डॉ. र. वि. पंडित यांच्या “अमेरिकन लोकांची लैंगिकता’ या लेखात आफ्रिकन अमेरिकन लोकांचा “काही पिढ्यांपूर्वी झाडीत राहणार्याप व वनचरांना शोभेशी नैतिक मूल्ये असणार्या ” असा उल्लेख आहे. त्यांच्या मूल्यांची तुलना डॉ. पंडित कोणाशी करीत आहेत?
डॉ. पंडितांच्या मते ह्या माणसांना पळवून अमेरिकेत आणून गुलाम म्हणून । विकणाच्या समाजाची मूल्ये कुठल्या दर्जाची होती?साधारण त्याच काळी पेशवाईत पुण्यातही “स्लेव्ह मार्केट” चालविणार्याु आपल्या पूर्वजांचा नैतिक दर्जा काय होता?
डॉ. पंडित यांनी श्री प्रल्हाद केशव अत्रे यांचे “आम्ही चावट होतो’ हे पुस्तक वाचले तर आपल्या भारतीय पायांखाली तेव्हा काय जळत होते हे त्यांना समजेल.
“लैंगिक सुख हवे तेव्हा, हवे त्या प्रमाणात, हव्या त्या पद्धतीने मिळायला पाहिजे” असा विचारप्रवाह अमेरिकेत निर्माण झाला आहे हे डॉ. पंडितांचे विधान मला अमान्य आहे. विवाह न करता एकत्र राहणे किंवा एकट्या आईने मूल वाढवणे प्रचलित आहे. पण म्हणून ही माणसे लैंगिक स्वच्छंदीपणा करतात असे नाही. (माझ्या मते अमेरिकन अविवाहित तरुणतरुणींत व भारतीय तरुणतरुणींत एकच फरक आहे. भारतातल्या तरुणींना लैंगिक स्वातंत्र्य नाही. अमेरिकेत ते आहे. दोन्हीकडचे तरुण कमीजास्त प्रमाणात मुक्तच आहेत.) एवढे खरे की अमेरिकन सिनेमा व टी. व्ही. मध्ये लैंगिक स्वच्छंदीपणाची खैरात आहे. त्यामुळे जगाचीच अमेरिकेच्या लैंगिक स्वच्छंदीपणाबद्दल गैरसमजूत आहे. म्हणून Social Organization of Sexuality” ह्या ग्रंथाचे निष्कर्ष लोकांना मिळमिळीत वाटतात.
डॉ. पंडितांच्या मतानुसार फक्त गोर्याे लोकांचा ह्या पुस्तकाच्या सर्वेक्षणात भाग असला तरी ८२ टक्के गोच्या लोकसंख्येचा ह्या सर्वेक्षणात समावेश आहेच.
अमेरिकेतील लैंगिक मुक्ततेकडे भारतीय तुच्छतेने व तिरस्काराने पाहतही असतील पण तो तिरस्कार प्रामुख्याने अमेरिकन स्त्रियांच्या “लूज मॉरल्सकडे” रोखलेला आहे. ह्या मुक्ततेचा फायदा घ्यायला टपलेले अनेक भारतीय (अर्थात उच्चवर्णीय, विवाहित व अविवाहित) पुरुष मला भेटलेले आहेत. आपल्या वागण्यात काही चुकते आहे असेही त्यांना वाटत नाही. “किती बायांना आपण गटवल” हे ते अभिमानाने एकमेकांना सांगतात. फक्तलग्नासाठी मात्र व्हर्जिनच हवी”असेही म्हणतात.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन “भारतात एडस् हा लैंगिक मार्गे लागण होणारा रोग वणव्यासारखा पसरत आहे” असे म्हणत आहे. हा रोग स्वैराचाराने पसरतो व सध्या तरी भारतात हा स्वैराचार प्रामुख्याने पुरुष करतात (वेश्याव्यवसायी स्त्रिया सोडल्या तर) म्हणून एडस् पसरतोय. पूर्व आशियात लैंगिक स्वातंत्र्य मर्यादित आहे हे डॉ. पंडितांचे विधान मला मान्य नाही.
मर्यादा आहेत त्या फक्त स्त्रियांवरच आहेत. पुरुषांनी मर्यादा पाळल्या असत्या तर एडस् भारतात वणव्यासारखा पसरलाच नसता.
अफ्रिकन अमेरिकन्सबद्दल डॉ. पंडितांची विधाने (शिक्षण व भाषा) थोड्याफार प्रमाणात खरी असली तरी त्यांचा सूर मला खटकला. ह्या माणसांना आपल्याकडील । हरिजनांसारखीच वागणूक दिलेली आहे. १८६० पर्यंत ते स्लेव्हच होते. १९६७ सालानंतर त्यांना “सिव्हिल राइटस् मिळाले. त्यांच्या प्रगतीस तेव्हा सुरुवात झाली. अजूनही त्यांच्याविरुद्ध डिसक्रिमिनेशन आहे तरीही त्यांनी साहित्य, करमणूक, सैन्य, क्रीडा (स्पोर्टस) इत्यादी क्षेत्रांत केलेली प्रगती असामान्य आहे.
अमेरिकेत कृष्णवर्णीय लग्ने न करता सामाजिक सुरक्षा योजनेवर (वेलफेअर) मुले होऊ देऊन उदरनिर्वाह करतात याचे मुख्य कारण त्यांना पुरेशा पगाराच्या नोकर्या् मिळत नाहीत हे आहे, लैंगिक स्वैराचार हे नाही. वेलफेअरचे प्रमाण गोर्याम लोकांतही वाढत आहे हे डॉ. पंडितांना ठाऊकच असेल. त्याचे कारण इकॉनॉमिक आहे. तसेच गोर्यास्त्रियांमध्येही अविवाहित मातांची संख्या वाढत आहे. ह्या सर्वच स्त्रिया अशिक्षित, गरीब नसतात. त्या लग्नाशिवाय मूल होऊ देण्याचा निर्णय घेतात.
स्त्रियांचे लैंगिक पावित्र्य हे त्यांच्याविरुद्ध शस्त्रासारखे वापरले जाते. ज्या समाजात स्त्रियांना लैंगिक स्वातंत्र्य असते तेथे त्या जास्त प्रमाणात सुखी व स्वावलंबी असतात. (लैंगिक स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे.) स्त्रिया (पर्यायाने माता) या कुशल असल्या तर मुलांचेही हित साधते.
म्हणून डॉ. र. वि. पंडित म्हणतात त्याप्रमाणे १५ ते २० वर्षांत भारतात अमेरिकेसारखी (स्त्रियांची लैंगिक) मुक्ती झाली तर त्यात मला आनंदच आहे व स्त्रियांचे
आणि समाजाचे भलेच होणार आहे.