… ७ जुलै १७७६ रोजी मी मि. डेव्हिड ह्यूम’ यांना भेटायला गेलो. ते आपल्या दिवाणखान्यात एकटेच टेकून पडले होते. ते कृश आणि भेसूर दिसत होते. ते शांत आणि समाधानी दिसले. आपण लवकरच मरणार आहोत असे ते म्हणाले … मृत्यू समक्ष उभा असतानाही मरणोत्तर अस्तित्वावरील आपला अविश्वास कायम आहे काय असे मी विचारले. त्यावेळी ते जे बोलले त्यावरून तो कायम होता असे माझे मत झाले. मरणोत्तर अस्तित्व शक्य नाही काय? असे मी विचारले. ते म्हणाले की कोळसा आगीत टाकल्यावर जळणार नाही हेही शक्य आहे. आपण अनंत काळपर्यंत अमर राहू असे समजणे असमंजस आहे. अमरत्व हे असलेच तर सार्वत्रिक असले पाहिजे. मानवापैकी काही बाल्यावस्थेतच बुद्धीचा उपयोग करू शकण्याच्या आतच मरतात, हे सर्व अमर असावे लागतील… प्रत्येक युगातील कुचकामी माणसेही अमर असतील. एवढ्या प्रचंड संख्येकरिता नवी विश्व निर्माण करावी लागतील. …