संपादक, आजचा सुधारक,
स. न. वि. वि.
श्री. के. रा. जोशींचा “संदर्भ न पाहता लावले जाणारे अर्थ” हा लेख संभ्रमात टाकणारा आहेच, शिवाय त्यांच्या प्रामाणिकपणाविषयी संशय निर्माण करणारा आहे. पहिल्या भागात त्यांनी केलेले “शौच” चे आंतर-बाह्य स्वच्छता हे भाषांतर मनुस्मृतीतीलआशौच” या शब्दापासून बरेच दूरचे आहे. आशौच ही धार्मिक (religious) क्रिया असून त्याचा शिवाशिवाशी (स्पर्शजन्य विटाळ) संबंध आहे. अभ्यासूंनी मनुस्मृतीतील पाचवा अध्याय वाचल्यास याचा बोध होतो. ‘अस्पृश्यता’ येथूनच उगम पावते.
त्यांच्या दुसर्या’ भागातील भाषांतरात व वि. वा. बापटांच्या भाषांतरात खूप अंतर आहे.