पत्रव्यवहार

संपादक,
आजचा सुधारक,

जाने. ९७ चा अंक मिळाला. इंदुमती यार्दी ह्यांचे विचार योग्य असले तरी त्यांनी दिलेले गिलचे उदाहरण चूक आहे. एक ओली पार्टी होती. अशा पार्टीला बजाज ह्यांनी जावयासच नको होते. दारू प्यालेल्या गिलने त्यांना जवळ बोलाविल्यावर त्या गिलजवळ गेल्या व गिलने चापट मारली. बजाजांनी गिलजवळ जावयाचे नाही.

आम्ही पुरुषसुद्धा रस्त्यात दारू प्यालेला कोणी असेल तर लांबून जातो. जवळ गेले तर तो भटांना शिव्या देतो. हा अनुभव अनेकांना असेल. माझ्या मते गिल खुर्चीतून उठून बजाजकडे जाऊन त्यांनी चापट मारली असती तर ते दोषी ठरतात. बजाज आय.ए.एस्. आहेत. नशापाणी केलेल्याचा दस्तऐवजसुद्धा ग्राह्य धरीत नाहीत.

स्त्रियांनी पुरुषांशी कसे वागावे ते महाभारतातील दोन स्त्रियांच्या वर्तणुकीवरून व्यासांनी दाखवून दिले आहे. राधा ही जरासंधाचा सेनापती अनय ह्याची पत्नी होती. ती घडीघडी कृष्णाकडे जात असे. त्यांच्या संबंधातील कितीतरी गाणी व गोष्टी प्रसिद्ध आहेत.

द्रौपदी कृष्णाची बहीण नव्हे. दुर्गाबाई भागवत त्यांचे अशरीरी प्रेम (प्लेटॉनिक लव्ह) होते असे म्हणतात. त्यांच्या संबंधाच्या फक्त दोनच गोष्टी प्रसिद्ध आहेत. इंग्रजीत म्हण आहे “नो मॅन इज जन्टल व्हेन ही गेट्स् अॅन ऑपॉर्म्युनिटी”. स्त्रियांनी अंगचटीला जाऊ नये. केवळ गरजेपुरतेच द्रौपदीप्रमाणे वागावे.

दुसरा उल्लेख पाटणकरांच्या पत्रातीलरशियातील साम्यवादाचा होय. रशियात साम्यवाद फसला त्याचे कारण तेथील नेत्यांनी उडी मारली म्हणून होय. माक्र्सने जमीनदारी-भांडवलशाही – साम्यवाद अशी तीन स्थित्यंतरे सांगितली. रशिया-चीनमध्ये मधले स्थित्यंतर झालेच नाही.

कोणता भांडवलदारी देश चांगला आहे? सर्व देशांत भ्रष्टाचार आहे. अमेरिकेत मंदीची लाटआहे. उच्च पगारी नोकर्याच कमी होत आहेत. तीस लाखांना लेऑफ दिला गेला. वीस लाख गुन्हेगारीस बळी पडले. निम्मे नीग्रो अशिक्षित आहेत. मतदान फक्त चाळीस टक्के झाले. पन्नास। टक्क्यांना मुलांच्या भवितव्याची काळजी आहे. न्यूयॉर्क टाईम्स मधील हा लेख टाईम्स ऑफ इण्डियाने ता. १२ मार्च ९६ रोजी छापला आहे. मराठी वृत्तपत्रे अमेरिकेविरुद्ध छापीत नाहीत. संपादकांची व पुढान्यांची मुले अमेरिकेतच असतात.
खाजगी उद्योजक युनिट ट्रस्ट, विमा कंपन्या, बँकांतून कर्ज घेतात. निष्णात सरकारी निवृत्तांना नेमतात व चैनीच्या वस्तूतून नफे मिळवितात. कळावे.

केशवराव जोशी

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.