आमच्याकडे गेल्या महिन्यामध्ये दोन महत्त्वाची पत्रे आली. दोन्ही आमच्या चांगल्या मित्रांची आहेत. त्यांपैकी एक श्री. ग. य. धारप ह्यांचे; ते जुलै अंकात प्रकाशित झाले आहे. त्यानंतर आमच्याकडे पोचलेले, पण त्याहून महत्त्वाचे पत्र आहे श्री. वसंतराव पळशीकरांचे.
ह्या दोन पत्रांच्या निमित्ताने आमच्या संपादकीय धोरणाचा आम्हाला पुनरुच्चार करावा लागणार आहे. श्री. धारप ह्यांच्या पत्राचा परामर्श घेण्याच्या अगोदर श्री. पळशीकरांच्या पत्राचा विचार करू. श्री. पळशीकर ह्यांचे पत्र खाली देत आहोत :
संपादक, आजचा सुधारक
स.न.
जून १९९४ च्या अंकाच्या आरंभी बट्रँड रसेल ह्यांचे वचन छापले आहे.