‘आजचा सुधारक’ या मासिकाच्या संपादकांनी ‘धर्मनिरपेक्षता (सेक्युलरिझम) या विषयावर एक परिसंवाद घ्यावा या हेतूने प्रा. भा. ल. भोळे आणि श्री वसंत पळशीकर ह्या महाराष्ट्रातील ख्यातनाम विचारवंतांकडून एक दहा कलमी प्रश्नावली तयार करून घेऊन एप्रिल १९९१ च्या अंकात प्रकाशित केली. अनेक लेखकांनी ह्या उपक्रमांला प्रतिसाद देऊन आपापले विचार मांडले. मीही गेली ३०-४० वर्षे सेक्युलरिझम ह्या विषयावर लिहीत, बोलत असल्याने ‘आजचा सुधारक’मध्ये तीन लेख लिहिले.
गेल्या शंभरसव्वाशे वर्षांच्या इतिहासात आपल्या देशाला विनाशाकडे खेचून नेणार्या ज्या समस्येने आजच्या नेतृत्वाला आव्हान दिले आहे आणि ज्या समस्येची सोडवणूक अद्यापही होऊ शकली नाही ती समस्या म्हणजे हिंदु आणि मुस्लिम या दोन प्रमुख धार्मिक लोकसमूहांतील संघर्ष ही होय.
मासिक संग्रह: नोव्हेंबर, 1992
पत्रव्यवहार
समतावादी कुटुंब!
संपादक आजचा सुधारक यांस,
ऑक्टो. ९२ च्या ‘आजचा सुधारक’मध्ये ‘विवाह आणि नीती-आमची भूमिका’ या संपादकीयात समतावादी कुटुंबाची केलेली तरफदारी केवळ भयानक आहे. समतावादी कुटूंब कोणाला नको आहे? प्रत्येक गृहस्थाला व गृहिणीला ते हवेसे वाटते. ते सहजी होणारे नाही हे खरे, पण प्रयत्नसाध्य तर आहेच. जास्तीत जास्त लोकांचे जास्तीत जास्त सुख ह्या व्यवहार्य तत्त्वालाही कोणाचा विरोध असण्याचे कारण नाही. पण वरील संपादकीयात तथाकथित समतावादी कुटुंबाची ज्या पद्धतीने भलावण केली गेली आहे ती समाजस्वास्थ्यावरच घाला घालणारी आहे.
कामप्रेरणा ही भुकेसारखी स्वाभाविक व प्रबल प्रवृत्ती असल्याने तिची पुरुषार्थात गणना होऊन तिला वाट मिळून विवाहसंस्थेत तिचे उदात्तीकरण झालेले आहे.