मासिक संग्रह: फेब्रुवारी, १९९५

संपादकीय

आजचा सुधारकच्या स्तंभांमधून अधूनमधून अन्यत्र प्रकाशित झालेला मजकूर पुनःप्रकाशित होत असतो. असा मजकूर कधीकधी आमच्या पुष्कळ वाचकांच्या वाचनात आलेला असतो. मग असा मजकूर पुन्हा प्रसिद्ध करण्याचे प्रयोजन काय असा प्रश्न आमच्या काही वाचकांनी उपस्थित केला आहे.
लेखकाला प्रसिद्धी देणे हा त्यामागचा हेतू नाही हे स्पष्टच आहे कारण तो लेख ज्याचा प्रसार पुष्कळ मोठा आहे अशा नियतकालिकातून घेतलेला असतो. तो केवळ वाचनीय असतो म्हणून नव्हे तर त्यातील आशय चिंतनीय-मननीय असतो, त्यातून समाज परिवर्तनाची आणखी एखादी समस्या अधोरेखित होत असल्यामुळे तो संग्राह्य होत असतो, म्हणून तो पुनःप्रकाशित केला जातो, हे सांगण्याची गरज आहे.

पुढे वाचा

पत्रव्यवहार -आस्तिकतेचे मंडन व खंडन

आजचा सुधारक, जानेवारी १९९५ च्या अंकातील प्रा. रेगे व प्रा. देशपांडे ह्या दोघांचेही लेख वाचले. तुल्यबल युक्तिवादकांचे युक्तिवाद प्रयत्नपूर्वक समजून घेण्यात ‘बौद्धिक व्यायाम झाला व सात्त्विक करमणूकही झाली.
प्रा. रेगे यांचा अनुभव मला सहज समजला. कारण तोच अनुभव मीही घेतलेला आहे. प्रा. देशपांडे यांचा युक्तिवादही मला समजला. कारण स्वानुभव क्षणभर बाजूला सारून मी ही आस्तिकतेच्या विरोधात तोच युक्तिवाद करीन.
‘यो यच्छूद्धः स एव सः’ हे वचन आठवले. प्रा. रेग्यांचा श्रद्धाविषय ‘स्वाभाविक श्रद्धा आहे. प्रा. देशपांड्यांचा श्रद्धाविषय तर्कशुद्ध अश्रद्धा’ हा आहे. त्यामुळे ह्या दोघांचे एकमत होणारच कसे?

पुढे वाचा

नागरी (मराठी) लिपीत काही सुधारणा निकडीच्या

नागरी लिपी अनेक दृष्टींनी अतिशय समर्थ आणि सोयीची लिपी आहे यात संशय नाही. पण अन्य भाषांतील काही उच्चार मराठीत नसल्याने त्यांचे नागरीत बिनचूक लिप्यंतरकरता येत नाही, आणि लिप्यंतर चुकीचे झाल्याने मूळ उच्चारांहून वेगळे चुकीचे उच्चार मराठी भाषी लोकात रूढ होतात, एवढेच नव्हे तर मूळ उच्चार कसे होते याही बाबतीतआपण अज्ञ राहतो.
– १ –
संस्कृत व्याकरणानुसार वर्णाचे उच्चारणस्थानानुसार पाच वर्गात विभाजन केले जाते. कंठ्य, तालव्य, मूर्धन्य, दंत्य आणि ओष्ठ्य. मराठीत मात्र काही वर्ण दंत्यतालव्यही आहेत. उदा. च, छ, ज, झ ह्या वर्णाचा उच्चार मराठीत दोन तन्हांनी केला जातो.

पुढे वाचा

जडवाद, इहवाद, स्त्रीमुक्ती, वगैरे

आजचा सुधारकच्या डिसेंबर ९४ च्या अंकात श्री दि.मा. खैरकर यांचा ‘दिवाकर मोहनींच्या स्त्रीपुरुषसंबंधाच्या भ्रामक कल्पना’ हा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्याच्या शेवटच्या छेदकात त्यांनी काही तात्त्वज्ञानिक सिद्धांतांचा आणि संकल्पनांचा उल्लेख केला आहे.जडवाद, चैतन्यवाद, अदृष्ट इत्यादि गोष्टींसंबंधी त्यांनी लिहिलेला मजकूर वाचल्यावर या सर्वच गोष्टींसंबंधीचे त्यांचे प्रतिपादन बरेचसे गैरसमजावर आधारलेले आहे असे लक्षात आले. त्यामुळे त्या कल्पनांचे वास्तव स्वरूप काय आहे हे सांगणे अवश्य वाटल्यामुळे पुढील चार शब्द लिहिले आहेत.
खैरकर म्हणतात की दिवाकर मोहनी जडवादी आहेत. पण मोहनींच्या लिखाणात मला जडवादाचे चिन्ह सापडले नाही.

पुढे वाचा

पुस्तकपरिचय -भारतीय मुसलमान : शोध आणि बोध

सेतुमाधवराव पगडी थोड्या दिवसांपूर्वी वारले. त्यांना आदरांजली म्हणून त्यांच्या एखाद्या ग्रंथाचा परिचय करून द्यावा असा विचार होता. पगडींची ग्रंथसंपदा मोठी. निवडीचाप्रश्न पडला. तो गेल्या निवडणूक निकालांनी सोडवला. आन्ध्र आणि कर्नाटकात काँग्रेसचा पार धुव्वा उडाला. विरोधकांच्या विजयामागे मुस्लिम मतांचा झुकाव किती महत्त्वाचा होता हे प्रणय रॉय आणि मित्रांनी केलेल्या विश्लेषणात टक्केवारीनिशी दाखवून दिले.
भारतीय मुसलमान हा भारतासमोरील अनेक प्रश्नांपैकी एक प्रश्न आहे. तो सोडविण्यासाठी आधी नीट समजून घेणे जरूर आहे. आम्ही वेगळे आहोत, आमचे प्रश्न वेगळे आहेत, तुम्ही आमच्याकडे लक्ष देत नाही, अशी मुस्लिम नेतृत्वाची भूमिका दिसते.

पुढे वाचा

उपयोगितावाद – काही स्पष्टीकरणे

ज्याल इंग्लिशमध्ये ‘Utilitarianism’ असे नाव आहे आणि ज्याला मराठीत ‘उपयुक्ततावाद’ म्हणतात, त्या मतासंबंधी खूपच पूर्वग्रह आणि गैरसमज आढळतात. हे पूर्वग्रह आणि गैरसमज केवळ सामान्य लोकांच्या मनांतच आहेत असे नसून ते विद्वानांच्या मनांतही मोठ्या प्रमाणात दिसतात. अनेक टीकाकार उपयुक्ततावाद ही उपपत्ती नीतिशास्त्रीय उपपत्ती आहे हे मानायलाही तयार नसतात, आणि काही तर उपयुक्ततावादी जीवन म्हणजे डुकरांना योग्य जीवन असेही म्हणतात. एखाद्या मताविषयी अशी उपेक्षेची भूमिका एवढ्या मोठ्या प्रमाणात का तयार व्हावी आणि ती दीर्घकाळ टिकून का राहावी हा एक कूट प्रश्नआहे. पूर्वग्रह नाहीसे करणे किती कठीण आहे याचेच हे द्योतक आहे.

पुढे वाचा

चर्चा -खरी स्त्रीमुक्ती कशात आहे? (भाग ५)

स्त्रियांची मागणी असो की नसो, त्यांची इच्छा असो की नसो, त्यांची मुक्ती झाली पाहिजे, इतकेच नव्हे तर त्या मुक्तीचा एक अविभाज्य वा अपरिहार्य अंश म्हणून म्हणा, त्याचे आवश्यक अंग म्हणून म्हणा किंवा त्याचा एक अनिवार्य पैलू म्हणून म्हणा, त्यांना लैंगिक स्वातंत्र्य दिले पाहिजे ह्या निष्कर्षावर मी येऊन ठेपलो असल्याचे मी पूर्वीच्या लेखांकांमधून सांगितलेले आहे.
स्त्रियांची मुक्ती ही न्यायोचित बाब आहे. त्यात कोणी मागणी करण्याची गरजच नाही. गुलामगिरीची प्रथा अन्याय्य आहे. ही गोष्ट विचारान्ती पटल्यावरसुद्धा एखाद्या गुलामांच्या मालकाने त्याचे गुलाम तशी मागणी करीत नाहीत तोवर- त्यासाठी उठाव करीत नाहीत तोवर – त्यांच्यावरचा हक्क कायम ठेवावयाची व त्यांची पिळवणूक, त्यांची खरेदीविक्री चालू ठेवावयाची हे जितके व जसे गर्हणीय आहे तितके व तसेच स्त्रियांच्या तश्या मागणीची, त्यांच्या त्यासाठी केलेल्या आंदोलनाची वाट पाहणे आमच्यासाठी लांच्छनास्पद, निंदास्पद आहे असे माझे मत आहे.

पुढे वाचा

सी.पी. स्नो ह्यांच्या दोन संस्कृती :ह्या पुस्तकाच्या निमित्ताने

विद्यार्थी, शिक्षक, पालक अशा तिहेरी भूमिकेतून आजपर्यंत शिक्षणाशी जेव्हा संबंध आला तेव्हा ज्या अनेक गोष्टी जाणवल्या त्यातील एक महत्त्वाची म्हणजे विज्ञान आणिकला ह्या दोन शाखांमधील वाढत जाणारे अंतर. मी विद्यार्थीदशेत असताना हे अंतर फार नव्हते, स्पर्धाही जीवघेणी नव्हती. कलाशाखेतील विद्याथ्र्यांना विज्ञान-तंत्रज्ञान वगैरे शाखांमधील लोकांबद्दल आदर होता, पण स्वतःबद्दल न्यूनगंड नव्हता. पराभूतपणाची भावना तर अजिबात नव्हती. नंतरच्या दहा वर्षांत हे चित्र पाहता पाहता पालटून गेले. ह्या दोन ज्ञानशाखांमधले अंतर विस्मयकारक रीतीने वाढले होते. कोठेच प्रवेश न मिळालेले विद्यार्थी नाइलाजाने कलाशाखेत प्रवेश घेत होते.

पुढे वाचा

‘विवेक’ आणि ‘विवेकवाद यांचे अर्थ

‘विवेक (reason) आणि ‘विवेकवाद’ (ratinalism) हे शब्द संदिग्ध असल्यामुळे त्यांचे आपल्याला अभिप्रेत असलेले अर्थ सांगणे आवश्यक आहे. पहिली गोष्ट म्हणजे हे शब्द व्यापक अर्थाने वापरले आहेत. त्यांनी एक बौद्धिक व्यापारच अभिप्रेत आहे असे नसून त्याखेरीज निरीक्षण आणि प्रयोग यांचाही त्यांच्या अर्थात अंतर्भाव आहे. हे लक्षात ठेवणे जरुर आहे कारण reason’ आणि ‘rationalism’ हे शब्द अनेकदा एका वेगळ्या आणि संकुचित अर्थाने वापरले जातात, आणि त्या अर्थी त्यांचा विरोध irrationalism’ (विवेकद्रोह) शी नसून अनुभववादाशी (empiricism) असतो. ते शब्द जेव्हा या अर्थाने वापरले जातात तेव्हा विवेकवाद निरीक्षण आणि प्रयोग यांच्याहून श्रेष्ठ आहे अशी प्रशंसा त्यातून व्यक्त होते.

पुढे वाचा