मासिक संग्रह: नोव्हेंबर, १९९५

पत्रव्यवहार

श्री. संपादक,
आजचा सुधारक ह्यांस,
आपल्या सप्टेंबर ९५ च्या अंकाच्या १८३-८४ पानांवर श्री. प्रभाकर नानावटी ह्यांची खरी स्त्रीमुक्ती कशात आहे ह्याविषयी एक प्रतिक्रिया प्रसिद्ध झाली आहे. त्याविषयी माझे मत पुढीलप्रमाणे :
(१) ह्यापुढे पुरुषांनी स्त्रियांना, किंबहुना सर्वांनीच एकमेकांना अधिक मानाने वागवावे, समतेने वागवावे आणि त्यासाठी आवश्यक तो बदल आपापल्या मनात घडवून आणावा अशी गरज आहे असे माझे म्हणणे आहे. त्यासाठी कोणतीही अट स्त्रीपुरुषांनी घालूनये. उदा. स्त्रिया/पुरुष जास्त पैसे मिळवतील तरच आम्ही त्यांना उचित मान देऊ वगैरे. मला जी सामाजिक दर्जाची समता अपेक्षित आहे ती कोणाच्याही धनार्जनयोग्यतेवर अवलंबून नसणारी अशी आहे.

पुढे वाचा

सततचा पहारा ही स्वातंत्र्याची किंमत आहे!

ज्ञान मिळविण्यासाठी बुद्धीला पर्याय शोधण्याच्या शक्यतांबाबतच्या चर्चेत (आजचा सुधारकऑगस्ट ९५, ऑक्टोबर ९५) आजवर अशा दोन पर्यायांचा उल्लेख झालेला आहे. एक आहे साक्षात्कारी (revelatory) ज्ञान, उदा. थिआसॉफिस्टांचे अणु-संरचनेचे ज्ञान. दुसरे आहे अंतःस्फूर्तीचे (intuitive) ज्ञान, उदा. रामानुजन, Kekule वगैरेंचे ज्ञान.
या दुसर्या( जातीतले ज्ञान काही बर्या.पैकी स्पष्ट अशा गृहीतकांपासून किंवा पेंद्रिय माहितीपासून काही प्रमेयांपर्यंत किंवा नव्या माहितीपर्यंत जाणारे आहे. साक्षात्कारी ज्ञानाच्या बाबतीत मात्र गृहीतके किंवा पेंद्रिय माहिती यांना पाया मानले जात नाही. एका रूपकाने हा फरक स्पष्ट करतो- एक लांब, नदीसारखे टाके आहे.

पुढे वाचा

कारण आणि reason

मराठीत आपण ‘कारण हा शब्द आणि त्याच्या विलोम converse अर्थाचा’ म्हणून हा शब्द अनेक अतिशय भिन्न अर्थांनी वापरतो. ‘विलोम अर्थ’ याचा अर्थ उदाहरणाने स्पष्ट करता येईल. उदा. पति याचा विलोम शब्द पत्नी’, ‘शिक्षक’ याचा विलोम शब्द ‘विद्यार्थी’. ‘अ’ चा ‘ब’ शी जो संबंध असेल त्याचा विलोम संबंध म्हणजे ‘ब’ चा ‘अ’शी संबंध. उदा. जरअ ब-पेक्षा मोठा असेल तर ब अ-पेक्षा लहान असला पाहिजे. म्हणजे च्यापेक्षा मोठा या संबंधांचा विलोमसंबंध च्यापेक्षा लहान . कारण या शब्दाचा म्हणून विलोम शब्द होय, कारण जरआपण म्हणालो की ‘अ, कारण ब, तर ‘ब, म्हणून अ असे आपण म्हणू शकतो, एवढेच नव्हे तर तसे आपल्याला म्हणावे लागते.

पुढे वाचा

कुटुंब : आजचे आणि उद्याचे (भाग १)

परिपूर्ण स्त्रीमुक्तीच्या संकल्पनेला जो विरोध होत आहे त्याचे मुख्य कारण, माझ्या समजुतीप्रमाणे, त्याचा परिणाम कुटुंबविघटनामध्ये होईल अशी भीती आम्हाला वाटते; हे आहे. म्हणून जी आमची कुटुंबे आम्ही प्राणपणाने जपत आहोत त्यांचे खरे स्वरूप कसे आहे ते पाहू. त्यासाठी आपणाला कुटुंबाची शास्त्रशुद्ध व्याख्या करण्याची गरज नाही. पण साधारणपणे असे म्हणता येईल की कुटुंबामध्ये एका घरात राहणारे, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणारे, एकमेकांशी ज्यांना आपले नाते सांगता येते असे कमीअधिक वयाचे स्त्रीपुरुष असतात. त्यांचे नाते रक्ताचे असतेच असे नाही, व त्यांचे एकमेकांशी संबंध पैशांवर अवलंबून नसतात.

पुढे वाचा

खरंच, पुनर्जन्म आहे? (पूर्वार्ध)

ऑगस्ट १९९५ च्या आजच्या सुधारक मधील हा लेख वाचून आश्चर्यच वाटले. अशा प्रकारचा लेख आजचा सुधारकमध्ये अपेक्षित नव्हता. पुनर्जन्मावरील लेख छापायला माझा आक्षेप नाही. परंतु भारावून जाऊन लिहिलेल्या लेखाऐवजी अधिक विवेचक लेख शोभून दिसला असता. केवळ एक केस-रिपोर्ट वाचून श्री. प्र. के. कुलकर्णीचा अश्रद्धपणा हादरून गेला याचा खेद वाटला. प्रा. अकोलकरांचा मूळ शोधनिबंध वाचून निर्माण झालेली आपली वैचारिक अस्वस्थता श्री. प्र. ब. कुलकर्णी यांनी मोकळेपणाने मांडली आहे. ‘खरं, पुनर्जन्म आहे?’हा लेख वाचल्यावर (बहुधा मी श्री. प्र. ब. कुलकर्णीपेक्षा कमी अश्रद्ध असूनही) माझी प्रतिक्रिया मात्र वेगळी झाली.

पुढे वाचा

गूढवाद

विज्ञान आणि धर्मशास्त्र यांच्यातील युद्ध चमत्कारिक प्रकारचे राहिले आहे. अठराव्या शतकातील फ्रान्स आणि विसाव्या शतकातील रशिया हे देश सोडले तर सर्वकाळी आणि सर्व स्थळी बहुतेक वैज्ञानिकांनी आपापल्या काळातील सनातनी मतांची पुरस्कार केला होता. अत्यंत प्रसिद्ध वैज्ञानिकांपैकी काही त्या बहुतेकांपैकी होते. न्यूटन जरी एअरियन असला तरी अन्य सर्व बाबतींत त्याचा ख्रिस्ती धर्माला पाठिंबा होता. कूव्हिअर हा कॅथलिक सनातनीपणाचा नमुना होता. फॅरडे सँडिमनियन होता, परंतु त्या पंथातील चुका त्यालाही वैज्ञानिक युक्तिवादांनी सिद्ध होणार्याफ वाटत नव्हत्या, आणि धर्म आणि विज्ञान यांच्या संबंधाविषयीची त्याची मते कुणाही धर्मपीठीयाला वाखाणण्यासारखी वाटणारी होती.

पुढे वाचा

पुरुषप्रधान समाजात स्त्री पुरुषाची मालमत्ता

स्त्रियांच्या चळवळीला स्पष्ट असे विधायक उद्दिष्ट नसल्यामुळे स्त्रिया पुरुषांपेक्षा कोठेही उण्या नाहीत हे दाखविण्यात स्त्रीचळवळीची बरीच शक्ती पाश्चात्य देशात खर्च होते…… भारतामधील स्त्री-चळवळी बलात्कार, नववधूच्या हत्या ह्या गंभीर गुन्हेगारीवर धार धरीत आहेत हे योग्यच असले, तरी हुंडा तसेच बलात्कार ह्या गोष्टी समाजात का घडतात व त्यांचे निर्मूलन कसे करता येईल ह्याचा विचार अजून सुरूही झालेला नाही. स्त्रियांवर असलेले गृहिणी, आई व मिळवती स्त्री ह्या तीन भूमिकांचे अवजड ओझे कसे कमी करता येईल ह्याचा विचार स्त्री-चळवळीने कोठेच सुरू केलेला नाही. ……. बलात्काराविरुद्ध चळवळ आहे ती बहुतांशी ‘गुन्हेगाराला शासन व्हावे ह्यासाठी आहे.

पुढे वाचा