श्री. संपादक, आजचा सुधारक यांस,
आपण नागरी लिपीच्या अपर्याप्ततेविषयी एक टिपण नुकतेच आपल्या अंकात प्रसिद्ध केले आहे. ते टिपण वाचून माझ्या मनात विचार आला की कोणत्याही लिपीने हुबेहूब उच्चार दाखविण्याचे कार्य करावे की तत्सदृश उच्चारांचे केवळ स्मरण करून देऊन शब्दांचा अर्थ/आशय व्यक्त करण्याचे कार्य अधिक महत्त्वाचे मानावे? पण ह्या मुद्द्याचा विस्तार न करिता मी आपले लक्ष लिपीसंबंधाच्याच, पण एका दुसर्या? महत्त्वाच्या प्रश्नाकडे वेधतो, आणि त्याचबरोबर शुद्धलेखनाच्या नियमांविषयीही एक बाब आपल्या ध्यानातआणून देतो.
सध्या आपले पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ जी लेखनपद्धती वापरत आहे त्याविषयी मला माझे मत मांडावयाचे आहे.
पाठ्यपुस्तकमंडळाने काही विशिष्ट जोडाक्षरांचा वापर प्रमाण ठरविला आहे, व आपली जुनी लेखनपद्धती पार बदलून टाकली आहे. ही लेखनपद्धती ठरविताना सध्याच्या मोजक्या कळींच्या (limited keyboard) टंकलेखनयंत्रावर जी व जेवढी जोडाक्षरे सिद्ध होऊ शकतात ती व तेवढीच प्रमाणित केली आहेत. परिणामी त्त, ६, द्ध, द्य, अशी जोडाक्षरे अप्रमाण मानली गेली आहेत. (मुलांनी त्यांच्या वह्यांत व उत्तरपत्रिकांत ती लिहिली तर त्यांचे शिक्षक ती चुकीची मानतात.) आणि ती अक्षरे त्त, दद, दूध, झ्य, श्न अशीच सर्वत्र लिहावी लागतात. द्वंद्व हा शब्द द्वंद्व असाच लिहावा लागतो व मुले तो दवदव असा वाचतात. (त्यातल्या वं चा उच्चार जावं करावं’ मधल्या ‘वं’सारखा होतो असे अलीकडेच एका शिक्षकाने सांगितले.) पण ते असो. लेखनामध्ये सर्वत्र एकसारखेपणा यावा त्यासाठी हे नियम केले गेले आहेत असे समजले. हा एकसारखेपणा आणण्याचा हेतू जरी स्पृहणीय असला तरी तो सफल होत नाही. किंबहुना तो सफल होऊच शकत नाही. कारण कोणताही वाचक ही लिपी वा लेखनपद्धती ज्यांनी स्वीकारलीच नाही, त्यांचेही लेखन वाचतो. त्याचप्रमाणे ही लेखनपद्धती सुरू होण्यापूर्वी लिहिलेली, प्रकाशित झालेली पुस्तके त्याच्या वाचनात येऊ शकतात. आपले वाचन केवळ पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित ठेवू नये अशी मुळी त्याच्याकडून अपेक्षाच आहे. त्यामुळे सामान्य वाचकाच्या मनात लेखनपद्धतीविषयी पुष्कळदा गोंधळ असतो. नवनवीन नियम करून लेखनामध्ये एकसारखेपणा येऊ शकत नाही. जुनी नाणी जशी चलनातून काढून टाकता येतात तसे जुन्या पद्धतीने लिहिलेले शब्द, जुनी जोडाक्षरे, जुन्या वाचनीय पुस्तकांतून म्हणजेच चलनातून काढून टाकता येत नाहीत.त्यामुळे जी प्रमाणीकरणाचा हेतू तो सफल होत नाही, त्याचा आग्रह धरणे मृगजळामागे धावण्यासारखे ठरते. प्रमाणलेखनाच्या क्षेत्रात अराजक माजते.
पाठ्यपुस्तक-मंडळाने जी टाकून दिली आहेत ती जुनी जोडाक्षरे कोणत्या नियमांप्रमाणे होतात असे मला वाटते ते आधी सांगतो व नंतर शुद्धलेखनाविषयी.
अलीकडे आपल्या नागरी लिपीविषयी विचार करताना माझ्या असे लक्षात आले की आपण बोलतो तेव्हा व्यंजनांचा उच्चार करताना जसा त्यांना स्वरांचा आधार देतो तसाच लिहितानाही व्यंजनचिन्हांना स्वरचिन्हांचा आधार देत असतो. त्यामुळे म्हणा की असा आधार देण्यासाठी म्हणा आपण आपल्या लिपीमध्ये जे वर्ण किंवा अक्षरे लिहितो त्यांत, म्हणजे त्या सर्व वर्णात, स्वरव्यंजनांची चिन्हे एकमेकांना जोडलेली असतात. मला काय म्हणावयाचे आहे ते एक उदाहरण घेऊन पुढे स्पष्ट करतो. उदाहरण न ह्या अक्षराचे घेऊ. न मध्ये हा व्यंजनांश आहे आणि हा स्वरांश आहे. ना मध्ये ” हा व्यंजनांश आहे आणि । हा स्वरांश आहे. नि मध्य हा व्यंजनांश आणि मी हा स्वरांश आहे. नी मध्ये ; हाच व्यंजनांश आणि मी हा स्वरांश आहे. नु मध्ये हा व्यंजनांश व हा स्वरांश आहे, वगैरे, वगैरे. ह्याहून अधिक उदाहरणे देण्याची गरज मला दिसत नाही.
व्यंजनचिन्हांना स्वरचिन्हांची किंवा त्यांच्या आधाराची गरज असल्यामुळे ती दोन्ही एकमेकांना चिकटलेली असतात. पुढेजाऊनआणखी असेही म्हणता येईल की एकेका वर्णामध्ये एकापेक्षा जास्त व्यंजने आली असली तरी ती सर्व स्वरचिन्हाला चिकटलेली असतात. आपण पुन्हा न चेच उदाहरण घेऊ. न हा । असा तुटक कधीच लिहिला जात नाही. तो न असा सलग लिहिला जातो आणि तो सर्वमान्य आहे. येथे एका वर्णामध्ये एकच व्यंजन आहे. अन्न मध्ये, तसेच अन्त मध्ये, दोन व्यंजने आहेत, इ मध्ये तीन व्यंजने म्हणजे जोडाक्षरे एकाच स्वरांशाला चिकटलेली आहेत. मुद्रणपूर्वकाळामध्ये सर्व लेखन असेच होत असे. अन्न, इंद्र असे लेखन सदोष मानले जात असे. अशा सदोष लेखनाची आणखी काही उदाहरणे खाली देतो.
स्वप्न, महत्त्व, गुप्त, भक्त, राष्ट्र, अग्नि, उद्ध्वस्त, शास्त्र, उद्युक्त, हार्थी, दारिद्रय/दारिद्र्य, उद्घाटन, मुद्दाम, सद्गुण, धिक्कार, वाङ्मय, वगैरे.
वरील शब्दांची निर्दोष रूपें
स्वप्न, महत्व,गुप्त, भक्त, राष्ट्र, अग्नि,उध्स्व, शास्त्र,उद्युक्त,हार्थी दारिद्य
उहाटन, मुद्दाम, सद्ण धिक्कार, वाङ्य/वाड्मय
ही होत. ह्या सर्व उदाहरणांवरून असे लक्षात येईल की जुन्या लेखकांचा स्वरव्यंजने एकत्र – एकमेकांना जोडून – लिहिण्याचा आग्रह होता व तो नियम अपवाद न करता ते सर्वत्र लावीत असत. थोडक्यात काय तर वरील विवेचनावरून असे स्पष्ट होते की ज्या नियमाप्रमाणे न हा वर्ण सिद्ध होतो त्याच नियमाप्रमाणे न्न हा वर्णही सिद्ध होतो, (प्रत्येक वर्गामध्ये स्वरांश कोठेकोठे आहे ते मी येथे सांगत बसत नाही.) म्हणजेच जो नियम वर्णांच्या उच्चाराला लागतो, तोच हुबेहूब वर्णाच्या लेखनाला लागतो.
एकदा हा नियम नीटपणे माहीत झाला, समजून घेतला किंवा समजावून दिला कीमग कोणतेहि जोडाक्षर वाचणे किंवा रचणे अवघड राहत नाही. पाठ्यपुस्तकमंडळाने जी लेखनपद्धती स्वीकारली आहे तिच्यात व्यंजनचिन्हे एका स्वरचिन्हाला न चिकटविता ती विलग, एकापुढे एक लिहिणेच योग्य मानले गेले आहे. परंतु हा नियमहि काटेकोरपणे सर्व अक्षरांना लावला जात नाही. प्र, ग्र, द्र, ,ष्ट्र, श्र ह्यांसारखी अक्षरे पूर्वीसारखी लिहिलेली चालतात. पण पासून होणारी ,* *ल हीसुद्धा श्रीमधल्या श्र सारखी लिहिलेली चालत नाहीत. र हा 7 ह्या रूपांत दुसर्याह व्यंजनाच्या खाली गेलेला चालतो पण न खाली लिहिलेला मंडळाला चालत नाही. त्यामुळे निम्न सारखे शब्द निम्न असे, अन्न अन्न सारखे हेंगाडे दिसतात, आणि हस्ताक्षरातले मत्ता (मत्ता) सारखे शब्द मला (मला) सारखे दिसतात. शिवाय लेखनाला, त्याचप्रमाणे मुद्रणाला कागद जास्त खर्चावा लागतो.
पण माझा ह्या लेखनपद्धतीला (किंवा वर्णमालेला म्हणू या) विरोध असण्याचे एवढेच कारण नाही. माझ्या विरोधाचे मुख्य कारण असे की ही अशी अर्धवट पांक्तिक (partially linear) लिपी वाचण्याची मुलांच्या डोळ्यांना सवय झाल्यानंतर त्यांना जुन्या – शास्त्रपूत -पद्धतीने छापलेले वाचण्याचा त्रास होतो, कंटाळा येतो. पुस्तकांची छपाई जर सर्वत्र एकसारखी नसेल तर, म्हणजे जोडाक्षरे आणि शुद्धलेखनाचे नियम जर सगळीकडे एकसारखे नसतील तर वाचकाला मजकुरावरून नुसते डोळे फिरवून वाचता येत नाही, त्याला प्रत्येक अक्षर निरखून पाहावे लागते. मनात शब्दांचा उच्चार करून पाहावा लागतो. त्यामुळे वाचनाचा शीण होतो. हा शीण सोसावयाला जे तयार नसतात ते कोणतीच पुस्तके वाचावयाला धजत नाहीत. दैनिक वृत्तपत्र किंवा फारतर काही चटकदार साप्ताहिके ते हातात धरतात. परिणामी आठनऊ कोटींच्या महाराष्ट्रात (पूर्वपक्षा लोकांची ऐपत पुष्कळ जास्त वाढलेली असताना) एखाद्या गंभीर विषयावरच्या चांगल्या पुस्तकाच्या हजारभर प्रती खपल्या तरी वाहवा म्हणण्याची पाळी येते. आपल्या शासनाने अत्यल्प किंमतींत उपलब्ध करून दिलेल्या विश्वकोशाच्या दहा हजार प्रती वीस वर्षांमध्ये खपू शकत नाहीत ही बाब आम्हा महाराष्ट्रीयांना निश्चितचे भूषणावह नाही. एकूणच वाचनाचा व त्यांतल्या त्यात जुन्या पद्धतीने वाचण्याचा इतका कंटाळा तरुण पिढीला आहे की हरिभाऊ आपटे, वामन मल्हार जोशी, डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, नरसिंह चिंतामण केळकर, गोपाळ गणेश आगरकर इतकेच नव्हे तर फडके, खांडेकर, माडखोलकर अशा सर्व लेखकांचे व सर्व जुन्या कवींचे साहित्य, जे पुन्हा पुन्हा छापले जावयाला पाहिजे ते बाजारात उपलब्ध असत नाही. ही परिस्थिती बदलावयाची असेल तर महाराष्ट्र शासनाने स्वीकारलेले लेखनविषयक धोरण आपणास ताबडतोब बदलावे लागेल असे माझे मत आहे.
पाठ्यपुस्तकमंडळाच्या इयत्ता चौथीच्या मराठी बालभारतीच्या अध्यापन पुस्तिकेमध्ये ५९ व्या पानावर महाराष्ट्र शासनाने स्वीकारलेली वर्णमाला दिलेली आहे. मला त्यावरून प्रश्न असा पडतो की ही वर्णमाला जर महाराष्ट्र शासनाने स्वीकारली आहे तर ती शासनाच्या इतर प्रकाशनांमध्ये का आढळत नाही? ही फक्त पाठ्यपुस्तक मंडळाच्या प्रकाशनांतच का? पुढच्या पिढ्यांना वाचनाची गोडी लागू नये ह्यासाठी तर हा सारा खटाटोप नाही?
आता शुद्धलेखनाविषयी
शुद्धलेखननियमावलीबद्दल माझे आक्षेप पुष्कळ आहेत, पण त्यांचा मी येथे विस्तार करीत नाही. मला मुख्य प्रश्न पडतो तो असा की केशवसुतपूर्वकालीन पद्य आणि चिपळूणकरपूर्वकालीन गद्य आपल्या प्रत्येक मराठी भाषिकाच्या वाचनात यावे, ते स्वतंत्रपणे वाचून त्याला समजावे असे मंडळास वाटत असेल तर त्या प्रत्येकाला तेव्हाचे प्रचलित किंवा रूढ़ शुद्धलेखनाचे नियम शिकावेच लागणार! म्हणजे दहावीपर्यन्त गेलेल्या विद्यार्थ्याला ते नियम शिकल्यावाचून गत्यंतर नाही, वाचकांची त्यातून सुटका नाही! त्याशिवाय नंतर महामंडळाचे नियम शिकावयाचे! म्हणजे जुने वाचताना एक नियम, लिहिताना निराळे नियम! सारख्या सवयी मोडावयाच्या. जुने शिकलेले एकदा विसरावयाचे व पुन्हा नवीन शिकावयाचे हे सारे शिक्षणशास्त्राच्या मूलतत्त्वांच्या विरोधी नाही काय? पहिल्यानेचचांगली सवय लावणे इष्ट नाही काय?
निरनिराळ्या नियमांप्रमाणे केलेले लेखन आळीपाळीने वाचणे हे एकाच पत्रात निरनिराळ्या प्रकारचे अक्षर वाचण्यासारखे किंवा आळीपाळीने निरनिराळ्या कळफलकाचा (keyboard) टाइपरायटर वापरण्यासारखे आहे. अशा वाचनात गती येणे आणि त्याची गोडी लागणे अशक्य आहे ही साधी गोष्ट आमच्या नियमकत्र्यांच्या ध्यानात येऊ नये ह्याचा मला मनस्वी खेद होतो. दर दहावीस वर्षांनी लेखनविषयक नियम बदलण्याचा आग्रह धरणे हे कोणत्या शास्त्रात बसते ते मला समजूच शकत नाही. लेखन वाचकाची सोय पाहणारे असावे. लेखकाची नाही, हे त्यांना कोणी सांगावे?
दुसरी व्यावहारिक अडचण अशी की छापताना काही म्हणी येतात, क्वचित् काही अवतरणे येतात. त्या प्रत्येकाचा कालनिर्णय करून त्यांचे शुद्धलेखन ठरविणे हे पाठ्यपुस्तक मंडळाला किंवा पुण्यातल्या मुद्रकांना शक्य असेल, पण बाकीच्यांना नाही. एकच उदाहरण देतो–‘नळी फुकिली सोनारें, इकडून तिकडे गेले वारें” ही म्हण कशी छापावयाची? जुन्या सानुस्वार पद्धतीने की नवीन निरनुस्वार?