मासिक संग्रह: ऑगस्ट, १९९३

सुधारकाग्रणी गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार वितरण-समारंभाचा वृत्तांत

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने दि. १४ जुलै ह्या गोपाळ गणेश आगरकर ह्यांच्या जन्मदिनी, पुणे येथील टिळक स्मारक मंदिरात सुधारकाग्रणी गोपाळ गणेश आगरकर पुरस्कारवितरणाचा कार्यक्रम संध्याकाळी सहा वाजता आयोजित केला होता.

पाहता पाहता टिळक स्मारक मंदिरातील सभागृह श्रोत्यांनी गच्च भरले. त्यात आपापल्या क्षेत्रातील ज्येष्ठश्रेष्ठ मंडळी होती. डॉ. भा. दि. फडके, श्री वसंत पळशीकर, डॉ. अनिल अवचट, ताहेरभाई पूनावाला, श्री मुकुंदराव किर्लोस्कर, डॉ. बाबा आढाव, श्री विलास चाफेकर, डॉ. भा. ल. भोळे, इ. इ.

सुरुवातीला श्रीमती नीता शहा यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याचा अहवाल सादर केला.

पुढे वाचा

मुळासकट उखडलेल्या- (रक्त पहाट)

सत्तेचाळीस साली स्वातंत्र्याबरोबर फाळणी आली. दोन्हीकडचे अल्पसंख्यक, विशेषतः पंजाबात बळी गेले. संपत्तीइतकीच-किंवा जास्तच-स्त्रियांची लूट झाली. सुजल, सुफल पंजाब “आँधी गम की यूँ चली, बाग उजड़ के रह गया” असा झाला. ‘मारो-काटो’चे वादळ थोडे शमले तेव्हा घरादारांना मुकलेल्या स्त्रियांची आठवण नेते मंडळींना झाली. त्यांचा शोध घेण्यासाठी उभय देशांनी करार केले. पाकिस्तानात लाहोरला आणि भारतात जालंधर येथे मुख्य छावण्या उघडल्या. मिळालेल्या तक्रारींचा तपास करून अपहृत स्त्रियांच्या पुनःप्राप्तीसाठी तळ उभे केले. लाहोरच्या तळावर प्रमुख म्हणून कमळाबेन पटेल या कार्यकर्तीची योजना झाली. सत्तेसाळीस सालच्या डिसेंबरपासून पुढील २ वर्षे त्या तिथे होत्या.

पुढे वाचा

समाजातील मुलींची घटती संख्याः कारणमीमांसा व उपाययोजना

भारतीय लोकसंख्या आयोगाचा दुसरा अहवाल नुकताचा मागील आठवड्यात वाचावयास मिळाला. १९९१ च्या जनगणनेतील माहितीच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे. या अहवालामध्ये १९८१ ते १९९१ या दशकात जन्मलेल्या बालकांपैकी ६० लाख बालकांचा अभ्यास करण्यात आला असून, जन्मणाऱ्या बालकांत मुलींची संख्या मोठ्या प्रमाणात घटत चालल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या घटणाऱ्या संख्येबाबत भारत सरकारनेही गंभीर चिंता व्यक्त केली आहे.

आपल्या देशात दर हजार मुलांमागे केवळ ८९१ मुली जन्म घेतात. सुमारे ४० वर्षांपूर्वी, म्हणजे १९४९ ते १९५८ या दशकात, दर हजार मुलांमागे ९४२ मुलींचा जन्म होत होता.

पुढे वाचा

धारणात् धर्म इत्याहुः।

नोव्हेंबर-डिसेंबर १९९२ ते जून १९९३ या दरम्यान आजचा सुधारकच्या अंकांमधून दि. य. देशपांडे, श्री. गो. काशीकर व दिवाकर मोहनी यांच्यात झालेली चर्चा परवा सलगपणे वाचली. वेगळ्या दिशेने मुद्द्याला भिडायला हवे असे मला दिसते.

काशीकर म्हणतात त्याप्रमाणे “समाजाचा घटक ह्या नात्याने म्हणजे समाजधारणेच्या दृष्टीने उपयुक्त असा व्यक्तींचा आचार-विचार-समूह म्हणजे धर्म” ही व्याख्या करून चर्चेला आरंभ होऊ शकतो.

(१) आधुनिकपूर्व काळातील सर्वच ‘रिलिजन हे त्याच वेळी काशीकरांच्या अर्थाने धर्मही होते असे यातून निष्पन्न होते. हिंदू धर्माचे वेगळेपण, तो ‘रिलिजन’ नव्हता वा नाही, यात नाही.

पुढे वाचा

तत्त्वज्ञानाची ओळख (भाग ५)

तार्किकीय ज्ञान (२)

गेल्या लेखांकात आपण तार्किकीय सत्यांचा (logical truths) किंवा तार्किकीबलाने सत्य असणाऱ्या विधानांचा परिचय करून घेतला. तार्किकीबलाने सत्य असणाऱ्या विधानांत जरी न-तार्किकीय (non-logical) शब्द असले तरी त्या विधानांच्या सत्यतेच्या दृष्टीने त्यांची उपस्थिती व्यर्थ असते, कारण तार्किकीय सत्यांची सत्यता केवळ तार्किकीय शब्दांच्या उपस्थितीवरच अवलंबून असते. म्हणूनच तार्किकीय विधाने आपल्याला जगाविषयी कसलीही माहिती देत नाहीत.
तार्किकीबलाने सत्य असणारी विधाने आपल्याला जगाविषयी कसलीही माहिती देत नाहीत असे आपण म्हणालो आहोत. पण जर हे खरे असेल तर तार्किकीय सत्यांचा उपयोग काय? असा प्रश्न या ठिकाणी उद्भवेल.

पुढे वाचा

कृत्रिम बंधनांच्या प्रतिकारासाठी शिकस्त करा

……गृहस्थाश्रम हीच स्वाभाविक स्थिति होय. प्राचीनकाळी बहुधा सर्व मनुष्यांना या स्थितीचा अनुभव घ्यावयाला मिळे. पण अर्वाचीन काळी भिन्न परिस्थितीमुळे पुष्कळ स्त्रीपुरुषांना अविवाहित स्थितीत आयुष्य कंठणे भाग पडत आहे व यापुढे ही संख्या झपाट्याने वाढत जाणार आहे. ही स्थिति नाहींशी करण्यासाठी निदान तिची तीव्रता कमी करण्यासाठी उपाय शोधून काढणे हा फार गहन प्रश्न आहे व त्याशी झगडण्याला तेजस्वी पुरुष पाहिजेत. पण मनुष्याला त्याच्या स्वाभाविक स्थितीचा उपयोग घेऊ न देणारी कृत्रिम बंधनें जर समाजांत उत्पन्न झाली असतील, तर त्यांचा प्रतिकार करण्यासाठी आपली शिकस्त करणे हे सामान्य मनुष्याचे देखील कर्तव्य आहे.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

संपादक , आजचा सुधारक,
स.न.वि.वि.
भारतातून जे लोक अमेरिकेला जातात त्यांच्याबद्दल एक गोष्ट प्रकर्षाने मला फार जाणवते, ती अशी की हे सर्वजण उच्च शिक्षित आहेत. ते हुशार आहेत. ते ज्या काळांत उच्च शिक्षित झाले त्या काळांत कॅपिटेशन फीची कॉलेजेस् नव्हती.
साहजिकच हे सर्वजण शासकीय शिक्षण संस्थांमधून उच्च शिक्षित झाले. तेथे शुल्क अत्यल्पच होते. त्या शुल्कामधून मिळणाऱ्या पैशातून कोणतीही शिक्षणसंस्था चालविता येणार नाही. साहजिकच ह्या उच्च शिक्षणाच्या संस्था सरकारी अनुदानावर चालविण्यात येतात. जे. जे., के. ई. एम. किंवा पवईचे आय. आय. टी.

पुढे वाचा