श्री. संपादक,
आजचा सुधारक यांस,
डॉ. र. वि. पंडित ह्यांच्या सप्टेंबर ९५ च्या पत्राला हे प्रत्युत्तर.
डॉ. पंडित लिहितात की त्यांच्या मूळ लेखात (मे ९५) भारतीयांच्या लैंगिकतेचा उल्लेख नव्हता.
त्यांची मे ९५ च्या लेखातली पुढील विधाने मला भारतीयांच्या लैंगिकतेबद्दलची वाटली.“थायलंड वगळता सर्व आशिया व चीन यामध्ये लैंगिक स्वातंत्र्य बरेच मर्यादित आहे.”“लैंगिक सुख हवे तेवढे हव्या त्या प्रमाणात उपलब्ध झाले पाहिजे असा विचारप्रवाह अमेरिकेत निर्माण झाला आहे. भारतात आज जरी अशा प्रवृत्तीकडे तिरस्काराने व तुच्छतेने पाहिले जात असले तरी…”
थोडक्यात डॉ. पंडितांचे म्हणणे भारतात अमेरिकेसारखा स्वैराचार सध्या नाही.
मासिक संग्रह: डिसेंबर, १९९५
दिवाळीतला आनंद (भाग १)
माझी जॉर्ज गिसिंगशी ओळख झाली त्याला पुष्कळ वर्षे लोटली. नतर तो कुठेच भेटला नाही. इंटरच्या ‘हायरोड्स आफ इंग्लिश प्रोज मध्ये ‘माय बुक्स च्या रूपने झालेली पहिली अन् शेवटची भेट. पण काही ओळखी जन्मभर लक्षात राहतात तशी ही राहिली. एखाद्या आईने ‘माय चिल्ड्रेन या विषयावर जितक्या ममतेने बोलावे तितक्या जिव्हाळ्याने त्याने ‘माय बुक्स ची ‘कवतुकें सांगितली होती. माणूस अर्धबेकार-फटिचर पण ऐट अशी की पुस्तक वाचायचे ते विकत घेऊनच. धंदा लेखनाचा. नियमित उत्पन्न नाही. आहे ते अपुरे अशा स्थितीत पठ्ठा मैलोगणती अंतर पायी तुडवायचा.
खरंच, पुनर्जन्म आहे? (उत्तरार्ध)
शारदेच्या माहेरच्या माणसांची तिने सांगितलेली नावे
शारदेने तिच्या खापरपणजोबा, पणजोबा, आजोबा, वडील, दोन काका आणि दोन सावत्रभाऊ यांची नावे सांगितली आणि त्याप्रमाणेच (पणजोबा सोडून) नावे असणारी वंशावळ प्रा. अकोलकरांनी सादर केली आहे. या महत्त्वाच्या मुद्द्याची नीट छाननी होणे जरूर आहे. याबाबत प्रा. अकोलकरांना श्री. आर. के. सिन्हा यांच्याकडून त्यांनी मिळविलेली वंशावळ मिळाली आहे. याशिवाय डॉ. स्टीव्हन्सनना प्रो. पॉल यांच्याकडून वंशावळ मिळाली. श्री. सिन्हा व प्रो. पॉल यांचा शारदा केसशी कसा संबंध आला, ही माणसे कोण, त्यांनी कोणत्या प्रकारे आणि कोणत्या माहितीच्या आधारे तपास केला, अशा प्रकारच्या संशोधनात तपास करताना ज्या काळज्या घ्याव्या लागतात त्याची त्यांना जाण होती का, याची काहीच माहिती प्रा.
हिन्दुत्व-अन्वेषण (उत्तरार्ध)
आजचा सुधारक मासिकाच्या ऑक्टो. ९५ च्या अंकातील लेखातून हिंदुत्व या धार्मिक संज्ञेचा ऐतिहासिक शोध निष्फळ ठरतो याविषयीचा विचार मांडला आहे. राजकीय स्वार्थासाठी हिन्दुत्वाचा जयकार केला जात असेल तर प्रस्तुत लेखकाला या । विषयाची चर्चा करण्याची गरज नाही. पण ज्यावेळी जनजागृतीसाठी धर्मप्रचाराचा अभिनिवेश असतो त्यावेळी असे जाणवते की प्रचाराची माध्यमे ज्यांच्याजवळ आहेत ते कर्मठ आहेत, आणि या कर्मठांनी कोणत्याच समस्येचा अभ्यास केला नसतो. विचारही केला नसतो. कारण धर्मप्रचाराचे नाटक वठविण्यात ते स्वतःला धन्य समजतात. त्यांना मंदिरांविषयी आस्था नसते. कीर्तन-प्रवचनांचा त्यांना कंटाळा असतो.
नियति, दैव, विधिलिखित, नशीब, प्रारब्ध, इत्यादि
नियति, विधिलिखित, दैव, नशीब, प्रारब्ध या सर्व गोष्टी एकाच कुटुंबातील आहेत. पण त्यांपैकी काहींचे संदर्भ आणि अर्थ काहीसे भिन्न आहेत.
नियति (Fate). भविष्यात केव्हा काय घडणार आहे हे पूर्णपणे पूर्वनिश्चित आहे. मनुष्याने काहीही केले त्यापासून त्याची सुटका नाही. उदाहरण म्हणून पुढील गोष्ट देता येईल.
एका मनुष्याला दुपारी बाजारात मृत्यू भेटला आणि म्हणाला : ‘आज रात्री बारा वाजता येतो आणि तो नाहीसा झाला. तो मनुष्य स्वाभाविकच घाबरला, पण काहीतरी हातपाय हलवायचे म्हणून त्याने आपले घोडे काढले आणि त्यावर बसून तो भरधाव वाट फुटेल तिकडे जात राहिला.
कुटुंब : आजचे आणि उद्याचे (भाग २)
आतापर्यंत (मागच्या अंकामध्ये) मी माझी काही निरीक्षणे नोंदवली, तशीच आणखी काही पुढे मांडतो.
आपल्या भारतीय कुटुंबामध्ये कुटुंबीयाविषयीच्या सर्व जबाबदाच्या फक्त त्या कुटुंबाच्या सदस्यांनीच पेलावयाच्या आहेत असे आपल्याला वळण असल्यामुळे मुलामुलींचे शिक्षण करणे, त्यांना नोकर्याय मिळवून देणे, त्यांची लग्ने लावून देणे अशा जबाबदारीच्या कामांमध्ये कुटुंबाबाहेरचे लोक एकमेकांना मदत करीत नसतात. उलट ते एकमेकांच्या मार्गात अडथळे निर्माण करीत असतात. कारण आम्ही आपापले प्रश्न आपणच सोडवावयाचे अशी । सगळ्यांना शिकवण दिलेली असते. दुसर्याह शब्दांत ज्या शिकवणीतून आपली कुटुंबे घडतात ती शिकवण आपण फक्त आपल्यापुरते पाहावे अशी आहे; सगळ्यांनी मिळून आपले प्रश्न सोडवावे अशी नाही.
आगरकरांचे अर्थचिंतन
प्रस्तावना
प्रस्तुत निबंधाचे तीन भाग पाडले आहेत. पहिल्या भागात आगरकरांच्या अगोदरच्या काळात महाराष्ट्रात आर्थिक चिंतनाची स्थिती काय होती हे दर्शविले आहे. दुसन्या भागात आगरकरांच्या निबंधांमधून प्रकर्षाने दिसून येणारे विचारांचे पैलू दिग्दर्शित केले आहेत. निबंधाच्या तिसर्याप भागात त्यांच्या एकूण आर्थिक चिंतनाचे समालोचन करण्याचा प्रयत्न
केला आहे.
(१) आगरकरपूर्व आर्थिक चिंतन
१८२० च्या सुमारास पेशवाईचे पतन झाल्यानंतरही ब्रिटिशांशी लढाया करून आपले उरलेसुरले स्वातंत्र्य टिकवून ठेवण्याचे व ब्रिटिशांना घालवून देण्याचे प्रयत्न चालू होते. उत्तर भारतात हे प्रयत्न बराच काळ चालू होते. १८५७ चा स्वातंत्र्यसंग्राम, उत्तरप्रदेश व बिहारमधील उठाव ही त्या प्रयत्नांची काही उदाहरणे आहेत.
विश्वाचा हेतू
आपली पृथ्वी विश्वाचा एक लहानसा कोपरा आहे. आणि बाकीचे विश्व इथल्यासारखेच कदाचित् नसेल असे मानायला जागा आहे. अन्यत्र कुठे जीवन असेल हे सर जेम्स जीन्स शंकास्पद मानतात. ईश्वराच्या योजना विशेषतः पृथ्वीशी संबद्ध आहेत असे मानणे कोपर्निकन क्रांतीपूर्वी स्वाभाविक होते, पण आता ती कल्पना अयुक्तिक झाली आहे. जर विश्वाचा हेतू मनाची उत्पत्ती हा आहे असे मानले तर एवढ्या दीर्घ काळात इतके थोडे निर्मिल्यामुळे त्याला काहीसा अकुशल समजावे लागेल. अन्यत्र कुठेतरी केव्हातरी उन्नत मने निर्माण होतील याचा काहीही वैज्ञानिक पुरावा नाही. जीवन अपघाताने निर्माण झाले असे मानणे चमत्कारिक वाटेल, पण एवढ्या विशाल जगात अपघात होणे अपरिहार्य आहे.