जिची मासिस्ट मंडळी केवळ औपचारिक स्वातंत्र्य म्हणून हेटाळणी करतात ती – म्हणजे लोकशाही – वस्तुतः सर्व हितांचा आधार आहे. हे केवळ औपचारिक स्वातंत्र्य म्हणजे जनतेचा आपल्या शासनकर्त्यांची परीक्षा करून त्यांना अधिकारावरून दूर करण्याचा हक्क. राजकीय शक्तींच्या दुरुपयोगापासून आपले रक्षण करण्याचा तो एकमेव ज्ञात उपाय आहे. ते शासितांकडून शास्त्यांचे नियंत्रण आहे.आणि राजकीय शक्ती आर्थिक शक्तींचे नियंत्रण करू शकत असल्यामुळे, राजकीय लोकशाही ही आर्थिक शक्तींवर नियंत्रण ठेवण्याचाही एकमेव उपाय आहे. लोकशाही नियंत्रण जर नसेल तर शासनसंस्थेने आपली राजकीय आणि आर्थिक शक्ती नागरिकांच्या स्वातंत्र्याच्या रक्षणाहून अतिशय भिन्न अशा हेतूंकरिता का वापरू नये याचे कसलेही कारण राहणार नाही.’