सर्व धर्मशास्त्र पुरुषी आहे
सर्व धर्मशास्त्र पुरुषी आहे आणि ते मुख्यतः समाजातील ज्या वर्गात पुरुष बायकांना पोसतात अशा वर्गाने बनविले आहे आणि ते सर्व समाजाच्या माथी मारले आहे. हिंदुस्थानात ज्या स्त्रिया कुटुंबपोषणासाठी बाहेर जाऊन काम करतात अशाच स्त्रिया तीन चतुर्थांश आहेत. असे असता पुरुषांनी पोसलेल्या एक चतुर्थांश स्त्रियांना लागू पडणारे नियम सर्व समाजावर लादणे हा अन्याय आहे…… आणखी असे की राष्ट्र म्हणजे बायका, पुरुष नव्हेत. समाजातले तीन चतुर्थांश पुरुष मरून गेले व बायकाच उरल्या तरी पुढची पिढी अनेकपत्नीपद्धतीचा अवलंब करून भरून काढता येईल; पण बायकाच जर मेल्या आणि पुरुष सपाटून उरले, तर राष्ट्रसंवर्धन होणार नाही. यासाठी प्रजावर्धनासाठी जे नीतिनियम करावयाचे त्यांचे कर्तृत्व पुरुषांकडे ठेवता येणार नाही.
– श्रीधर व्यंकटेश केतकर