आस्तिक/नास्तिक

नास्तिकांचे दोन प्रकार असतात. एक म्हणतात ईश्वर नाही. ते सरळ बोलत असतात. दुसरे बिरबलाप्रमाणे वक्रोक्तीने बोलतात. बिरबल म्हणतो की बादशहाचा पोपट खात नाही, पीत नाही, बोलत नाही, श्वास घेत नाही, चोच वासून उलटा पडला आहे. पण तो स्पष्टपणे “पोपट मेला आहे’ असे म्हणणार नाही. तसेच काही नास्तिक “ईश्वर निराकार, निर्गुण, निर्विकार, इंद्रियगम्य नसलेला, व सर्वव्यापी – म्हणजे खास कोठेही आहे सांगता येणार नाही असा आहे असे म्हणतात. ते स्वतःला आस्तिक म्हणवून घेतात; पण खरे म्हणजे तेईश्वर नाही हेच विधान वेगळ्या शब्दात करत असतात. ज्याला आकार नाही, बुद्धी नाही, जो चांगलाही नाही व वाईटही नाही, जो विचार करूशकत नाही, ज्याला स्तुती केलेली किंवा शिव्या दिलेल्या कळत नाही, जोरागावतही नाही व जो प्रसन्नही होऊ शकत नाही, ज्याचे ठिकाण सांगता येणार नाही, जो मूर्तीमध्ये व विष्ठेमध्ये सारख्याच प्रमाणात वास करतो असा ईश्वर आहे म्हणणे हे नाही म्हणण्यासमानच आहे.

मग खरा आस्तिक कोणाला म्हणायचे? खन्या आस्तिकाचा ईश्वर सगुण, विकारी, न्यायी किंवा अन्यायी, प्रार्थनेने प्रसन्न होणारा, शाप देणारा, निदान पुण्यवान माणसाला बक्षीस देणारावपापी माणसाला शिक्षा देणारा, पुनर्जन्म कोणत्या योनीत मिळावा हे ठरणारा, किंवा जन्मांच्या फेर्यासतून सोडवणारा, किंवा स्वर्ग-नरक देणारा, वजरी सर्वव्यापी असला तरी काही खास जागी (मूर्ति, मंदिर, मशीद, चर्च, स्तूप, पवित्र शहर वगैरे) जास्त तीव्रतेने वास करणारा असा असतो. या सर्वच कल्पना प्रत्येक आस्तिकाला मान्य असतील असे नाही, पण यापैकी एक जरी कल्पना ज्याला मान्य असेल त्याला आस्तिकच मानावे लागेल.

प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानामध्ये नास्तिकता, म्हणजेच निर्गुण निराकार ईश्वराची कल्पना, मोठ्या प्रमाणावर मान्य झाली आहे. पण जवळ जवळ सर्वच प्रमुख आचार्यांनी ही कल्पना सर्वसामान्य माणसाच्या पचनी पडणार नाही असे तसा प्रयत्न न करताच ठरवले, व सर्वसामान्य माणसासाठी सगुण परमेश्वर दिला, वस्वतःही ढोंगीपणाने सगुण पूजा-प्रार्थना चालू ठेवली.

या दुटप्पीपणाची, ढोंगाची,वसर्वसामान्य माणसाच्याबुद्धिमत्तेविषयी समाजाच्या आचार्यांनी बाळगलेल्यांतुच्छतेची फळेआपला समाजआतापर्यंतभोगत आला आहे, वयापुढेही भोगणार आहे.
आता तरी निदान नास्तिक व्यक्तींनी ईश्वर नाही ही कल्पना, किंवा (तसे मानणार्याब) नास्तिकांनी निराकार निर्गुण ईश्वराची कल्पना ठामपणे मांडली पाहिजे, सगुण ईश्वराच्या कल्पनेचा शक्य तेव्हा, शक्य तेथे व शक्य तितका धिक्कार केला पाहिजे, व मुलांना वाढवताना व शिक्षण देताना सगुण ईश्वराच्या कल्पनेची बाधा मुलांना होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातही या दुटप्पीपणाने गोंधळ घातला आहे. आत्मा, पुनर्जन्म व मोक्ष किंवा निर्वाण या कल्पना जर अमान्य केल्या तर भारतीय तत्त्वज्ञानात काय शिल्लक रहाते हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.

मूर्तिपूजेचा अर्थही फक्त “मूर्तीची पूजा करणे’ असा संकुचित अर्थन घेता एखादी मूर्ति, दगड, झाड, प्राणी, जागा, वास्तु, शहर अथवा ग्रंथ हे पूजनीय आहेत, पवित्र आहेत, किंवा तेथे ईश्वराचे वास्तव्य आहे, असे समजणारे सर्वच जण मूर्तिपूजक मानले पाहिजेत.

या व्याख्येप्रमाणे हिंदू, मुस्लिम, ज्यू, ख्रिश्चन, आदिवासी, शीख, जैन, बौद्ध, हे सर्वच मूर्तिपूजक आहेत. कारण आपापल्या पवित्र वस्तूच्या पावित्र्याच्या रक्षणार्थ हे सर्वच आपले व दुसन्याचे रक्त सांडण्यास सदैव तयार असतात.

याउलट मानवाचे, व त्यासाठी पृथ्वीवरील सर्वच जीवांचे व पर्यावरणाचे, सध्याचे व भविष्यकाळातील हित पाहणे व साधणे, हा एकमेव निकष नास्तिक माणसाच्या वागणुकीला व नीतीला लावता येतो.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.