतात, त्यामुळे एकाने दुस-याला शिकवण्याचा शहाणपणा करू नये, असे काहीसे त्याचे रूप आहे. “आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरम्”, हे हिंदूंना तसे नवीन नाही. त्यामुळे विविध देवदेवतांची पूजा करण्यातील विरोधाभास दूर होतो. मात्र इतर धर्मांत नमस्कारच नसल्याने तो केशवास कसा पोचतो, किंवा पोचतो का, हे अस्पष्टच राहते.

पुढे वाचा

मराठी भाषेचे चिंताजनक भवितव्य

आजचा सुधारकच्या जून ९९ (१०.३) ह्या अंकामध्ये माझे ‘मराठी भाषाप्रेमींना अनावृत पत्र’ प्रकाशित झाले. त्यावर बरीच उत्तरे आली. त्यांपैकी काही सप्टेंबर ९९ अंकामध्ये प्रसिद्ध झाली. काहींनी ऑगस्टअखेरपर्यंत उत्तर लिहून पाठवितो असे आश्वासन दिले होते पण ती उत्तरे सप्टेंबरअखेरपर्यंत, अजून, आलेली नाहीत, आणि आता येण्याची शक्यताही नाही, म्हणून ह्या चर्चेचा समारोप करण्याची वेळ आलेली आहे. शिवाय आता संपादक बदलले असल्यामुळे हा विषय लवकर आटोपता घेतलेला बरा.

हस्ताक्षर चांगले काढावे हा विवादाचा विषय नाही – पण शुद्धलेखन हा विवादाचा विषय झालेला आहे ह्याची कारणे पुष्कळ आहेत.

पुढे वाचा

राष्ट्रीयतेचा प्रश्न

‘राष्ट्र’ या संकल्पनेचा उगम ‘मातृभूमी व तिजबाबतचे ममत्व यांपासून झालेला असावा. कारण, असे ममत्व जगभरात प्रत्येकासच आपापल्या ‘मातृभूमी’बाबत वाटत असल्याचे दिसते. मायभूमीसाठी जीव ओवाळून टाकणारे असामान्य लोक तर जगात असतातच. पण, वंश-धर्म-भाषाभेद मानणारा व आयुष्यभर परदेशी राहिलेला सामान्यांतला सामान्य माणूस देखील ‘मातृभूमी’चे एकदा तरी दर्शन घडावे म्हणून तडफडत असतो आणि किमान अंत्यविधी तरी ‘मायभूमीतच व्हावा असा ध्यास धरतो. तसेच राष्ट्र-प्रांत-धर्म इत्यादी भिंतींना झुगारणारे बुद्धिप्रामाण्यवादीदेखील तसाच ध्यास धरतात आणि त्यामुळे त्यांनी सकृद्दर्शनी नाकारलेले ‘मायभूमी’बाबतचे ममत्व प्रकट होतेच. म्हणजेच, पूर्वीच्या ‘टोळी’ किंवा ‘राज्य’ या संकल्पनांच्या कक्षा रुंदावत जाऊन आता राष्ट्र ही संकल्पना साकारली आहे.

पुढे वाचा

विवेकवादी विचारसरणी व जीवनपद्धती

[कॅनडामधील एकताच्या जानेवारी १९९९ अंकामध्ये ‘सुधारकाची सात वर्षे’ हा प्राध्यापक प्र. ब. कुलकर्णी यांचा लेख प्रसिद्ध झाला होता. प्रा. प्र.ब. कुळकर्णी ‘आजचा सुधारक’ या मासिकाचे सहसंपादक असून संस्थापक प्रा. दि. य. देशपांडे यांचे पहिल्यापासूनचे सहकारी आहेत. आजचा सुधारक’ मासिक विवेकवाद किंवा बुद्धिवादी विचारसरणीचे, इंग्रजीत “रॅशनॅलिझम”चे म्हणून ओळखले जाते. ह्यामध्ये व्यक्तिस्वातंत्र्य आणि समतावादी दृष्टिकोन समाविष्ट आहे. प्रा. प्र. ब. कुळकर्णी यांचा लेख, तसेच ‘आजचा सुधारक’चे काही अंक वाचनात आले. प्रा. प्र. ब. कुळकर्णी कामानिमित्त अमेरिकेत आले असताना त्यांच्याशी या विषयावर चर्चात्मक गप्पा करायची संधी मिळाली.

पुढे वाचा

संपादकीय

या महिन्यापासून एक लहानसा खांदेपालट होत आहे. श्री. दिवाकर मोहनींनी गेले दीड वर्ष आजचा सुधारकचा मार्ग पुष्कळच प्रशस्त केला आहे. त्यांना थोडी मोकळीक मिळावी ह्यासाठी संपादकीय कामापुरता हा बदल आहे.
आ. सु. बद्दल अनेकांच्या अपेक्षा अनेक प्रकारांनी वाढत आहेत, हे त्याच्या प्रगतीचेच लक्षण आम्ही समजतो. उदाहरणार्थ आ. सु. ने नुसते वैचारिक लिखाण प्रसिद्ध करून न थांबता काहीतरी ठोस करून दाखवावे म्हणजे – शाळांमधून प्रवेश देताना देणग्या उकळणाच्या संस्थामध्ये जाऊन निषेध, घोषणा, धरणे असे उपाय योजावेत. लग्नाकार्यात हुंडा घेणारे, प्रचंड उधळपट्टी आणि श्रीमंती प्रदर्शन करणारे पक्ष असतील त्यांनाही वरील मार्गांनी विरोध करावा इत्यादी.

पुढे वाचा