डॉ. रिचर्ड क्लार्क कॅबट (१८६८-१९३९) हे हार्वर्ड विद्यापीठात एकाच वेळी निदानीय वैद्यकशास्त्र (Clinical Medicine) आणि सामाजिक नीतिशास्त्र (Social Ethics) या दोन्ही विभागांचे प्राध्यापक होते. त्यांना गुन्हेगारीकडे कल असणाच्या तरुणांनासुधारावे’ असे वाटत असे. त्यांचे असे मत होते की अशा माणसांशी कोणीतरी खूप परिचित व्हावे. हा परिचय मैत्रीच्या पातळीवर आणि खूप सखोल असावा. याने गुन्हेगारी कलाच्या तरुणांना तर फायदा होईलच, पण असा मैत्रीपूर्ण परिचय करून घेणार्यांरचे स्वत:बद्दल आणि भोवतालच्या विश्वाबद्दलचे आकलनही जास्त सखोल होईल.
हे विचार नीतिशास्त्रज्ञाला साजेसेच होते, आणि सोबत डॉ. कॅबट यांच्या वैद्यकशास्त्राचा मूर्त ज्ञानशाखेचा अनुभवही होता. अशा तयारीने डॉ. कॅबट यांनी केंब्रिजसमरव्हिल तरुण-अभ्यास नावाचा एक प्रयोग रेखला. अर्थात, यात ते एकटेच नव्हते, तर त्यांना अनेक सहकारीही होते. या प्रयोगातून मार्गोपदेशन (समुपदशेन counselling), मैत्री, सामाजिक सेवा-सुविधा वगैरे सुधार-तंत्रांची परिणामकारकता तपासायची इच्छा होती.
तर काही प्राथमिक चाचण्या घेऊन ६५० किशोरवयीन मुले निवडण्यात आली. पाच ते तेरा वर्षे वयोगटातील ही मुले गुन्हेगारी कलाची होती. त्यांच्या ३२५ जोड्या पाडण्यातआल्या. प्रत्येक जोडीचे ‘‘सभासद’ वयाने, कौटुंबिक पार्श्वभूमीने व वागण्याच्या रूपरेषेने (profile) एकसारखे निवडले गेले. मग एका स्वैर निर्णय-पद्धतीने प्रत्येक जोडीतील एकाला “प्रायोगिक’ तर उरलेल्याला “नियंत्रक’ ठरवले गेले. म्हणजे सव्वातीनशे जणांचा एक, असे दोन गट पडले; एक प्रायोगिक, आणि दुसरा नियंत्रक.
प्रायोगिक गटातल्या प्रत्येकाला एकेक मार्गोपदेशक (counsellor) दिला गेला. या मार्गोपदेशकाला शाळा, सामाजिक संस्था आणि केंब्रिज-समरव्हिल तरुण-अभ्यास प्रकल्प, या सार्यांाची मदत होती. या मार्गोपदेशकांची मदत करायची तंत्रे वेगवेगळी होती; पण प्रायोगिक मूल, त्याचे कुटुंबीय वगैरेंना वारंवार भेटणे, हे सार्यांवनीच केले. प्रायोगिक मुलांसाठी खेळ, सहली वगैरे आयोजित केल्या जात असत. शंभरावर मुलांना वैद्यकाची व मानसोपचारांची मदत दिली गेली. जवळजवळ पाच मुलांना उन्हाळी शिबिरांना पाठवलेगेले. सर्वच मुलांना बॉय स्काउट्स, वाय.एम.सी.ए. वगैरे संस्थांमध्ये भरती करण्यात आले. अर्ध्यावर मुलांना लिहिणे, वाचणे, गणित वगैरे विषयांमध्ये विशेष मदत केली गेली. मुलेआणि त्यांचे कुटुंबीय यांना चर्चमध्ये जायला उद्युक्त केले गेले. तेथे धर्मोपदेशकांना या मुलांना विशेष मदत करायचे सांगितलेले होते.
१९३९ पासून १९४४ पर्यंत हा मूळ प्रयोग चालला. नंतरही पुरवणी सर्वेक्षणे केली गेली. त्यांच्याबद्दल तीन पुस्तके लिहिली गेली आहेत. यातले शेवटचे तीस वर्षानंतरच्या सर्वेक्षणावर (१९६९ सालच्या सर्वेक्षणावर) १९७८ साली लिहिलेले आहे. यावेळेपर्यंत सव्वातीनशे जोड्या गळत गळत अडीचशे उरल्या होत्या. त्यांपैकी प्रत्यक्षात ४८० मुले तीस वर्षानंतरही “सापडली”.
प्रायोगिक गटातल्या बहात्तर जणांची ‘पोलिस रेकॉर्ड’ होती. नियंत्रक गटापैकी सदुसष्ट जण तसे होते. प्रौढपणी गंभीर गुन्हे केल्याचे आरोप प्रायोगिक गटात एकुणपन्नास, आणि नियंत्रक गटात बेचाळीस जणांच्या खात्यावर होते. साधे गुन्हे पाहिले, तर प्रायोगिक गटात ११९ आणि नियंत्रक गटात १२६ जणांनी असे गुन्हे केले होते.
दारुडेपणा, मानसिक विकार, ताणामुळे उद्भवणारे प्रश्न वगैरेंबद्दल प्रायोगिक गटाचे रेकॉर्ड’ नियंत्रक गटापेक्षा नेहमीच जरा वाईट होते. नोकरी मिळणे आणि तिच्यात समाधानी असणे, या बाबतीत मात्र नियंत्रक गट प्रायोगिक गटापेक्षा बर्याी स्थितीत होता! गंमत म्हणजे, प्रायोगिक गटातल्या व्यक्तींना “तुम्हाला या प्रयोगाने काय दिले?” असे विचारले असता दोन-तृतीयांश लोकांनी सांगितले की प्रयोगामुळे त्यांचे आयुष्य सुधारले!बहुतेकांकडे मार्गोपदेशकांच्या चांगल्या आठवणींचा साठा होता!
सामाजिक शास्त्रज्ञ, सामाजिक कृती करणारे, या सार्यांलकडे ‘कठोर’ माहितीचा साठा बहुधा कमीच असतो. अशा स्थितीत कॅबट आणि नंतर तीस वर्षे या प्रयोगात भाग घेणारे यांची वैज्ञानिक कमाई महत्त्वाची आहे. पण –
पण प्रयोगाचे उत्तर मात्र काहीसे निराशाजनक आहे. सुधारकांच्या अनेक लाडक्या अंदाजांचे’ पानिपत झाले आहे. आपला कमकुवतपणा, खात्रीलायक ज्ञानाचा अभाव, हे सारे या प्रयोगाच्या आरशाने आपल्याला दाखवले. तीस वर्षानंतरचा अहवाल सांगतो, ‘वस्तुनिष्ठ पुरावा अस्वस्थ करणारा आहे. प्रयोगाला यश तर आलेलेच नाही, पण काही
ऋण’ बाजूचे परिणामही स्पष्ट आहेत … एकूण पाहता ढवळाढवळ करणारे उपक्रम (intervention programmes) व्यक्तींची हानी करतात’!
पण पुढे अहवाल लिहिणारे डॉ. कॉर्ड म्हणतात, “कुणाला जर असे वाटले, की या पाहणीच्या निष्कर्षांमुळे सामाजिक कृतींचे उपक्रमच बंद करावे, तर मात्र ती चूक ठरेल. पण अशा उपक्रमांमुळे हानी पोचण्याची शक्यता मात्र आधी मार्गदर्शक (pilot) प्रयोगांमधून जाणून घ्यायला हवी.
* * *
नवीन औषधांची परिणामकारकता तपासायला अशीच नियंत्रण-तंत्रे वापरली जातात, व त्या कसोटीला उतरणारी औषधेच प्रमाणित केली जातात. मग वर्तनचिकित्सेबाबत आपण अशी वैज्ञानिकदृष्ट्या ग्राह्य तंत्रे वापरण्याचा आग्रह का धरत नाही? बहुधा असे असेल, की मदतीची गरज असलेली माणसे पुढ्यात आली, की आपण आपण खरी मदत करतो की नाही हे माहीत नसेल, तर काहीच करू नये’, हे तत्त्व विसरतो! त्याऐवजी आपण‘अंत:स्फूर्त’ (intuitive) उपचारांना निष्क्रियतेपेक्षा योग्य मानतो. आणि म्हणूनच प्रत्यक्ष प्रायोगिक आधार नसलेले उपक्रम हे नेहमीच ‘प्रयोग’ ठरतात.
थोडक्यात काय, तर कणवेशी समकक्ष’ ज्ञान कमवायला कठोर परिश्रम हवेत. आणि असे ज्ञान नसताना दुसर्यांवच्या जीवनात ढवळाढवळ नम्रपणेच केली जावी!
(हॅरल्ड जे. मॉरोविट्झ यांच्या “द वाईन ऑफ लाईफ’ (अॅबकस, १९७९) या पुस्तकातील लेखावरून.)