हिंदू कायदा स्त्रीला स्वतंत्र व्यक्ती धरत नाही, नवर्या.ची मालकी मानतो. इंग्रजी सरकार सामाजिक रूढीत हात घालायचा नाही म्हणून स्वस्थ बसते. ही तटस्थता जिथे लाभाचा प्रश्न येतो तेव्हा का दाखवत नाही? पारंपारिक हिंदूपेक्षा हे सरकार जास्त जुलमी आहे. कारण एका बाजूला ते स्त्रीला शिक्षण व स्वातंत्र्य घ्यायला सांगते आणि रखमाबाईसारखी एखादी सुशिक्षित स्त्री नकोशा नवर्याषची गुलामगिरी नाकारू लागली तर तिला बंधनात बांधायला साधन होते. माझा हिंदू कायद्याचा अभ्यास आहे, त्यात अशा प्रकारची सरकारची कृती कुठेही बसू शकत नाही. हिंदू कायद्यानुसार नवर्यासकडे न गेल्यास तिला जातिनियमाने काही शिक्षा होऊ शकेल. पण ब्रिटिश कायद्याची शिक्षा हिंदू कायद्याच्या गुन्ह्याला कशी देता येईल? … आपल्याला नामशेष करू पाहणार्याक ३३ कोटी हिंदू देवता, १३ कोटी पुरुष आणि बलवान सरकार ह्यांच्याविरुद्ध रखमाबाईसारखी एक असहाय अबला आवाज उठवते हीच खरी आश्चर्याची गोष्ट आहे.