ह्यानंतरच्या भागात वर्मा नैतिकतेच्या अभावामुळे निर्माण झालेल्या सामाजिक तणावाचा मागोवा घेतात. नक्षलवादी चळवळीचा उदय आणि अस्त, जयप्रकाश नारायणांची नवनिर्माण चळवळ, १९७४ चा इंदिरा गांधींनी चिरडून टाकलेला देशव्यापी रेल्वे-संप आणि लगेच पोखरणला केलेली भूमिगत अणुचाचणी आणि सरतेशेवटी आणीबाणी. ह्या सर्व घटनांमधून वर्मा मध्यमवर्गाच्या मनोवृत्तीचे फार चांगले विवरण करतात.
ह्या मनोवृत्तीला ख-या अर्थाने धक्का बसला १९९० मध्ये जेव्हा व्ही.पी. सिंग ह्यांनी मंडल कमिशनच्या अहवालाची अंमलबजावणी करण्याची योजना जाहीर केली. या घटनेमुळे एक आर्थिक-सामाजिक प्रक्रिया वेगाने पूर्णत्वाला पोचण्याची शक्यता निर्माण झाली.. वर्मा म्हणतात, हरित क्रांतीमुळे आणि टेनन्सी कायद्यांमुळे सुस्थितीत आलेले ग्रामीण भागातील कनिष्ठ जातीपैकी काही वर्ग मध्यमवर्गाजवळच्या केकवर हक्क सांगू लागले. आर्थिक सुबत्ता आणि वाढता राजकीय प्रभाव असूनही ह्या वर्गाला सरकारी नोक-यांमध्ये शिरकाव नव्हता.
A job in government signified status, security of tenure, and given the pervasive level of corruption, opportunities for those so inclined to make money. मंडल आयोगामुळे गुणवत्तेवर घाला पडला आहे असा ओरडा करणाच्या मध्यमवर्गीयांबद्दल वर्मा मार्मिकपणे म्हणतात,
It was only when their happy monopoly was challenged that merit, as against the accident of birth on which the reservation policy was based, suddenly became a major ideological issue…. In any case, the argument that Mandal was opposed to merit rang a little hollow since, in the many decades before Mandal, the bureaucracy or for that matter most institutions in the government area, had really not distinguished themselves as symbols of great merit or efficiency.
पण मागासवर्गीयातील हे नवोदित पुढारलेले वर्गही जेव्हा स्वतःचे हितसंबंध अबाधित राखण्यासाठी त्यांच्यातील दलितांकडे दुर्लक्ष करू लागले तेव्हा सामाजिक न्यायाच्या कल्पनेचा खरा पराभव झाला. The truth is that under the garb of social justice the entire Mandal issue was an intra-middle-class struggle for the perks and perquisites that could be seized from the States.
मध्यमवर्गाच्या बाह्य उत्क्रांतीचा आढावा घेतल्यानंतर वर्मा आत वळतात. विसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात असलेल्या भारतीय मध्यमवर्गाच्या मनाची मशागत कोणत्या गोष्टींमुळे झाली, मिळालेल्या वारशाचा वर्तमानकाळाला सामोरे जायला त्याने कसा उपयोग केला ह्याचा ऊहापोह ते करतात. धर्माचा आणि परंपरेचा त्याच्यावर पडलेला प्रभाव, राजकारणाबद्दलची त्याची मते, पाश्चात्त्य जगाबद्दलच्या त्याच्या प्रतिक्रिया आणि कामव्यवहार अशा चार अंगांचा ते विचार करतात. इथे मी फक्त पहिल्या धर्म आणि परंपरा ह्या अंगाचा विचार मांडणार आहे.
भारतातील बहुसंख्य मध्यमवर्ग हिंदु असल्याने फक्त त्या धर्माचीच चर्चा वर्मा करतात. हिंदुधर्मातील व्यक्तीशी निगडित असलेली मोक्षाची कल्पना त्याची सामाजिक बांधिलकीची जाणीव कमकुवत करते. स्वत:च्या आध्यात्मिक उन्नतीत मग्न असल्यामुळे समाजाबद्दलची कळकळ, समाजाशी नाते हे विचार खुरटलेलेच राहातात. व्यक्तीपेक्षा समूह श्रेष्ठ आहे ही कल्पना हिंदु धर्मात शिकवली जात नाही.
हिंदधर्मातील पापाची कल्पना नि:संदिग्ध नाही. कुठल्याही कृतीचे स्पष्टीकरण व्यक्तीला पटेल त्या दृष्टिकोनातून करता येते. ह्या गोष्टींचा व्यक्तीच्या सामाजिक वर्तनावर प्रभाव पडतो. वर्माच्या अभ्यासाचा विषय माणसाच्या सामाजिक जीवनाच्या पैलूंशी निगडित असल्यामुळे धर्माचा सामाजिक आयुष्यावर होणा-या परिणामांचाच ते विचार करतात. आज स्वातंत्र्याला ५० वर्षे झाल्यानंतरसुद्धा आपल्या आजूबाजूच्या वातावरणाबद्दल, समाजाबद्दल मध्यमवर्गीय माणसाला वाटणारे औदासीन्य आश्चर्यकारक आहे. गरीब आणि गरिबी ह्यांबद्दल वर्मा लिहितात – The poor have been around for so long that they have become a part of the accepted landscape. Since they refused to go away and could not be got rid of, the only other alternative was to take as little notice of them as possible. This myopia had its advantages : the less one noticed, the less reason one had to be concerned about social obligations; and the less one saw, the less one needed to be distracted from the heady pursuit of one’s own material salvation…. The end product was the acceptance of a certain kind of lifestyle : insular, aggressive, selfish, obsessed with material gain and socially callous.
नागरी जबाबदा-या झटकून टाकायला मध्यमवर्गाने कुंपणे बांधली, भिंती बांधल्या. पाणी नाही? ट्यूबवेल खणा, मोठी टाकी बांधा, म्युनिसिपालिटीच्या पाण्याच्या पाईपमधून खाजगी पंपाने पाणी खेचून घ्या – इतरांना पाणी नाही मिळाले तर तो त्यांचा प्रश्न आहे. वीज-पुरवठा नीट होत नाही ? जनरेटर घ्या, सब-स्टेशनमधल्या अधिका-याला लाच देऊन लोड वाढवून घ्या. शहरातील घाण, चोप्या, प्रदूषण हे झोपडपट्टयांतील लोक करतात असा मध्यमवर्गीयांचा लाडका समज आहे. गरीब वस्तीमध्ये दरडोई ०.३ kg. कचरा रोज निर्माण होतो, मध्यमवर्गीय अथवा श्रीमंत वस्तीमध्ये दरडोई १.५ kg. पेक्षा जास्त कचरा रोज तयार होतो, शिवाय गरीब वस्तीतला बराचसा कचरा bio-degradable असतो. वानगीदाखल एवढे उदाहरण पुरे आहे. सगळा दोष सरकारी यंत्रणेच्या अकार्यक्षमतेवर टाकून आपली जबाबदारी झटकली जाते. आत्मचिंतन नाही, आत्मपरीक्षण नाही.
ह्या अशा जीवनपद्धतीत धर्म कुठे बसत होता ? धार्मिक विधी, सण-वार करण्याची वृत्ती जरा कमी झाली तरी स्वतःची धार्मिक ओळख असण्याची गरज तीव्रतेने वाढत चालली. ह्याची काही कारणे वर्मा सांगतात. १) एकत्र कुटुंबपद्धतीचा हास झाल्याने मोठ्या कुटुंबामुळे येणारा सुरक्षिततेचा भाव कमी झाला. त्यामुळे अशा एका संस्थेची गरज वाढायला लागली जी सामान्य वर्गापलिकडची असेल, जिथे समान श्रद्धेचे, परंपरेचे लोक असतील, जिच्यामुळे समूहाचा आपण एक भाग आहोत ही जाणीव बळकट होईल. (२) ब-याच मध्यमवर्गीय कुटुंबांनी एका पिढीत खूप वेगाने झालेले खूप बदल भोगले. आजूबाजूचे वातावरण अनोळखी होत गेले. अशा परिस्थितीत काहीतरी स्थिर, ओळखीचा, सहज समजणारा असा आधार हुवा होता तो मध्यमवर्गाने धर्मात शोधला. (३) स्पर्धेच्या, संघर्षाच्या वातावरणातले आजूबाजूचे जग आपल्या विरोधात आहे, प्रतिकूल परिस्थितीत आपण एकटे आहोत ही जाणीव वाढत असल्यामुळे व्यासाच्या भ्रष्ट जगापासून दूर, जिथे आक्रमकता नसेल, शांती असेल तिथे आश्रयाला जाण्याची भावना वाढली. (४) नवीन धर्मांतर केलेले लोक जसे जास्त कट्टर असतात तसे मध्यमवर्गात नवीन दाखल झालेल्या समूहांना आपला हक्क प्रस्थापित करण्यासाठी धर्माची भाषा वापरणे सोपे वाटले. आदर्शवादाच्या मतप्रणालीपेक्षा ही ओळख जास्त परिणामकारक होती.
अशा त-हेने धर्माकडे कल वाढणे ह्यात काहीच वावगे नव्हते पण त्यात एक धोका होता. ज्या देशात एकापेक्षा जास्त धर्म होते तेथे हा कल इतर धर्माच्या संबंधात लढाऊ होण्याची शक्यता होती. ६ डिसेंबर १९९२ ला तेच झाले. धार्मिक भावना भडकवल्या गेल्या आणि बाबरी मशीद पाडण्यात आली. न्याय्यबुद्धीने विचार केला तर हे मान्य केलेच पाहिजे
की ब-याच मध्यमवर्गीयांना हे अतिरेकी कृत्य योग्य वाटले नाही. पण हेही मान्य केले पाहिजे की बी.जे.पी. च्या हिंदत्वप्रचाराला बळी पडलेले बरेच जण नवमध्यमवर्गीय होते. अल्पसंख्यकांचे तुष्टीकरण, गर्व से कहो हम हिंदू हैं ह्या कल्पनांना ब-याच मध्यमवर्गीयांचा पाठिंबा होता. नेहरूंच्या सेक्युलॅरिझमचा सर्व राजकीय पक्षांनी मिळून नि:पात केल्यावर बी.जे.पी च्या धर्माच्या राजकारणाला मोकळे कुरणच सापडले आणि परधर्मीयांच्या आक्रमकतेचा धोका दाखवणारे हुकमाचे पान खेळून त्यांनी जनमत भडकवले. बाबरी मशीद पडल्यावर जुन्या पिढीतल्या नेहरूंच्या समाजवादावर पोसलेल्या मध्यमवर्गाला धक्का बसला, अपराधी वाटले पण पश्चात्ताप झाला नाही. Instead – and this is important — there was in many cases an attempt to overcome guilt by a two-step manouvre : condemnation of the act of demolition, and an even more militant assertion of the reasons justifying the rise of Hindu assertiveness.
ह्या घटनेनंतर शहरी मध्यमवर्गामध्ये धर्म आणि धार्मिक गोष्टींमधला रस वाढतो आहे. ह्याची एक खूण म्हणजे टीव्हीवर धार्मिक मालिका (serials) वाढत चालल्या आहेत. बी.जे.पो.. शिवसेना ह्यांसारख्या धार्मिक इश्युचे राजकारण करणा-या पक्षांना शहरी मध्यमवर्गीय मतदारसंघात पाठिंबा मिळतो आहे. धार्मिक उद्दामपणाला बळी पडणान्यांमध्ये स्त्रिया जास्त आहेत ही काळजी करण्यासारखी परिस्थिती आहे याची जाणीव अनेक विचारवंतांना अभ्यासकांना आहे–जर्मनीमध्ये नाझिझमचा प्रभाव वाढत असताना जी परिस्थिती होती ती भारतात आहे हे वर्मा अनेक उतारे उद्धृत करून दाखवून देतात. फॅसिझमचा धोका पासष्ट वर्षांपूर्वी नेहरूंच्या पण लक्षात आला होता. ते लिहितात –
But the real drive towards fascism will naturally come from the younger members of the middle-class…. This nationalist middle-class is a favourable field for the spread of fascist ideas…. If British control were wholly removed, fascism would probably grow rapidly. Supported as it would certainly be by the upper middle class and the vested interests.
शेवटच्या प्रकरणाला The Writing on the Wall हे अर्थपूर्ण नाव वर्मा देतात. पुस्तकाच्या सुरुवातीला इक्बालच्या ज्या ओळी लिहिलेल्या आहेत त्या ह्याच संदर्भातल्या
आहेत –
वतन ‘ की फिक्र कर नादान,
मुसीबत आनेवाली है
तेरी बरबादियों के मश्वारे हैं आसमानों में
ना समझोगे तो मिट जाओगे ऐ हिंदोस्ताँवालों
तुम्हारी दास्ताँ भी ना होगी दासतानों में
१९९१ च्या खुल्या आर्थिक धोरणानंतर पहिल्यांदा भारतीय मध्यमवर्गाचा संख्याशास्त्रीय अभ्यास केला गेला. सुरवातीला उत्साहाने मांडलेले सर्व ताळेबंद चुकीचे असल्याचे लक्षात आले. गरीब देशातल्या मध्यमवर्गाची तुलना पाश्चात्त्य मध्यमवर्गाशी केल्याने सगळे अंदाज फसले होते. ह्या वर्गाची माल विकत घेण्याची क्षमता अगदी कमी असल्याचे उत्साहाने इथे आलेल्या मल्टी-नॅशनल कंपन्यांना लगेचच जाणवले. केवळ ग्राहक म्हणून मध्यमवर्गाचा विचार करताना त्याच्या इतर अनेक स्वभावविशेषांकडे दुर्लक्ष केले गेले. अर्थव्यवस्था खुली केल्याने दुहेरी चूक झाली – First it gave to the middle class an economic clout that it could
*१. स्वदेश, २ कटकारस्थाने ३. कहाणी (येथे उल्लेख) ४. कथा (यथ इतिहास)
not possibly possess in a country as poor as India; and second,… if failed to take into account what the policies of liberalisation would do to a class which was already morally rudderless, obsessively materialistic and soci and socially insensitive.
खुल्या अर्थव्यवस्थेमुळे consumerism ला एक सामाजिक दर्जा प्राप्त झाला आणि सुरवातीला त्याबाबत असणारी अपराधीपणाची भावना नष्ट झाली. In a sense, it was the collective exorcism from the nation’s psyche of the repressive and life-denying nature of Gandhi’s idealism’.
ऐहिक उपभोगांना आता कुठलेच बंधन उरले नाही. १९९६ मध्ये भारतभेटीला आलेल्या नोम चोवस्कीने म्हटले – “The lifestyle of the Indian elite is amazing. I have never seen such opulence even in America.’ प्रसारमाध्यमातून ह्या नव्या प्रवृत्तीचे कौतुक व्हायला लागले. शहरी जीवनपद्धतीचा चेहराच बदलून गेला. पिढ्यानपिढ्या चालत आलेली पारंपरिक अर्थव्यवस्था मध्यमवर्गीय घरातून नाहीशी होत चालली. कर्जाची भीती गेली. हप्त्याने वस्तू घेणे, क्रेडिट कार्डचा सर्रास वापर करणे ह्या गोष्टींची नवलाईच संपली. घरबसल्या T.V. वरच्या जाहिराती पाहून फोनवरून वस्तू खरेदी करता येऊ लागल्या. T.V. ही केवढा बदलला. फक्त दूरदर्शन बघू शकणारे प्रेक्षक आता ५० चॅनेल्स हाताळू लागले, आणि पडद्यावर झळकू लागले उच्च मध्यमवर्गीय, कॉस्मॉपॉलिटन, श्रीमंत आणि शहरी जग. I. Me. Enjoy. For this moment Enjoy. Nothing exists that can’t be co-opted into this circle of consumption.
ह्या सगळ्याचा मुलांवर होणारा परिणाम अटळ आहे. आउटलुक ह्या नियतकालिकाच्या मते “Superbrats’ ची एक नवी पिढीच T.V. मुळे तयार होते आहे.
डोळ्यांवर नवी झापडे चढलेल्या मध्यमवर्गाला चांगल्या पगाराची नोकरी, बढती, प्रवास, सुट्या ह्या त्याच्या स्वप्नरंजनामध्ये २।। कोटी भारतीय रोज अर्धपोटी झोपतात, दर तीन मिनिटाला एक बालमृत्यू होतो अशांसारख्या गोष्टी न दिसल्या तर नवल नाही. दरिद्री आणि दारिद्रय ह्यांकडे दुर्लक्ष करण्याची सवय तर त्याला पहिल्यापासून होतीच. ह्या दुस-या भारताशी त्याच्या भारताचा काही संबंधच नव्हता.
वर्मा म्हणतात, मध्यमवर्गाला आता स्वतःला प्रश्न विचारायची वेळ आली आहे की Can such a polorized world be sustained in perpetuity ? A nation, in spite of its many particularities, is an indivisible whole. Unless all parts of it are part of a national consensus, unless all its people become part of a process of empowerment, and unless all its citizens feel they are part of a common destiny, no one class within it can sustain the illusion of progress for long.
फक्त आजचा विचार न करता दूरच्या भविष्याचा विचार करायचा असेल तर मध्यमवर्गाला बेट बनून राहणे सोडून द्यावे लागेल. आजूबाजूच्या समाजाचा विचार करावाच लागेल. परोपकाराची कल्पना मध्यमवर्गाला आता पटणार नाही पण स्वार्थ साधण्यासाठी तरी त्याला आपले धोरण बदलावे लागेल.
इतर देशांनी स्थैर्य कसे कमावले, स्वतःची प्रगती कशी केली ह्याची उदाहरणे वर्मा देतात. महत्त्वाची गोष्ट ही लक्षात येते की ह्या सर्व देशांनी शिक्षणात गुंतवणूक केली. साऊथ कोरिया प्राथमिक शिक्षणावर दरडोई १३० डॉलर्स वर्षाला खर्च करतो, मलेशिया १२८ डॉलर्स, भारत ९, पाकिस्तान ३, बांगलादेश २. १९६० साली साऊथ कोरियातले साठ टक्क्यांपेक्षा जास्त लोक शिक्षणापासून वंचित होते, १९८० पर्यंत ही टक्केवारी १२ टक्क्यांपर्यंत खाली आली. सविस्तर आकडेवारी देऊन वर्मा शेवटी गालब्रेथची कॉमेंट सागतात – In this world there is no literate population that is poor, no illiterate population that is other than poor.
शहाणा स्वार्थ आणि समाजातील नैतिक गुंतवणूकच आपल्याला तारून नेऊ शकेल. भांडवलशाहीचा श्रेष्ठ प्रतिनिधी असलेल्या अमेरिकेतही गेली काही वर्षे समाजाचा विचार, समाजाची चिंता हे चर्चेचे विषय झाले आहेत. नफा हीच नैतिकता असणा-या त्या देशात जेव्हा तोटा होतो म्हणून कामावरच्या अनेक माणसांना काढून टाकले तेव्हा आर्थिक व्यवहाराचा हेतू काय? त्याचा अर्थ काय? ह्याबाबत मोठे विचारमंथन झाले. न्यूयॉर्क टाईम्ससारख्या वर्तमानपत्रात त्याच्यावर लेखमाला आल्या. सामाजिक जबाबदारी हा विषय शाळेच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला. हे आपल्याकडे कितीतरी गांभीर्याने व्हायला पाहिजे, अशी समाजाची चिंता करणारा नागरिक कसा घडवायचा? शिक्षण, आरोग्य आणि दारिद्रयनिर्मूलनाचे ऐच्छिक आणि सरकारच्या मदतीशिवाय केलेले प्रकल्प मोठ्या प्रमाणावर हातात घेतले पाहिजेत. वेगवेगळे उद्योजक TISCO, Bajaj, INDAL सारखे हे काम करत आहेत. अशी अनेक उदाहरणे वर्मा देतात. आपल्या आजूबाजूलाही कितीतरी लोक त्यांना झेपेल तशा लहान मोठ्या प्रमाणावर ही कामे करतात, पण अभिजनवर्गाने अशा कामांत रस घेतला तर त्यांच्या जीवनपद्धतीचे अनुकरण करणा-या मध्यमवर्गातील एका मोठ्या वर्गाच्या मनोवृत्तीत बदल होऊ शकेल.
समाजाची चिंता करणारया व्यक्तींची संस्थांची एकजूट व्हायला हवी असे वर्माना वाटते. नागरी मध्यमवर्गाच्या सामाजिक जीवनात अशा छोट्या-मोठ्या कल्याणकारी संस्था अनेक असतात. अपार्टमेंट ब्लॉक्समध्ये, कॉलनीमध्ये अशा ‘सोसायट्या असतात, मंडळे असतात, रोटरी, लायन्स, जेसीजसारखे क्लब्ज असतात. स्वतःच्या कल्याणाचा विचार न सोडता त्यांना थोड्या प्रमाणात सर्व समाजाच्या कल्याणाचा विचार करायला प्रवृत्त करता येईल. वर्माना वाटते की दुस-याकरता काहीतरी केल्याचा एकदा अनुभव घेतला तर माणूस तो विसरत नाही. अशा त-हेने ‘दसण्या भारताशी एकदा संबंध आला की त्याचे दारिद्रयाचं कोरडं संख्याशास्त्र हे रूप बदलून ते एका ओळखीच्या विशिष्ट व्यक्तीचे वर्णन होते.
पुस्तकाच्या शेवटी वर्मा स्पष्ट करतात की चांगल्या सुखासीन आयुष्याची हेटाळणी करण्याचा पुस्तकाचा हेतू नाही, पण आजूबाजूच्या वास्तवाकडे डोळेझाक करून स्वत:च्या सुखाच्या विचारातच मग्न राहण्याला मात्र त्यांचा विरोध आहे. सामान्य भारतीयाला महात्मा गांधी करण्याचा उद्देश नाही पण त्यांची गरिबांबद्दलची तीव्र कळकळ आणि सध्याच्या मध्यमवर्गाचा निगरगट्ट आत्मतुष्टपणा ह्यांतल्या सुवर्णमध्याकडे पोचण्याकरता पहिले पाऊल तरी टाकायला हवे असा इशारा आहे.