मासिक संग्रह: जानेवारी, १९९५

पत्रव्यवहार

संपादक,
आजचा सुधारक
डिसेंबर १९९४ च्या अंकात श्री. धारप यांचे पत्र वाचले. “स्त्रीमुक्ती व स्त्रीपुरुष समानता” याविषयी लोकमत-संग्रहाची कल्पना त्यांना आवडली नसून त्याबद्दल त्यांनी आपले मत तत्परतेने कळविले हे चांगलेच आहे. प्रत्येकाला स्वतःची मते असतात व ती व्यक्त करण्याचा अधिकारही असतो. प्रश्नावलीसोबतच “सुधारकाने” वाचकांच्या प्रतिक्रिया आमंत्रित केल्या होत्याच.
परंतु आपले मतच बरोबर व इतरांचे चूक असा अत्याग्रह धरणे योग्य नाही आणि हा आग्रह इतरांचा उपरोध करून मांडणे सभ्यतेच्या संकेताविरुद्ध आहे. महाराष्ट्रातील ब्राम्हण तरुणांच्या संसाराचा, महिलांच्या स्वतंत्र वृत्तीमुळे, खुळखुळा झाला आहे असे श्री.

पुढे वाचा

वैज्ञानिक दृष्टिकोन

भौतिक विज्ञानामुळे जो निर्माण होतो तो वैज्ञानिक दृष्टिकोन असा समज सार्वत्रिक आहे. भौतिक विज्ञान ज्यांना उपलब्ध झालेले आहे त्यांच्यात तो दृष्टिकोन निर्माण होतोच असे म्हणता येत नाही, आणि त्याच्या उलट ज्यांना भौतिक विज्ञानाचे रीतसर शिक्षण मिळालेले नाही, त्यांच्यात तो असल्याचे अनेक वेळा ध्यानांत येते. असे जर आहे तर हा वैज्ञानिक शब्द सोडून देऊन त्याऐवजी चिकित्सक दृष्टिकोन, किंवा चिकित्सक बुद्धी, हा शब्द वापरणे जास्त अर्थवाही होणार नाही काय? ही चिकित्सक बुद्धी अगदी निरक्षर अशा खेडूत माणसांच्या अंगी असलेली मी पाहिली आहे, आणि त्याचबरोबर विद्वान आणि विज्ञानाची उच्च पदवी धारण केलेल्यांच्या अंगी ती नसल्याचेही अनुभवले आहे.

पुढे वाचा

चर्चा – खरी स्त्रीमुक्ती कशात आहे? (भाग ४)

स्त्रीपुरुषसमागमाची किंवा योनीची व पावित्र्याची जी सांगड आमच्या मनामध्ये कायमची घातली गेली आहे ती मोडून काढण्याची, त्यांची फारकत करण्याची गरज मला वाटते, कारण मी पूर्ण समतेचा चाहता आहे. माझ्या मते समता आणि पावित्र्य ह्या दोन्ही एकत्र, एका ठिकाणी नांदू शकत नाहीत. एका वस्तूला कायमची पवित्र म्हटले की दुसरी कोणतीतरी नेहमीसाठी अपवित्र ठरते. म्हणजेच एक श्रेष्ठ आणि दुसरी कनिष्ठ ठरते – आणि समतेच्या तत्त्वाला बाधा येते. समतेच्या तत्त्वाला बाधा असणारे कोणतेही वर्तन त्याज्य आहे ह्या मतावर मी ठाम आहे.
हे जे योनीचे पावित्र्य आहे ते गंगेसारखे किंवा अग्नीसारखे पावित्र्य नाही.

पुढे वाचा

क्वांटम भौतिकी आणि तत्त्वज्ञान

या शतकाच्या आरंभी भौतिकीमध्ये दोन क्रांतिकारी शोध लागले. आइन्स्टाइनप्रणीत सापेक्षता-सिद्धान्ताने निरपेक्ष अवकाश, काल आणि गती याविषयीच्या जुन्या कल्पनांना तिलांजली दिली. या सिद्धान्ताने न्यूटोनीय यांत्रिकीमुळे भक्कम पायावर प्रस्थापित झालेल्या कार्यकारणभावाच्या आणि नियतिवाद (causality and determinism) या तत्त्वांना मुळीच धक्का पोहोचला नाही. परंतु क्वांटम यांत्रिकीने मात्र या तत्त्वांना प्रचंड हादरा दिला. आधुनिक भौतिकीचा आधार अनिश्चितता तत्त्व आहे ही कल्पना विसाव्या शतकातील अनेक तत्त्ववेत्त्यांना बुचकळ्यात पाडणारी आहे.

कण आणि तरंग : एक द्वैत
अभिजात (classical) भौतिकीमध्ये प्रकाश अथवा सर्व प्रकारचे प्रारण (radiation) हे तरंगस्वरूपी मानण्यात येते, कारण या संकल्पनेने व्यवहारात आढळणाऱ्या सर्व घटनांचे स्पष्टीकरण देता येते.

पुढे वाचा

मी आस्तिक का नाही?

प्रा. मे. पुं. रेगे यांचा ‘मी आस्तिक का आहे?’ हा लेख ‘कालनिर्णय’ कॅलेंडरच्या १९९५ च्या आवृत्तीत प्रकाशित झाला आहे. (हा लेख प्रारंभी उद्धृत केला आहे.) प्रा. रेगे यांचा तत्त्वज्ञानातील व्यासंग व अधिकार लक्षात घेता त्यांच्या या लेखाने आस्तिक लोकांना मोठाच दिलासा मिळेल यात शंका नाही. परंतु म्हणूनच आस्तिक्य न मानणाऱ्या विवेकवादी लोकांवर त्या लेखाची दखल घेण्याची गंभीर जबाबदारी येऊन पडते. ती जबाबदारी पार पाडण्याकरिता हा लेख लिहावा लागत आहे.

‘मी आस्तिक का आहे?’ या प्रश्नाचे प्रा. रेगे काय उत्तर देतात? ते उत्तर थोडक्यात असे आहे की आपली वडील मंडळी आस्तिक होती.

पुढे वाचा

मी आस्तिक का आहे?

कवळे येथील श्रीशांतादुर्गा ही आमची कुलदेवता. शांतादुर्गा आमच्या कुटुंबातीलच एखादी वडीलधारी स्त्री असावी तसं तिच्याविषयी माझे आजोबा-आजी, आई-वडील आणि इतर मोठी माणसं, माझ्या लहानपणी बोलत आणि वागत. अतिशय करडी, सदैव जागरूक असलेली पण अतीव प्रेमळ, संकटात जिच्याकडे कधीही भरवशाने धाव घ्यावी अशी वडीलधारी स्त्री. ती आदिशक्ती, आदिमाया, विश्वजननी आहे हे त्यांना माहीत होते. पण हे विराट, वैश्विक अस्तित्व कुठेतरी दूर, जिथे वाणी आणि मनही पोहोचू शकत नाही अशा दुर्गम स्थानी विराजमान झालेले आहे, तिथून ते आपल्याला न्याहाळत असते, आपले आणि इतरांचे नियंत्रण करते असे त्यांना वाटत नव्हते.

पुढे वाचा

वैज्ञानिक पद्धतीची सार्वजनिकता

निसर्गविषयक विज्ञानाची दोन वैशिष्ट्ये महत्त्वाची आहेत. ती दोन मिळून जिला ‘वैज्ञानिक पद्धतीची सार्वजनिकता’ म्हणता येईल ती बनते. पहिले वैशिष्ट्य मुक्त टीका. आपल्या उपपत्तीवर आक्षेप घ्यायला जागा नाही अशी वैज्ञानिकाची खात्री असेल; परंतु तिचा त्याच्या सहकारी आणि स्पर्धक वैज्ञानिकांवर काही प्रभाव पडणार नाही, उलट ती त्यांना आव्हान वाटेल. वैज्ञानिक वृत्ती म्हणजे सर्व गोष्टींची परीक्षा घेणे, आणि म्हणून ते अधिकाराने दबत नाहीत. आणि दुसरे वैशिष्ट्य असे की वैज्ञानिक परस्परांना समजतील असेच युक्तिवाद वापरतात. ते वेगवेगळ्या मातृभाषा वापरीत असले तरी एकच भाषा बोलण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

पुढे वाचा