मासिक संग्रह: जानेवारी, १९९९

पत्रव्यवहार

आजचा सुधारक तरुणांना आवडेल असे काहीतरी करा
संपादक, आजचा सुधारक
नुकतीच ३ आठवड्यांपूर्वी माझी प्रा. प्र. ब. कुलकर्णी यांच्याशी ओळख झाली. त्यांच्याकडून आजचा सुधारक चे काही जुने अंक मला वाचायला मिळाले. ते मला अतिशय
आवडले. विशेषतः आपण लिहिलेले विवेकवादावरचे लेख तर फारच आवडले. सर्वच लिखाण उत्कृष्ट व वाचनीय आहे व त्याचबरोबर विचारप्रवर्तकही आहे. आपले लेख वाचून मनात आलेले विचार मी या पत्राबरोबरच परंतु वेगळे लिहून पाठवीत आहे.
आपण विवेकवादाचा पुरस्कार करून आगरकरांचेच कार्य पुढे चालवत आहात यात शंका नाही. मला स्वतःला आगरकरांबद्दल फार प्रेम आहे.

पुढे वाचा

स्फुट लेख- हजाराची नोट

‘काही वर्षांपूर्वीपर्यंत चालू असलेल्या मध्यंतरी बंद केलेल्या हजाराच्या नोटा पुन्हा सुरू करण्यात आल्या’ अशी बातमी अलिकडेच वाचली. हे काम फार पूर्वीच व्हायला हवे होते. दुसरे महायुद्ध सुरू असताना त्यावेळच्या सरकारला गरज वाटल्यावरून एक रुपयाच्या नोटा प्रसृत करण्यात आल्या आणि चलनवाढीला ख-या अर्थाने सुरुवात झाली. पहिले महायुद्ध सुरू झाले त्यावेळी बाजारातून कवड्या, गंडे, टोल्या यांचे उच्चाटन झाले आणि दुस-या महायुद्धानंतर चांदीची नाणी चलनातून हद्दपार झाली.
खाजगी मालकी जोपर्यंत कायम आहे तोपर्यंत पैशांची गरज पडणारच. पैशाचे स्वरूप मात्र बदलत जाणार आणि धातूच्या नाण्यांच्या ऐवजी किंवा नोटांच्या ऐवजी नुसताच आकडा या खात्यावरून त्या खात्यात हिंडणार.

पुढे वाचा

पाळणाघरे, अपप्रवृत्ती कशी?

आजचा सुधारकच्या डिसेंबर ९८ च्या अंकात (९:९, २७६-२७८), पाळणाघरांची वाढ : एक अपप्रवृत्ती’ हा स्फुट लेख प्रसिद्ध झाला असून, त्यामध्ये याच विषयावर सप्टेंबर १९९८ च्या अंकातील स्फुट लेखावरील वाचकांच्या प्रतिक्रियांना संपादकांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु त्या ताज्या स्फुटात कोणताही नवा मुद्दा अथवा विचार आलेला नाही. या विषयावरील संपादकांची भूमिका अवास्तव, असंतुलित व काहीशी दुराग्रही आहे असे खेदाने म्हणावे लागते. या विषयावरील चालू चर्चेत आम्ही खालील मुद्दे मांडू इच्छितो.

(१) महागाई फार झाली आहे, हा या वर्षीचा नैमित्तिक अपवाद वगळता, म्हणणे खरे नाही.

पुढे वाचा

एक सर्वेक्षण

औद्योगिकीकरण, तंत्रज्ञानाची प्रगती, भांडवली अर्थव्यवस्थेचा रेटा यांमुळे उत्पादनांच्या साधनांचे ध्रुवीकरण झाले असून या आर्थिक चक्रात माणसे अधिकाधिक गुरफटत आहेत, त्यांची कुटुंबे भरडली जात आहेत असे मानून त्याच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसांचे जीवनमान कसे आहे, जगण्याची पद्धत कशी आहे, हे शोधण्याचा प्रयत्न चिं. मो. पंडित यांनी केला आहे.
त्यासाठी त्यांनी एक सर्वेक्षण करावयाचे ठरवले असून त्यासाठीची प्रश्नावली खाली देण्यात आली आहे. वाचकांनी सर्वेक्षणाची ही प्रश्नावली भरून चिं. मो. पंडित यांना पाठवावी ही विनंती. – सं.
दुस-या महायुद्धानंतर जगभर स्वातंत्र्याची आणि समाजवादी लोकशाहीची एक लाटच आली.

पुढे वाचा

पृथ्वीचा कॅन्सर

जमीन, हवा, पाणी या जड पदार्थांसह व विविध प्राणी, वनस्पती, एकपेशीय जीव, यांसह, आपली पृथ्वी हाच एक सजीव पदार्थ आहे ही कल्पना किंवा उपमा आता सर्वमान्य ठरत आहे. या पृथ्वीवरील सर्वच सजीव व निर्जीव घटक एकमेकांवर अवलंबून असतात, एकमेकांवर परिणाम करतात हे आता कोठे आपल्याला समजू लागले आहे. सजीव सृष्टीच्या आगमनापूर्वी पृथ्वीच्या वातावरणात प्राणवायु अजिबात नव्हता, व कबनडायॉक्साइड भरपूर होता. सजीव वनस्पतींनी सूर्यप्रकाश व क्लोरोफिल यांच्या साहाय्याने त्यातील ब-याचशा कार्बनडायॉक्साइडचे रूपांतर प्राणवायू व कार्बन ह्यांमध्ये करून टाकले व वातावरणात प्राणवायूचे प्रमाण जवळपास एकपंचमांश इतके झाले.

पुढे वाचा

श्री. श्याम कुलकर्णी ह्यांच्या पत्राच्या निमित्ताने निसर्गावर विजय मिळविणे हा विज्ञानाचा हेतु नाही

आमचे मित्र श्री. श्याम कुलकर्णी ह्यांचे अनेक दिवसांनतर एक पत्र आले आहे. ते शब्दशः खाली देत आहोत. त्यांच्या पत्राच्या निमित्ताने विवेकवादाच्या काही पैलूंवर पुन्हा
आणि थोडा अधिक स्पष्ट प्रकाश आम्हाला टाकता येईल अशी आशा आहे.]
नियति नव्हे तर दैवगती
‘पुन्हा एकदा नियतिवाद’ या सप्टेंबर १९९८ च्या ‘आजचा सुधारक’ मधील लेखात नियति हा शब्द अयोग्य आहे असे लेखकाचे मत असल्यास त्यास दैवगती हा शब्द वापरता येईल परंतु विश्वातील सर्व घटना नियमबद्ध आहेत असेही म्हणता येत नाही. विज्ञान हे पूर्णपणे नियमबद्ध आहे असे आपण समजतो तरी सर्व वैज्ञानिक सिद्धान्त आदर्श अटी पूर्ण झाल्यासच सिद्ध होतात व त्या आदर्श अटी पूर्ण करणे बरेच वेळा अशक्य कोटीतील असते.

पुढे वाचा

उघड्या तोंडाची जात

“… प्रत्येक देशांत त्या देशाच्या उच्च संस्कृतीची वाहक अशी जी अॅरिस्टॉक्रसी पाहिजे, तशी तयार होण्यास त्या समाजामध्ये स्त्री-पुरुषसंबंध देखील खुला पाहिजे. कारण ज्या समाजांत हा खुला संबंध असतो तो समाज अधिक आकर्षक होतो आणि त्यामुळे त्या समाजांत शिरावे अशी इतरांस इच्छा उत्पन्न होते. “अॅरिस्टाक्रसी’ होऊ इच्छिणा-या समाजाने केवळ लखोटबंद राहून उपयोगी नाहीं तर इतरांना आपणांत समाविष्ट होण्याची संधि दिली पाहिजे आणि आपल्या वर्गात समाविष्ट होण्याची इतरांची इच्छा जिवंत ठेविली पाहिजे. ब्राह्मणांत शिरावे अशी ब्राह्मणेतरांची इच्छा असल्यास त्यांस संधि द्यावी. ब्राह्मण समाज अधिकाधिक आकर्षक करावा व त्या समाजामध्ये इतर जातींतील चांगल्या व्यक्तींना येण्यास संधि मिळावी.

पुढे वाचा