संपादक, आजचा सुधारक,
यांस,
जुलै १९९७ च्या आजचा सुधारक च्या अंकात ‘वैज्ञानिक रीत’ हा डॉ.र. वि. पंडित यांचा लेख वाचण्यात आला. या लेखात डॉ. पंडित यांनी विश्वाबद्दलची त्यांची धारणा मांडताना काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांविषयी थोडेसे.
र. वि. पंडित ह्यांचे ‘विश्व बहुतांशी खगोलशास्त्रज्ञांना आज तरी तत्त्वतः मान्य नाही. आजमितीस विश्वाची उत्पत्ती ही एका प्रचंड स्फोटामुळे झाली असे शास्त्रज्ञ मानतात. त्यानंतर विश्व हळूहळू थंड होत गेले आणि त्याचे आजचे तपमान -२७०° से. (कोबे उपग्रहावरील प्रयोगातून मोजलेले) आहे.
डॉ. र. वि. पंडित ह्यांची संकल्पना ही हॉईल-नारळीकर यांच्या ‘जैसे थे’ (steady State) संकल्पनेसदृशआहे.
मासिक संग्रह: सप्टेंबर, १९९७
आस्तिक/नास्तिक
नास्तिकांचे दोन प्रकार असतात. एक म्हणतात ईश्वर नाही. ते सरळ बोलत असतात. दुसरे बिरबलाप्रमाणे वक्रोक्तीने बोलतात. बिरबल म्हणतो की बादशहाचा पोपट खात नाही, पीत नाही, बोलत नाही, श्वास घेत नाही, चोच वासून उलटा पडला आहे. पण तो स्पष्टपणे “पोपट मेला आहे’ असे म्हणणार नाही. तसेच काही नास्तिक “ईश्वर निराकार, निर्गुण, निर्विकार, इंद्रियगम्य नसलेला, व सर्वव्यापी – म्हणजे खास कोठेही आहे सांगता येणार नाही असा आहे असे म्हणतात. ते स्वतःला आस्तिक म्हणवून घेतात; पण खरे म्हणजे तेईश्वर नाही हेच विधान वेगळ्या शब्दात करत असतात.
बाराला दहा कमीः अण्वस्त्रांचे महाभारत
एखाद्या भाषेचे सामर्थ्य त्या भाषेत ज्ञान-विज्ञान-तत्त्वज्ञान किती लिहिले गेले आहे यावरून दिसते. तिच्यात जर सूक्ष्म वैचारिक विश्लेषण करता येत असेल, गुंतागुंतीच्या कल्पना चोखपणे मांडता येत असतील, अमूर्तातील अमूर्त भेद दाखविता येत असतील, विचारांचे बारकावे व्यक्तविता येत असतील, तात्त्विक चिकित्सा, तार्किक मीमांसा आणि सैद्धान्तिक अभिव्यक्ती सहजपणे साधता येत असतील, तर ती भाषा समृद्ध आहे असे समजावे. मराठीला या दिशेने अजून पुष्कळ वाट चालायची आहे. म्हणून मराठीत या प्रकारच्या ग्रंथांची जेवढी निर्मिती होईल तेवढी हवीच आहे. यादृष्टीने ‘बाराला दहां कमी’ या ग्रंथाचे आपण तोंडभर स्वागत केले पाहिजे.
डॉ. स. ह. देशपांड्यांचा राष्ट्रवाद
आजच्या सुधारकच्या मागील दोन अंकांत ‘परंपरा, आधुनिकता आणि राष्ट्रवाद’ या विषयावरील डॉ.स.ह. देशपांडे यांचे दोन लेख वाचले. त्यात त्यांनी राष्ट्रवादाची जी मीमांसा केली आहे त्यासंबंधी मी माझे विचार मांडीत आहे.
डॉ. देशपांड्यांच्या मते राष्ट्रवाद हा स्पर्धाशील असूनगटस्वार्थाची प्रेरणात्यातप्रधान असते. विशुद्ध भूतदया किंवा मानवी अनुकंपायांसआंतरराष्ट्रीय सहकार्यात फारसा थारा नसतो. पणअंतर्गत व्यवहारात इंग्लंडसारख्या देशात विशुद्ध चारित्र्य जपलेले आहे. राष्ट्रवाद हा प्राधान्याने सांस्कृतिक राष्ट्रवादच असतो. राष्ट्रीय भावना उद्दीपित करण्यासाठी सर्वसामान्य जनतेस जागृत करण्यासाठी स्फूर्तीची केंद्रे उज्जीवित करावी लागतात. इत्यादि, इत्यादि.
गेल्या दोनशे वर्षांच्या राष्ट्रवादाच्या विकासामध्ये स्पर्धा आणि स्वार्थ यांचाच बोलबाला होता असे म्हणणे बरोबर होणार नाही.
गतार्थ भारतीय वास्तुशास्त्र
भारतीय वास्तुशास्त्र शिल्पशास्त्राचे एक उपांग आहे. शिल्पशास्त्रात एकूण दहा विषय येतात व वास्तुशास्त्र हे त्यांतील एक. त्याचा विस्तार एकूण अठरा ऋषींनी अठरा संहितांत केलेला आढळतो. त्यातील कश्यप, भृगुव मय यांच्या संहिता जास्त प्रचलित आहेत. भौगोलिकदृष्ट्या दक्षिणेमध्ये त्या पुरातन काळापासून प्रचलित असल्याने आजही आपल्याला दक्षिणेकडील संहितांचाच प्रचार होतानाआढळतो.
शिल्पशास्त्राच्या विस्तारात वजने, मापे, पदार्थवत्यांचे गुणधर्म, त्यावर करावयाच्या प्रक्रियाव त्यापासूनचे फायदे तोटे हे विस्ताराने येतात, व वास्तुशास्त्राला पण ते लागू होतात. ह्या एका बाबतीत पुरातन वास्तुशास्त्र हे आजच्या बांधकामशास्त्राची जननी म्हणता येईल. दिशा निश्चितीच्या प्रक्रिया, मोजमापाच्या पद्धती व गणिते, ह्याचप्रमाणे बांधकामाच्या संबंधात करावयाचे करार, त्यातील अटी, मुख्यापासून ते कनिष्ठापर्यंतव्यक्तींनी करावयाची कामेव त्यातील सूत्रबद्धता, त्यांना द्यावयाची दक्षिणा इत्यादि गोष्टीआजच्यापुढारलेल्या पद्धतींशी आश्चर्यकारकरीत्याजुळतात.
गीता-ज्ञानेश्वरीतील एक अनुत्तरित प्रश्न
‘ही भगवद्गीता अपुरी आहे’ हा प्रा.श्री. म. माटे यांचा एक महत्त्वपूर्ण लेख. ‘विचारशलाका’ या त्यांच्या ग्रंथात तो समाविष्ट केला गेला आहे.
त्या लेखात भगवद्गीतेच्या पहिल्याच म्हणजे मुखाध्यायात अर्जुनाने उपस्थित केलेले दोन प्रश्न मांडले आहेतः
(१) आप्तस्वकीयांच्या मृत्यूविषयीचापहिला चिरंतन स्वरूपाचा प्रश्न.
आणि
(२) कुलक्षयामुळे स्त्रियांमध्ये येणारी दूषितता, स्वैर आचारवत्यातून होणारावर्णसंकर हा दुसरा नैतिक, सामाजिक प्रश्न
पहिल्या प्रश्नाचे उत्तर गीताभर केलेल्या आध्यात्मिक चिंतनात येऊन जाते. देहाचा मृत्यू म्हणजे अमर आत्म्याचा मृत्यूनव्हे हा चिंतनाचा मथितार्थ. त्याअनुरोधाने या जीवात्म्याचे ध्येय काय आणि ते गाठण्याचे मार्ग कोणते याचे विवरण गीतेत येते.
स्वेच्छामरण : राष्ट्रव्यापी मोहीम सुरू करण्याची गरज
‘मृत्यू’ शब्दाला बहुतेक सर्वजण फार घाबरतात. “जातस्य हि ध्रुवो मृत्युः” किंवा “मरणं प्रकृतिः शरीरिणाम्’ ही सुभाषिते जरी पाठ असली, तसेच केव्हा ना केव्हा प्रत्येकाला मृत्यूयेणारच हे जरी सर्वांना माहीत असले, तरीही कोणाच्याही मृत्यूची चर्चा करणे अशिष्टपणाचे मानले जाते. शुभअशुभाच्या कल्पनांचाही आपल्या समाजावर जबरदस्त पगडा आहे. त्यामुळे कोणाच्याही मृत्यूबद्दल बोलणे अशुभ, अयोग्य मानले जाते. स्वतःच्या मृत्यूविषयीसुद्धा कोणाला आपले विचार मोकळेपणाने मांडता येत नाहीत. कोणी बोलूच देत नाहीत. अलीकडे मात्र, निदान वयोवृद्धांमध्ये तरी या विषयावर थोडीबहुत चर्चा होऊ लागली आहे.
“आत्महत्या” करणार्याू व्यक्तीबद्दल आपल्याकडे तरी अजूनही कोणी मोकळ्या मनाने विचार करीत नाहीत.
समाज व लोकशाही
वाटाघाटीचा शिक्षणक्रम (Negotiations Seminar) असा एक कोर्स मी घेतला होता. त्यात ‘प्रतिवादीची मूल्ये समजून घेणे’ (Understanding your adversary’s values) असा एक चार तासांचा भाग होता. ‘यशस्वी वाटाघाटींसाठी दोन्ही बाजूंची व्यक्तिमत्वे व मूल्ये समजून वाटाघाटी करणे आवश्यक आहे’ अशी ह्या शिक्षणाची धारणा होती.
या कोर्समध्ये व्यक्तींची व पर्यायाने सर्व समाजाची जी मूल्ये व थर (levels) सांगण्यात आले, त्यांचा समाजाच्या उन्नतीशी, राजकारणाशी व देशाच्या सुव्यवस्थेशीही निकट संबंध आहे असे वाटते.
या शिक्षणानुसार जगातील सर्व समाज व व्यक्ती यांच्या मानसिक व वैचारिक पातळ्यांचे आठ थर आहेत.
निंद्य आणि हीन कृत्य
मी कोणत्याही प्रकारच्या युद्धात कोणत्याही परिस्थितीत आणि कधीही सामील होणार नाही. मग त्या युद्धामागची कारणं मला कितीही पटणारी असोत.
लढाई ही एक अतिशय नीच आणि घृणास्पद कृती आहे असं मी मानतो. मानवजातीला लांच्छनास्पद अशा या कृतीवर लवकरात लवकर बंदी घातली पाहिजे. बँडच्या तालावर रांगेने चालण्यात धन्यता मानणाच्या माणसांविषयी माझ्या मनात चीड आहे. अशा माणसाला मेंदू अनवधानानं देण्यात आलेला असावा. नुसत्या पाठीच्या कण्यावरही त्याचं उत्तम भागू शकलं असतं. रणांगणावर हुकुमाची तामिली म्हणून देशभक्तीच्या नावाखाली जे काही शौर्य गाजवलं जातं, अमानुष हत्याकांड चालतं आणि एकूणच जो काही मूर्खपणा चाललेला असतो, त्याची मला अतिशय किळस येते!