लग्न ही सर्वसामान्य प्रत्यही घडणारी गोष्ट आहे. मग ही खरेदीविक्रीची पद्धत अजून का नाही बंद पडत? विशेषतः शाळा कॉलेजांतून जाणाऱ्या मुलींना ‘पाहण्याची’ काय आवश्यकता आहे? आम्ही पडदानशीन थोड्याच आहोत? शाळेत जाता-येता मुलगी अव्यंग आहे की नाही हे सहज अजमावता येईल. घरी येऊन तरी चहापोहे झोडून मुलीला चारदोन मामुली प्रश्न विचारण्यापलीकडे वरपक्ष काय करतो? मुलीचे शील व स्वभाव एका दृष्टिक्षेपात ओळखण्याची कुवत वरपक्ष झाल्याने अंगात येते थोडीच! मग वधूपरीक्षेचा अर्थ तरी काय? पाहून मुलगी केल्यावरही ‘तिला अंधारात उभी केली होती’, ‘ती जरा पाठमोरी बसली होती’ वगैरेसारखी क्षुल्लक कारणे सांगून मुलीला वाईट ठरविण्याचा प्रयत्न नाही का लोक करीत!
मासिक संग्रह: फेब्रुवारी, १९९४
बालमजुरांची ससेहालपट
एका ‘आई जेवू घालीना, बाप भीक मागू देईना’, या म्हणीप्रमाणे देशातील सुमारे एक कोटी ८० लाख बालमजुरांची स्थिती सरकारने कशी करून टाकली आहे, याचे उदाहरण म्हणून रमेश कुमारच्या कर्मकहाणीकडे बोट दाखविता येईल. रमेश कुमारचे अपहरण करण्यात आले तेव्हा त्याचे वय होते सात वर्षांचे. आज रमेश कुमार १४ वर्षांचा आहे. गेली सात वर्षे त्याने उत्तर प्रदेशातील एका गालिचे बनविण्याच्या कारखान्यात वेठबिगार बालमजूर म्हणून काढली आहेत. दिवसाचे १३ ते १५ तास काम, अपुरे जेवण, कारखान्यातच राहण्याची सक्ती यामुळे रमेश कुमार १४ वर्षांचा असूनही तेवढ्या वयाचा वाटत नाहीं.
नोव्हेंबर १९९३ च्या अंकातील ‘फलज्योतिषावर शोधज्योत’ या डॉ. पु. वि. खांडेकर यांनी लिहिलेल्या लेखाला पुरवणी.
वरील लेखाच्या शेवटी जी भाकिते दिली आहेत त्यातील ‘इलस्ट्रेटेड वीकली’ च्या २० मे ८४ च्या अंकात ज्यांची भाकिते दिली आहेत त्यांची नावे अशी- फलज्योतिषी बेजन दारूवाला व तांत्रिक प्रवीण तलाठी ह्यांची भाकिते समोरासमोर दिली आहेत. त्यांतील काही परस्पर-विरोधी आहेत. आणखी लक्षात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे हा मुलाखत-वजा लेख थिल्लर व पोरकट विधानांनी— दोघांच्याही – भरगच्च भरलेला आहे. प्रवीण तलाठीची काही भरमसाठ वक्तव्ये. त्यातले एक असे- “मी आणखी एक हवन केले आणि चरणसिंगाला पंतप्रधान केले.” आणखी एक नमुना पहा. “आपल्या देशातील परदेशांच्या राष्ट्रविघातक कारवायांचा नायनाट करण्यासाठी तंत्रविद्येचा उपयोग केला पाहिजे.”
प्रा. श्रीनिवास दीक्षित यांना उत्तर
प्रा. दीक्षितांनी ‘विज्ञानाला उद्गामी विज्ञान म्हणतात’ या माझ्या वाक्यातील एका अडचणीवर बोट ठेवले आहे. ते वाक्य विश्लेषकही आहे आणि संश्लेषकही आहे असे म्हणावे लागेल ही ती अडचण. प्रा. दीक्षितांचे म्हणणे मला स्थूलपणे मान्य आहे. माझ्या नीतिशास्त्राचे प्रश्न या पुस्तकात त्यांना अभिप्रेत असलेला भेद मी केला आहे. परंतु खरे म्हणजे खुद्द इंग्रजीत (आणि मला वाटते जर्मन भाषेतही) ‘Science’ या शब्दाचा उपयोग अजून बराच शिथिल आहे. उदा. द्वाकच्या तर्कशास्त्रावरील एका पुस्तकाचे नाव ‘Introduc- tion to Logic and the Methodology of Deductive Sciences’ असे आहे.
चारचौघी
चारचौघी पाहिले त्यावेळी त्या नाटकाने बऱ्यापैकी वादळ उठविले होते. मिळून साऱ्याजणीने चर्चा घडवून आणली होती. उत्तरे शोधत असणाऱ्या या चौघी प्रश्नच जास्त उभे करतात असे वाटले. या चौघीतली आई एक सुविद्य शिक्षिका. तीन मुलींची अविवाहित माता. मुलींचे वडील आबा स्वतःचा स्वतंत्र संसार सांभाळून या तीन मुलींचे जन्मदाते होतात. त्यांच्या आईशी लग्न न करता.
बहिणींतली मोठी विद्या. नावाप्रमाणे शिकून एम्. ए., पीएच.डी झाली. कॉलेजात प्राध्यापक म्हणून यशस्वी झालेली. तिचा नवरा आशिस हा पत्रकार. त्याचे एका सहव्यावसायिकेबरोबर लफडे सुरू असल्याचे पाहून त्याच्याशी भांडून विद्या आईकडे माघारी आलेली.
पुस्तक परीक्षण – समतामूलक पर्यावरणवादी वैश्विक समाजरचनेचा वेध
या विश्वपसाऱ्यामध्ये माणसाचे स्थान खरे तर बिंदुवत्. परंतु निसर्गाने बहाल केलेल्या बुद्धिमत्तेमुळे माणूस पृथ्वीवरील इतर प्राणिमात्रापेक्षा वरचढ ठरला, तर सुखासीनतेच्या लालसेतून एका शोषणयुक्त समाजव्यवस्थेचा तो प्रेरक ठरला. आज पृथ्वीवरील सृष्टीचे एकूणच अस्तित्व माणसाच्या विवेकी वा अविवेकी वागणुकीने ठरणार आहे. माणसाचे जीवसृष्टीतील नेमके स्थान, त्याच्या प्रेरक व कारक शक्ती, त्याच्या स्वभावाची गुंतागुंत, त्याच्या जीवनातील ईश्वरी प्रेरणेचे स्थान, मानवी जीवनाचे प्रयोजन हे नेहमीच अध्यात्म, तत्त्वज्ञान, मानसशास्त्र व समाजशास्त्र यांच्या अभ्यासकांचे चिंतनाचे विषय राहिले आहेत. श्री. श्रीकांत कारंजेकर यांनी लिहिलेल्या “वैश्विक जीवनाचा अर्थ ” या छोट्या पुस्तकातून अशाच प्रश्नांचा इहवादी दृष्टिकोनातून मागोवा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
मनुस्मृती व विवेक
आपल्या चालीरीतींवरील मनुस्मृतींचा पगडा किंवा नामवंतांनी केलेला तिचा पुरस्कार पाहिल्यावर आपण मनुस्मृती वाचण्यास उद्युक्त होतो. वे.शा.सं. विष्णुशास्त्री बापट यांचे मनुस्मृतीचे संपूर्ण मराठी भाषांतर (प्रकाशक: रघुवंशी प्रकाशन, मुंबई) आपल्या तत्संबंधीच्या बहुतांश गरजा पूर्ण करते. चालीरीतींवर जसा परंपरागत संस्कारांचा प्रभाव असतो, तसाच तो त्याविषयी साकल्याने विचार करणाऱ्या सामाजिक नेतृत्वाचाही असतो. हे नेतृत्व जेव्हा, “हे सर्व समाजाच्या व व्यक्तींच्या हितासाठी आहे,” अशी भूमिका घेते, तेव्हा त्यातील तथ्य जाणून घेणे महत्त्वाचे ठरते, व हाच या लेखामागील हेतू आहे. केवळ धर्मवाक्य म्हणून ज्यांची श्रद्धा मनुस्मृतीत गुंतली आहे, त्यांच्यासाठी प्रस्तुत भाषांतर हे निश्चितच उपयोगी आहे.
प्रोफेसर रेगे –एक उत्तमपुरुष
प्रोफेसर रेगे हे एक कूट आहे. त्याला अनेक उपांगे आहेत. त्यातली काही उकलतात. काहींच्या उत्तरासाठी त्यांनाच बोलते करावे लागेल.
एक सोपे कोडे असे की प्रो. रेगे यांची योग्यता आणि त्यांना मिळालेली मान्यता यांत एवढी तफावत का?
तत्त्वज्ञान हा रेग्यांचा प्रांत. त्यात आज अग्रपूजेचा मान त्यांचा. महाराष्ट्रातच नाही तर अखिल भारतात. तो त्यांना लाभलेला अजून दिसत नाही. मात्र त्याचे दुःख त्यांना नाही. इष्टमित्रांनाच तेवढी हळहळ. भारतात स्वातंत्र्याच्या पहाटेच तत्त्वज्ञानाला बरे दिवस लाभले. इंडियन कौन्सिल ऑफ फिलॉसॉफिकल रिसर्च स्थापन झाली. निवडक विद्यापीठात तत्त्वज्ञानाच्या अध्ययनास्तव अॅडव्हान्स्ड सेंटर्स उघडली गेली.
तत्त्वज्ञानाची ओळख (भाग ११)
आयडियलिझम (Idealism) म्हणजे काय ?
रशियामध्ये १९१७ साली क्रांती झाली आणि तेथे मार्क्सप्रणीत कम्युनिस्ट राजवट स्थापन झाली. एवढे मोठे राजकीय यश मिळाल्यामुळे मार्क्सवादाला अभूतपूर्व प्रतिष्ठा प्राप्त झाली. जगभर वेगवेगळ्या देशात कम्युनिस्ट पक्षांची स्थापना झाली आणि कम्युनिस्ट चळवळी सुरू झाल्या. अनेक ठिकाणी त्यांची सरकारेही स्थापन झाली. भारतातही हे लोण लगेच येऊन पोचले आणि नव्या युगाचे तत्त्वज्ञान म्हणून मार्क्सवादाचा पुरस्कार ‘पुरोगामी’ मंडळींकडून करण्यात आला. मार्क्सच्या ग्रंथांचा अभ्यास होऊ लागला.
परंतु मार्क्सच्या तत्त्वज्ञानाला हेगेलच्या तत्त्वज्ञानाची पार्श्वभूमी होती, आणि हेगेलच्या तत्त्वज्ञानाला दोन हजार वर्षांची दीर्घ परंपरा, आणि विशेषतः दोनशे वर्षांची परंपरा, यांची पार्श्वभूमी होती.
पत्रव्यवहार
आजचा सुधारकच्या चौथ्या वर्षाच्या पहिल्या व दुसऱ्या (एप्रिल-मे १९९३) जोड अंकाच्या संपादकीयातील मला महत्त्वाची वाटलेली वाक्ये उद्धृत करून त्यांना अनुलक्षून मी काही सूचना करू इच्छितो. ही वाक्ये अशी- “बालमृत्यू घडवून आणणाऱ्या कारणांना न सुदृढ होत जुमानता आजचा सुधारक ज्या चिवटपणाने उभा आहे त्यावरून हे बाळ असेच जाईल आणि दीर्घायुषी होईल असा विश्वास आम्हाला वाटतो आहे. परंतु ते अजून स्वावलंबी होण्याइतके सुदृढ झालेले नाही हेही सांगितलेच पाहिजे.”
(अ) मासिकात प्रसिद्ध होणाऱ्या मजकुराविषयीच्या सूचना
१) कोणताही लेख जास्तीत जास्त एक हजार शब्दांचा म्हणजे मासिकाच्या तीन पानांइतकाच राहील याची सर्व लेखकांनी कटाक्षाने काळजी घेतली पाहिजे.