श्रुति-प्रामाण्य
आपले पूर्वज अशा काही ऋषिमुनींनी जीव आणि जगताच्या बाबतीत–’हे कसे ? हेच सत्य, हीच चरमवाणी’ असे लिहून ठेवले आहे. यांना तुम्ही वाटल्यास वेद उपनिषद म्हणा, अथवा तपश्चर्येने समजून घेतलेल्या गोष्टी म्हणा किंवा देवांनीच हे सर्व कानात सांगितले असे म्हणा; मला मात्र एक संशय आहे. हे विश्व, ही चराचर सृष्टी यांच्याबाबतीत अल्पस्वरूप वाचनाने मी काही ज्ञान मिळविले आहे. जीवनाने या यात्रेला केव्हा आरंभ केला, ही जीवनयात्रा कुठे चालली आहे, प्रवासाला आरंभ केल्यावर बऱ्याच काळपर्यंत वाटेतील स्टेशनावर गाडीत चढणाऱ्या उतारूप्रमाणे माणूस नावाचा प्राणी आत प्रवेश करून काही वेळ बसून उतरूनही जातो, पण जीवनाचा प्रवास तर अजून पुढेच जात असतो. त्याचे ध्येय काय हे अजून कोणालाच समजले नाही. पुढची वाट न मोजता येण्याइतकी लांबसडक असते. अशा स्थितीत एखाद्याने ‘मी याचे रहस्य जाणतो किंवा अमुकच सत्य आहे’ असे जर तारस्वराने सांगितले तर ते हास्यास्पद होणार नाही का?
शिवराम कारंत: ‘मृत्यूनंतर पृ.-७