ललिता गंडभीर, स.न.
‘आजचा सुधारक’मधील ‘समाज आणि लोकशाही’ हा लेख प्रभावी वाटला. महाराष्ट्रातल्या मध्यमवर्गीयांचा लोकशाही पद्धतीवरचा (आणि एकूणच जीवनावरचा) विश्वास उडत चालल्याचा भास होतो. हे विधान परंपरेने विचारी असलेल्या मध्यमवर्गास लागू होते. त्यांतले बरेचसे अमेरिकेकडे डोळे लावून असतात. त्यांच्या हा वाचनात यायला हवा असे वाटले. म्हणून तो ‘रुची’च्या पुढील अंकात (दिवाळी विशेषांक – प्रसिद्धी ३० ऑक्टोबर) समाविष्ट करावा अशी इच्छा आहे. अनुमतीसाठी हे पत्र आपणास लिहिले आहे.
सुधारक’मधील आपले लेखन वाचत असतो.‘रुची’मध्ये काही लेख पुनर्मुद्रित करीत असतो. पूर्वी यासाठी ग्रंथमाला’ नावाचे नियतकालिक असे. हल्ली त्याची गरज परत वाटते.
‘रुची’ आपल्या पाहण्यात कधी येते का?या दिवाळी अंकासाठी एक विषय (सोबत टिपण) घेऊन काही लेखन जमा करीत आहोत. काही दुरार्थाने आपला विषय (लेखाचा) त्यात येतो असेही वाटले.
कळावे.