मासिक संग्रह: जानेवारी, १९९३

पत्रव्यवहार

संपादक,आजचा सुधारक,
स.न.वि.वि.
प्रा. रूपा कुलकर्णी ह्यांनी बौद्धधर्म स्वीकारल्याचे वाचले. त्यांचे अभिनंदनसुद्धा केले गेले. वास्तविकरीत्या आपण ज्या देशाचे नागरिक आहोत, त्या देशाच्या घटनेचे आणि इतर कायदेकानूंचे पालन केले की, ह्या पृथ्वीतलावर सुखाने जगण्यास ते पुरेसे आहे.
भारताच्या घटनेनुसार धर्म ही ज्याची त्याची खाजगी बाब आहे. व्यक्ती कोणत्या धर्माची आहे, ह्याच्याशी शासनाला कर्तव्य नाही. सर्वच धर्म पारलौकिक समाधान कशा प्रकारे मिळावे ह्यासाठी आहेत. इहलौकिक समाधानासाठी धर्माची जरुरी नाही.
ज्येष्ठ नागरिक नात्याने इंग्रजी म्हण सांगावयाची झाली तर व्यक्ती वयाच्या साठीनंतर शहाणी झाली असे समजतात.

पुढे वाचा

विवेकवादाच्या एका व्यासपीठाची ओळख

गोष्ट पासष्टीची, ले. शांता किर्लोस्कर, वितरक – मौज प्रकाशन गृह, गिरगांव, मुंबई -४, किंमत रु. १५०/
किर्लोस्कर खबर १९२० च्या जानेवारीत निघाले तेव्हा ते अक्षरशः चारपानी चोपडे होते. त्याच्या ३०० प्रती काढल्या आणि ‘आप्तमित्र, ग्राहकबंधूंना वाटल्या. जगप्रसिद्ध फोर्ड या मोटार कारखान्याचे फोर्ड टाइम्स हे मासिकपत्र पाहून शंकररावांना स्फूर्ती झाली आणि ही खबर निघाली. पुढे हे मासिक वाढतच गेले. दहा वर्षांनी स्त्री आणि आणखी चार वर्षांनी चौतीस साली मनोहर असा परिवार वाढला. मासिकांच्या विकासाची ही कहाणी मोठी आहे. चांगली पासष्ट वर्षांची. १९८४ साली सामाजिक परिवर्तनाचे एवढे काम केलेली ही संस्था एखाद्या मालमत्तेसारखी विकली गेली.

पुढे वाचा

पुस्तक परिचय

गोपाळ गणेश आगरकर, ले.- स.मा. गर्गे, प्रकाशक – नॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया, ए-5 ग्रीन पार्क नवी दिल्ली ११० ०१६, किमत रु. २३.००, पृष्ठंख्या १५० + १०
आपल्या देशात जे अनेक थोर लोक होऊन गेले त्यांचा परिचय करून देण्यासाठी पुस्तके प्रकाशित करणे ही आपली जबाबदारी आहे असे चांगले प्रकाशक समजतात. त्यासाठी ते अशी पुस्तके अभ्यासू लेखकांकडून लिहवून घेतात, आणि सुबक अशी पुस्तके वाचकांच्या हाती देतात. गोपाळ गणेश आगरकर हे छोटेखानी पुस्तक अशाच पुस्तकांपैकी एक आहे. चरित्रनायकाच्या कार्याचे मूल्यमापन करण्यासाठी, त्याच्या कार्याचा वा व्यक्तिमत्त्वाचा एखादा उपेक्षित पैलू वाचकांच्या नजरेस आणून देण्यासाठी लिहिलेला हा ग्रंथ नाही.

पुढे वाचा

आगरकर-चरित्राच्या निमित्ताने

राष्ट्रीय चरित्रमालेसाठी गोपाळ गणेश आगरकर यांचे एक संक्षिप्त चरित्र प्रख्यात विचारवंत, लेखक आणि समाजविज्ञान-कोशकार श्री स. मा. गर्गे यांनी लिहिले आहे. आजचा सुधारक गेली दोन अडीच वर्षे आगरकरांनी पुरस्कारलेल्या विवेकवादाचा प्रसार आपल्या मगदुराप्रमाणे करीत आहे. तेव्हा त्याने या अल्पचरित्राची ओळख आपल्या वाचकांना करून द्यावी म्हणून श्री गर्गे यांनी ते आमच्याकडे धाडले. त्या चरित्राच्या निमित्ताने आगरकरांना आदरांजली वाहण्याची ही संधी आम्ही घेत आहोत.
टिळक आणि आगरकर या दोघांचाही जन्म १८५६ चा. धाकट्या शास्त्रीबुवांनी निबंधमालेतून आधुनिक शिक्षितांस केलेल्या विज्ञापनेने भारावून गेलेले हे दोघेही तरुण या हतभाग्य भारतभूच्या चरणावर आपली जीवनकुसुमे वाहण्यासाठी शास्त्रीबुवांच्या उद्योगात सामील झाले.

पुढे वाचा

संभ्रमात टाकणारे इतिहास-संशोधन

‘श्रीरामाची अयोध्या उत्तरप्रदेशात नसून अफगाणिस्थानात असावी’ असा दावा बंगलोर येथील इन्डियन इन्स्टिस्टूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्सचे डॉ. राजेश कोछर यांनी केल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इन्डियाच्या दि. २० ऑक्टोबर १९९२ च्या अंकात प्रसिद्ध झाले आहे. दुसरी अशाच प्रकारची बातमी नागपूरच्या हितवाद च्या दि. २३ नोव्हेंबर १९९२ च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. त्या बातमीत म्हटले आहे की, डॉ. आर.के. पाल नावाच्या हौशी प्राच्यविद्या संशोधकाने गौतम बुद्ध हा मेसोपोटेमियात होऊन गेला, असा शोध लावला. दोन्ही शोध निश्चितच पारंपरिक मताला धक्के देणारे आहेत. जुनी कागदपत्रे, शिलालेख वा पुरातत्त्वीय अवशेष यांच्या नवीन उपलब्धीमुळे नवीन प्रमेये मांडली जातात आणि इतिहासावर नवा प्रकाश पडतो.

पुढे वाचा

विवाहाविषयी आणखी थोडे

श्री संपादक, आजचा सुधारक, यांस,
आपल्या ऑक्टोबर १९९२ च्या अंकामध्ये विवाह आणि नीती ह्या विषयावर आपण आपली स्वतःची भूमिका मांडली आहे. नोव्हेंबर-डिसेंबरच्या अंकात स्त्री उवाच ह्या वार्षिकाचा परिचय अनुराधा मोहनी ह्यांनी करून दिला आहे, त्यात विवाह हा विषय आहे, आणि त्याच अंकात श्री. गं.र. जोशी ह्यांचे ‘समतावादी कुटुंब!’ ह्या शीर्षकाचे पत्र त्याच विषयावर आपण प्रकाशित केले आहे. त्यांपैकी श्री गं.र. जोशी ह्यांच्या पत्राविषयी माझे मत.
लग्न ह्या विषयाचा आवाका फार मोठा आहे. त्याचे अगणित पैलू आहेत. ती आपल्या सध्याच्या कुटुंबसंस्थेची आधारशिला असल्यामुळे तो संपूर्ण मानवजातीच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.

पुढे वाचा

तत्त्वज्ञानाची ओळख (भाग-१)

तत्त्वज्ञान का शिकले पाहिजे?

तत्त्वज्ञान का शिकले पाहिजे? या प्रश्नाला सामान्यपणे पुढील उत्तर दिले जाईल. ‘तत्त्वज्ञान शिकण्याची काहीच आवश्यकता नाही. तत्त्वज्ञान म्हणजे घटपटाची निरर्थक झटापट करणारा उद्योग. रिकामटेकड्या लोकांनी वेळ घालविण्याकरिता निर्माण केलेला एक खेळ. त्याचा जीवनात कसलाही उपयोग नाही. जीवनाच्या कोणत्याही समस्येशी त्याचा कोणताही संबंध नाही. ज्याला हिंदीत ‘बाल की खाल निकालना’, म्हणजे केसाची साल काढणे, म्हणतात, ते करणारा व्यवसाय. केस ही मुळात किती बारीक वस्तु, तिची साल काढल्यावर शिल्लक काय उरणार? म्हणजे जिथे कसलाही भेद नाही तिथे भेद उकरून काढणारा हा विषय आहे.’

पुढे वाचा

सुधारणा झाल्या?

प्रश्न : स्त्रिया… डॉक्टर-इंजीनिअर झाल्या आहेत, विमानेसुद्धा चालवण्याचे प्रयोग झाले आहेत, तरी तुम्हाला स्त्रीजीवनात सुधारणा झाली असं वाटत नाही. सुधारणा म्हणजे नेमके कोणते बदल तुम्हाला अपेक्षित आहेत?
गीता साने : हे विशिष्ट वर्गात-मध्यमवर्गात झालेले बदल आहेत. … मध्यमवर्गात शिक्षण वाढलं, विचार वाढला, जीवनसंघर्षही वाढला, यातून विशिष्ट वर्तुळात काही सुधारणा झाल्या. पण मध्यमवर्गाचं प्रमाण फक्त आठ टक्के आहे. बाकीचा सगळा खालचा वर्ग आहे. या वर्गात परिवर्तन झाल्याशिवाय पूर्ण चित्र बदलणार नाही. या बायकांना कोणतंही स्वातंत्र्य मिळालेलं नाही. कायदे तुम्ही वाटेल ते करा, त्यांच्यापर्यंत ते पोहोचत नाहीत….

पुढे वाचा