मानव हा जीवसृष्टीतील सर्वात बुद्धिमान जीव आहे त्यामुळे मानवाने अनुभवांचे, विचारांचे आणि ज्ञानाचे प्रचंड संचय निर्माण केले आहेत. १८ ते २० लक्ष वर्षांपूर्वी आफ्रिकेतील रिफ्ट व्हॅलीमध्ये व इंडोनेशिया आणि चीनमध्ये सरळ ताठ चालू लागल्यापासून माणूस सतत चालतोच आहे, शिकतोच आहे आणि बुद्धीला सुचेल ते करून पाहून पुढेच चालला आहे. वैयक्तिक आणि गटाधीन विचारमंथन सतत चालूच असून नवनवीन कल्पना, विचार व ज्ञान वृद्धिंगत होतच राहणार. यामध्ये संचारमाध्यमांचा मोठाच वाटा आहे. गलबते, रेल्वे, विमाने, पोस्ट व तार यामुळे भारतीयांना जगाचे दरवाजे उघडून दिले.
मासिक संग्रह: मे, १९९४
संदर्भ न पाहता लावले जाणारे अर्थ – (भाग १, भाग २)
– १ –
‘धारणाद्धर्म इत्याहुः’ हे प्रसिद्ध वचन अनेकवार वापरले जाते. त्याचा संदर्भ पाहिल्यावर ‘धर्म’ शब्द वापरणार्यांच्या मनात काय अर्थ होता; तसेच धर्म वापरणारे भारतीय तो मुख्य कोणत्या अर्थाने वापरतात हे स्पष्ट व्हायला काही आडकाठी नाही. पण हे काहीही न करता या ना त्या रूपाने धर्मकल्पनेवर उठविली जाणारी झोड न्याय्य दिसत नाही. प्रस्तुत वचन हे महाभारतात दोन ठिकाणी आले आहे. शांतिपर्वात भीष्म युधिष्ठिराला धर्माचे स्वरूप समजावून सांगताना म्हणतात
धारणाद्धर्म इत्याहुर्धर्मेण विधृताः प्रजाः ।।
यः स्याद्धारणसंयुक्तः स धर्म इति निश्चयः ।।
(अध्याय १०.११)
दुसरे स्थळ कर्णपर्वात आहे.
अतीत व विवेकवाद
फेब्रुवारी ९४च्या दि. १९ व २० या दोन दिवशी सातारा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर अकादमीने आयोजित केलेले पहिले विचारवेध संमेलन भरले होते. विषय होता ‘धर्म’ आणि संमेलनाचे अध्यक्ष होते प्रा. मे. पुं. रेगे. आपल्या प्रदीर्घ छापील अध्यक्षीय भाषणात प्रा. रेग्यांनी ज्याला ते ‘अतीत’ हे नाव देतात त्यावर एक अतिशय प्रभावी निबंधसादर केला. प्रा. रेग्यांचा तत्त्वज्ञानाचा व्यासंग आणि त्यावरील अधिकार हे दोन्ही अव्वल दर्जाचे आहेत. त्यामुळे त्यांनी धर्माच्या वतीने दिलेल्या समर्थनाला मोठी प्रतिष्ठा आहे. त्याविषयी मतभेद नोंदवणे ही धाडसाची गोष्ट आहे.
परंतु तरीही मला वाटते की त्यांनी केलेले अतीताचे समर्थन निर्णायक नाही, आणि हे दाखविण्याचा प्रयत्न मी करणार आहे.
प्रा. रेग्यांची अतीतवादी मीमांसा
सातार्याच्या विचारवेध संमेलनात प्रा. रेग्यांनी केलेल्या अध्यक्षीय भाषणातील काही भागाचा हा सारांश. रेग्यांच्या अतीतवादी धर्म आणि नीतीमीमांसेचा प्रतिवाद याच अंकात प्रा. दि. य. देशपांड्यांनी केला आहे. तो वाचताना शीघ्र संदर्भ म्हणून हा आढावा उपयोगी पडावा.
विसाव्या शतकातील धर्मचिंतनाकडे वळण्यापूर्वी रेग्यांनी त्याची प्रदीर्घ तत्त्वज्ञानात्मक पार्श्वभूमी कथन केली आहे. तिचा आलेख येथे आहे. पण व्याख्यानाच्या उत्तरार्धातील भारतीय-हिंदू विचाराचा ऊहापोह या सारांशात नाही. तद्वत विसाव्या शतकातील तीन प्रभावी विचारसरणी – मार्क्सवादी, मनोविश्लेषणवादी आणि अस्तित्ववादी – व धर्म यांच्या संबंधाची चर्चाही येथे गाळली आहे.
धार्मिक अनुभव व आचरण यांचा गाभा
इंद्रियांना प्रतीत होणार्या जगापलीकडे अतीत तत्त्व आहे.
बँकॉक परिषदेत जाणवलेले स्त्री-प्रश्नांचे भेदक वास्तव
पुढील लेख लोकसत्ता दैनिकाच्या २७ मार्चच्या अंकात प्रसिद्ध झाला आहे तो आमच्या वाचकांनी आधीच वाचला असेल. तरीसुद्धी आम्ही तो पुनर्मुद्रित करीत आहोत याचे कारण त्या विषयाचे गांभीर्य. स्त्रीपुरुषसमतेच्या आदर्शापासून आपण अजून इतके दूर आहोत कीती जगातील बहुतेक देशात ती औषधालासुद्धा सापडत नाही. या गंभीर विषयाकडे वाचकांचे लक्ष आकृष्ट होऊन त्यांना त्याविषयी काहीतरी करणे अत्यावश्यक आहे याची जाणीव व्हावी हा या पुनर्मुद्रणाचा हेतू. – संपादक
स्थळ : बँकॉक
अफगाणिस्तानमधील दोन स्त्रियांचे मृतदेह समोरच्या व्हिडिओ फिल्मवर दिसत होते. ते पाहून सार्या स्तंभित झाल्या.
कोणती वैवाहिक नीती अधिक चांगली
कोणत्याही देशांतील बहुसंख्य लोकांची अशी पक्की खात्री असते की आपल्या देशातील विवाहसंस्था सोडून अन्य सर्व विवाहसंस्था अनैतिक आहेत, आणि जे लोक असे मानीत नाहीत त्यांना आपल्या स्वैर जीवनाचे समर्थन करावयाचे असते असे ते समजतात. भारतात विधवांचा पुनर्विवाह ही गोष्ट परंपरेने अत्यंत भयंकर मानली गेली आहे. कॅथलिक देशात घटस्फोट पाप मानला जातो, पण वैवाहिक दुर्वर्तन, निदान पुरुपांचे, काही प्रमाणात क्षम्य मानले जाते. अमेरिकेत घटस्फोट सुलभ आहे, पण विवाहबाह्य संबंध फार मोठा दोष मानतात. मुसलमानांना बहुपत्नीकत्व संमत आहे, पण आपण ते निंद्य समजतो.
पत्रव्यवहार
– १ –
स.न.वि. वि.
सीतारामपंत देवधर यांचे ‘माझा जीवनवृत्तांत’ (१९२७) हे आत्मचरित्र वाचण्यात आले. ते आगरकरांचे सुधारक चालविण्यात प्रथमपासूनचे सहकारीआगरकरांच्या निधनानंतरही दीर्घकाल त्यासाठी धडपडणारे. त्या पुस्तकातील पृ. १०५ ते १६७ हा भाग आपल्या पाहण्यात आला नसल्यास आपल्याला कुतूहलाचा वाटेल. या मजकुरातील खूपच भाग ‘आद्य सुधारक या शीर्षकाखाली आपल्याला प्रसिद्धही करता येईल असे वाटते.
वाचताना काही निर्देश आढळले.
(१) सुधारकाचे सर्व अंक उपलब्ध नाहीत (पृ. १५५).
(२) १४ ऑक्टोबर १८९५ चा सुधारकचा अंक. न्या. रानड्यांनी याच्या दहा हजार प्रती काढून वाटल्या होत्या.