मासिक संग्रह: डिसेंबर, १९९७

ग्रंथ-परीक्षण

नववसाहतवाद आणि आधुनिक भारत, लेखक : डॉ. गोपाळ राणे, प्रकाशक : कालिंदी राणे, गोरेगाव, मुंबई-६२, प्रकाशनाचे वर्ष : १९९५, पृष्ठसंख्या : २९७, किंमत रु. २५०
मराठी अर्थशास्त्र-परिषदेचे ‘उत्कृष्ट-पुस्तक’ पारितोषिक प्रा. राणे यांच्या ‘नववसाहतवाद आणि आधुनिक भारत’ या ग्रंथाला १९९५-९६ या वर्षासाठी बहाल करण्यात आले. हे एक सरळ-सोप्या भाषेत लिहिलेले, भरपूर माहिती देणारे, असे वाचनीय आणि संग्रही ठेवण्यासारखे पुस्तक आहे. आधीच्या चुकांची पुनरावृत्ती होऊ नये ह्या दृष्टीने इतिहासाचा अभ्यास केला जातो. भारताच्या आर्थिक इतिहासात मात्र १६०९ पासून इंग्रजांच्या आर्थिक धोरणातले धोके वेळीच लक्षात न घेतल्यामुळे त्याच त्याच चुका झाल्याचे, अजूनही होत असल्याचे प्रा.

पुढे वाचा

प्राथमिक उर्दू शाळामधील मुलींचे शिक्षण

समाजातील स्त्री शिक्षणविषयक स्थितीचा अभ्यास करावा आणि अभ्यास करता करताच काही कृती कार्यक्रम घ्यावे या उद्देशाने आम्ही मुलींच्या शिक्षणासंबंधी काम सुरू केले. भारतीय शिक्षणसंस्थेने यासाठी पुढाकार घेतला आहे.
मुलींच्या शिक्षणविषयक स्थितीचा अभ्यास करण्यासाठी आम्ही दोन उर्दू प्राथमिक शाळा निवडल्या. त्यात एक सरकारी आणि एक खाजगी शाळा निवडावी असे आम्हीठरवले होते. मात्र खाजगी शाळेने शाळा अभ्यासासाठी घ्यायला परवानगी नाकारली.. मात्र एक गोष्ट याबाबतीत विशेष वाटली ती म्हणजे या खाजगी शाळेच्या संस्था चालकांपैकी सर्वच सदस्याचे मत परवानगी नाकारण्याचे नव्हते. काही सदस्यांना वाटत होते की, या शाळेत बाहेरच्या काही सामाजिक आणि शिक्षणात संशोधन करणार्या.

पुढे वाचा

माध्यम कोणते असावे, मातृभाषा की इंग्लिश?

काय ग, कुठल्या कॉलेजात मिळाली तुला अॅडमिशन?
(पुण्यातल्या एका नामवंत महाविद्यालयाचे नाव घेऊन) तिथे मिळाली आणि हॉस्टेलमध्ये पण मिळाली.
छान, रूम पार्टनर कोण मिळाली आहे? चांगली आहे ना?
आहे बाई कुणीतरी मराठी मीडियमची, नाव पण अजून विचारलं नाही.
म्हणजे?
अग, होस्टेलप्रवेश मिळालेल्या मुलींमध्ये तीन मुली सोडून सगळ्या माझ्यासारख्या इंग्लिश मीडियमच्याच आहेत. त्या तिघींना कुणी पार्टनर म्हणून घेईना. मग रेक्टरनी त्यांतल्या दोघींना एक खोलीत टाकलं. तिसरीचं काय करायचं?मला दयाआली आणि मी तिला रूम पार्टनर म्हणून घ्यायला कबूल झाले झालं!
हा चुटका पुष्कळ वर्षांपूर्वी भाषा आणि जीवन मध्ये वाचला होता.

पुढे वाचा

ब्रेन-ड्रेन – दुसरी बाजू

संपादक आजचा सुधारक, नागपूर.
स.न.वि.वि.
ऑक्टोबर महिन्याचा आजचा सुधारक वाचला. या अंकातील पान २१८ वरील ‘कावळे आणि कोकिळा’ हा सुभाष म, आठले, कोल्हापूर, यांचा लेख छापून आपण आपल्या मासिकास खालच्या दर्जावर उतरविले आहे. कोणतीही आकडेवारी किंवा संशोधन याचा आधार न घेता, प्रस्तुत लेखकाने अतिशय बेजबाबदार विधाने केलेली आहेत. उपमेचा आधार घेऊनही लेखकाला नेमक्या सामाजिक वैगुण्यावर बोट ठेवणे जमलेले नाही. एखाद्या ‘मिसफिट’ ठरलेल्या व्यक्तीवरून जर लेखकाचा मानसिक उद्रेक बाहेर पडलेला असेल तर त्या ‘मिसफिट्’ केसबद्दल विस्तृत माहिती उदाहरणादाखल त्याने द्यावयास हवी होती.‘कुतरओढ’

पुढे वाचा

माध्यमिक शिक्षणाची सुधारणा

भारतात विज्ञान आणि तंत्रज्ञान (Science and Technology) या क्षेत्रांत, जगातील सर्वाधिक प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध आहे असा दावा वारंवार करण्यात येतो. त्याचप्रमाणे इंग्रजी लेखन-वाचनास सक्षम अशा सुशिक्षितांची संख्याही, जगातील २-३ इंग्रजी-भाषिक राष्ट्रे वगळता, भारतात सर्वाधिक आहे असेही सांगण्यात येते. परंतु प्रत्यक्षात हे दावे सयुक्तिक नाहीत असेच जाणवते. दहावी-बारावीच्या परीक्षांमध्ये होणारी प्रचंड कत्तल व महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या बहुसंख्य विद्यार्थ्यांचे भाषा, गणित आणि विज्ञान या प्रमुख विषयांबरोबरच इतिहास, भूगोल यांसारख्या मानव्यविद्येतील प्रकांड अज्ञान व अनास्था पाहिली म्हणजे चिंता वाटू लागते. कोणत्याही भाषेत शेदोनशे शब्दांचे मुद्देसूद लेखन आमच्या महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना येत नाही, तसेच त्यांची आपल्याच देशाची इतिहास-भूगोलविषयक जाण नगण्य असल्याचे आढळते.

पुढे वाचा

पुन्हा एकदा सत् आणि सत्य

कोणत्याही भाषेत अनेक शब्द असे असतात की त्यांना एकाहून अधिक अर्थ असतात; आणि तसेच अनेक शब्द असेही असतात की दोन शब्दांचा एकाच अर्थाने उपयोग होऊ शकतो. सर्व नैसर्गिक भाषांमध्ये ही गोष्ट दिसून येते. सामान्यपणे याने काही बिघडते असे म्हणता येत नाही. एवढेच नव्हे तर साहित्यात ही गोष्ट अनेक दृष्टींनी उपकारक होते. अलंकार आणि वैचित्र्यनिर्मिती यांच्याकरिता ही गोष्ट उपयोगी पडते. परंतु जिथे शब्दांचा आणि अर्थाचा नेमकेपणा अपेक्षित असतो (उदा. विज्ञानात), तिथे मात्र वरील गोष्ट दोषास्पद म्हणावी लागते. शास्त्रीय भाषेचा आदर्श एका शब्दाला एकच अर्थ आणि एका अर्थाचा वाचक एकच शब्द हा आहे.

पुढे वाचा

भारतीय स्त्रीजीवन

अर्थार्जन करणाच्या सर्वच स्त्रिया स्वतंत्र असत नाहीत. बहुतेक कुटुंबांमधून बायकोचा पगार हा पुरुषाच्या मिळकतीचाच भाग समजला जातो. महिन्याच्या महिन्याला बायकोने आपला पगार नवर्याोच्या हातात ठेवावा, असा दंडकही या घरांत आढळतो. त्या पगारातून हातखर्चाचे पैसे आधी ठेवून घेण्याची सवड कधी बायकोला असते, तर कधी तिचा पगार हातात आल्यावर त्यातून नवरा तिला हातखर्चाचे पैसे देतो; कधी तिच्या खर्चाला कात्री लावण्याचा प्रयत्न तो करतो आणि स्त्री खंबीर नसल्याने तो प्रयत्न यशवीही होतो. पैशाच्या व्यवहारांत बहुतेक पुरुष काटेकोर तर स्त्रिया बेपर्वा असतात. दोघांच्या समाइक मिळकतीने घर किंवा फ्लॅट घेतल्यास तो बहुधा नवर्या च्या नावावर असतो.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

स्वेच्छामरण चळवळीचा आरंभ व्हायलाच हवा!
‘स्वेच्छामरण : राष्ट्रव्यापी मोहीम सुरू करण्याची गरज’ हा आजचा सुधारक सप्टेंबर ९७ मधील लेख वाचला. लेखाच्या विषयाबद्दल कोणतेही दुमत नाही. फक्त स्वेच्छामरण ह्या शब्दाच्या विविध छटा आणि ते स्वीकारण्याचे नियोजित मार्ग याविषयी काही मुद्दे मांडावेसे वाटतात.
आयुष्य पुरेसे जगून झाल्यानंतर म्हणजेच त्यातील स्वारस्य कमी झाल्यानंतर मरण स्वीकारण्याचा मार्ग कायद्याने मोकळा असावा आणि नसला तर तो करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. ती वेळ आता आली आहे हे निश्चित. पण त्यासाठी आत्महत्येकरिता पोटॅशियम सायनाईड पुरविण्यापेक्षा सांगलीचे वि.रा. लिमये यांनी सुचविलेली महानिर्वाण गृहे व त्यांच्या माध्यमातून तज्ज्ञांकरवी दिले जाणारे विनायास मरण ही कल्पना अधिक व्यवहार्य वाटते.

पुढे वाचा