विवाहयोग्य वय- वास्तव व प्रचार

मुलींच्या विवाहाचे योग्य वय १८ च्या वर व मुलांचे २१ च्या वर असा दूरदर्शनवर अनेक वर्षांपासून प्रचार करण्यात येत आहे. या वयांच्या आधी विवाह करणे हा कायद्याप्रमाणे गुन्हादेखील आहे. १८ वर्षांच्या खाली मूल झाल्याने स्त्रीच्या व अपत्यांच्या स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होतो हा या कायद्याच्या समर्थनासाठी मुख्य मुद्दा मांडण्यात येतो.

दोन तोटकी विधाने
आश्चर्याची गोष्ट अशी की वरील ठाम विधाने कशाच्या आधारावर केली आहेत हे कधीच सांगण्यात येत नाही. दूरदर्शनाकडे याबद्दल चौकशी करणारे एक पत्र पाठविले पण त्याचे उत्तर मिळाले नाही. तेव्हा मी स्वतःच या विषयीचे वाङ्मय धुंडाळले. त्यात खालील दोन चिल्लर विधानाखेरीज काही आढळले नाही.
(१) अण्डकोशांची (ovaries) वाढ साधारणपणे २० वर्षे वयाच्या आधी पूर्ण होत नाही.१० ते १४ वर्षाच्या दरम्यान ते फक्त क्रियेच्या दृष्टीने परिपक्व झालेले असतात. (एलिझाबेथ हरलॉकः डेव्हलपमेंटल सायकॉलॉजी)
(२) वीस वर्षांच्या वयाच्या आधी गर्धभारणा व प्रसूति सुरक्षित नसते. (R.w. Johnston : Text Book of Midwifery)

समालोचन
अण्डकोशांचा विचार करता क्रियात्मक पक्वताच महत्त्वाची आहे. चौदाव्या वर्षी उंचीची पूर्ण वाढ झालेली नसते. एवढ्याच कारणासाठी चौदा वर्षाच्या मुलाने वीस वर्षांच्या तरुणाशी कुस्ती खेळू नये असे कुणी म्हणत नाही. क्रीडाक्षेत्रात चौदा वर्षांची मुले तरुणांच्या बरोबरीने, एवढेच नव्हे तर त्यांच्यापेक्षा वरचढ रीतीने चमकतात हे सर्वक्षत आहे.

अण्डकोशाची बृहत्ता महत्त्वाची नसली तरी गर्भाशयाच्या बृहत्तेबद्दल तसे म्हणता येत नाही. पण डॉक्टरने कोणत्या पाहणीच्या आधारे वीस व वर हे गर्भधारणेच्या दृष्टीने सुरक्षित वय मानले आहे हे सांगितले नाही. शिवाय त्याच्या विधानावरून गर्भाशयाच्या पूर्ण वृद्धीचे २० हे वय शंभर टक्के मुलींचे आहे की चदंश मुलीचे आहे हे स्पष्ट होत नाही.

वय व गर्भाशयाची बृहत्ता यांचा संबन्ध दाखवणारी दत्ते (data) मला अजन सापडली नाहीत. पण उंचीची पूर्ण वाढ ही एकंदरीतच सर्व शरीराच्या वाढीचे गमक मानता येते. किन्सेने निवेदिलेल्या अन्वेषणानुसार ७५ टक्के मुलींच्या उंचीची पूर्ण वाढ वयाच्या सतराव्या वर्षीच झालेली असते. बाकीची २५ टक्के मुलींची वाढ पूर्ण होण्यास मात्र बाविसाव्या वर्षापर्यंतच बाट पहावी लागते. यावरून असे दिसते की डॉक्टरने गर्भाशयाच्या पूर्ण वाढीचे सांगितलेले २० हे वय, शंभर टक्के मुलींची पूर्ण वाढ होण्याचे हे वय आहे. बहंश मुलींना ते लागू नाही.
चार टक्के मुलांची उंची तेराव्या वर्षी व एक टक्का मुलींची बाराव्या वर्षीच पूर्ण वाढलेली असते हेहीलक्षात ठेवण्यासारखे आहे. शतमानांच्या भाषेत ही संख्या लहान दिसली तरी सत्तर कोटींच्या देशात ३५ लक्ष मुलींची पूर्ण वाढ बाराव्या वर्षी व १४ लक्ष मुलींची तेराव्या वर्षी पूर्ण झालेली असते, यावरून ही संख्या नगण्य वाटत नाही. गर्भाशयाची वाढ, उंचीच्या वाढीवरून अनुमानता येत नाही असे म्हणता येत नसल्यामुळे, अठराव्या वर्षाच्या खाली विवाहास बंदी केल्यामुळे विवाहयोग्य बबाच्या लक्षावधि मुलींना विनाकारण विवाहापासून वंचित राखले जाते.

आणि मुलांचे काय?
आता मुलांचे विवाहयोग्य वय २१ ठरवण्याला काही आधार आहे काय हे पाहू. मातृत्व ही जशी एक बिकट घटना आहे तशी पितृत्वाची गोष्ट नाही. पितृत्व प्राप्त झाल्यामुळे पुरुषाच्या शरीरावर कोणतेच परिणाम होत नाहीत. तेव्हा शरीराची पूर्ण वाढ झालेली नाही या सबबीवर मुलाला २१ वर्षांपूर्वी विवाह नाकारणे समर्थनीय नाही. शारीरिक कारणान्नमाणेच २१ वर्षापूर्वी पुरुषाला विवाहबंदी करण्याला मानसिक कारणही देता येणार नाहीत हे या विषयावरील वैज्ञानिक ग्रंथ धुंडाळल्यास स्पष्ट होईल.

मुलांच्या विवाहाचे न्यूनतम वय २१ ठरवणाऱ्यांनी कोणत्याही वैज्ञानिक पुराव्याचा विचार न करता मुले मुलींच्या नंतर वयात येतात या समजुतीच्या आधारे मुलींच्या विवाहयोग्य वयाला स्वच्छंदीपणे तीन जोडून दिले आहेत हे स्पष्ट आहे. असे करताना पितृत्व व मातृत्व या शारीरिक दृष्टीने अत्यन्त भिन्न गोष्टी आहेत या साध्या तत्त्वाचाही विचार केला नाही.

जननयोग्यता नव्हे, मैथुनयोग्यता
वस्तुतः गर्भधारणयोग्यता ही विवाहयोग्यतेची कसोटी मानणे सर्वथैव अयुक्त आहे. विवाहाचे मुख्य प्रयोजन कामाधिष्ठित प्रेम हे आहे. प्रजोत्पादन नव्हे. विवाहात होणारे बहश प्रजोत्पादन अनिच्छित व अनियोजित असते. संतति टाळण्यासाठी जेवढा संयम व विवेक करावा लागतो तेवढा संतति होण्यासाठी करावा लागला तर सध्या होणाऱ्या प्रजोत्पादनाच्या पन्नासटक्के तरी प्रजोत्पादन होईल की नाही याची शंका आहे.

स्त्रीपुरुषांचे नियमित व स्थिर कामजीवन ही जीवनाची एक आत्यन्तिक गरज आहे. त्याशिवाय शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभणे कठिण आहे. जगाचे ९० टक्के काव्य व साहित्य कामजीवनाने उत्स्फूर्त केलेले आहे. तेव्हा विवाहयोग्य वयाचा विचार अजोत्पादनाच्या दृष्टीने न करता कामपूर्तीच्या दृष्टीने केला पाहिजे. या दृष्टीने विचार केल्यास जीवशास्त्राचे काय मत पडते हे आता पाहू.

लालनाचा (Petting) निर्णायक पुरावा
आधी मुलींचा विचार करू. किल्सेने ८००० मुलींच्या कामजीवनाची पाहणी केली (Sex Life of the Human Female). तिच्यात सोळा व वीस वर्षांच्या आत ज्यांची लग्ने झाली होती अशा मुलीपैकी शेकडा ६० मुलींनी पंधराव्या वर्षीच लालन सुरू केले होते असे आढळून आले. कायद्याने १८ हे मुलींचे विवाह योग्य वय ठरवले आहे. हे वय १६ ते २० या वयाच्या दरम्यान पडते. म्हणजे १८ व्या वर्षी विवाह करणाऱ्या मुलीपैकी वहंश मुली पंधराव्या वर्षीच विवाहाचे स्वागत करतील असे समजण्यास हरकत नाही, कारण लालनामध्ये शेवट सोडून विषम मैथुनाच्या जवळ जवळ सगळ्याच क्रियांचा अन्तर्भाव होतो. शेवटची क्रिया आवडत नाही म्हणून टाळण्यात येत नसून, नैतिक व गर्भरोधक उद्देशासाठी टाळण्यात येते. दुसरे कारण असे की अमेरिकन मुलींना विवाहाचा जोडीदार निवडण्यास विवाहपूर्व प्रणय-चेष्टा आवश्यक वाटतात. त्या तशा वाटल्या नाहीत व आईबापांनी निवडलेल्या सहचराबरोबर संसार करण्यास त्या तयार असल्या तर पंधराव्या वर्षी विवाह करण्यास त्या नाखूष असणार नाहीत हे स्पष्ट आहे. की चौदाव्या-पंधराव्या वर्षी लालन (petting) हे अपवादात्मक नसून आठवड्यातून एक दोन वेळा नियमित केले जाते, यावरून कामोर्मी या वयातच प्रबळ होऊ लागते हे निर्विवाद आहे. लालनाचे बाहुल्य विवाहित संभोगाइतके नाही याचे उघड कारण लालनाचे जोडीदार एका घरात राहत नाहीत हे आहे. याचा उपोहल पुरावा म्हणजे या अविवाहित मुलींनी कामशांतीसाठी वापरलेल्या क्रियामध्ये फक्त ५ टक्के भाग लालनाचा होता. बाकीच्या क्रिया विविध प्रकारच्या स्वरति (auto-eroticism), समर्मथुन, पशुमैथुन वगैरे होत्या. म्हणजे लालनाने तृप्ति होण्याऐवजी वासना अधिकच चेतवली जाते
व दुधाची तहान ताकावर भागवण्याची वृत्ती बळावते.

पंधरा वर्षांच्या मुलींना संतति-नियमनाचे तंत्र हाताळण्याएइका आत्मसंयम व विवेक आलेला नसतो ही समजुत निराधार आहे हे देखील लालनाच्या अतिशयित प्रसाराने सिद्ध होते. उन्मादाच्या शेवटच्या पायरीवर चढल्यावरदेखील शेवटची पायरी न चढणे हा आत्मसंयमाचा उच्चांक आहे. हेच प्रशस्तिपत्र लालनात सहभागी होणाऱ्या मुलांना दिले पाहिजे. ही मुलेही या मुलींच्या वयाचीच, म्हणजे १५ च्या जवळपासची असली पाहिजेत. एका दृष्टीने या मुलीपेक्षाही ते प्रशस्तीस आत्र आहेत, कारण अति उत्तेजित झाल्यावरही ते या मुलींना शेवटची पायरी चढण्यास, आपले शारीरिक बळ वापरून, भाग पाडीत नाहीत. ज्या मुलामुलींना एवढा आत्मसंयम व विवेक दाखविता येतो त्यांना या वयात विवाह झाल्यास सन्ततिनियमन करता येणार नाही असे मानणे फारच अन्यायकारक आहे.

मानसिक परिपक्वता
याच आधारावरून, पंधरा वर्षांच्या मुली विवाहासाठी शारीरिक दृष्ट्या परिपक्व असल्या तरी मानसिक दृष्ट्या परिपक्व नसतात या नेहमी केल्या जाणाऱ्या विधानाची निराधारताही स्पष्ट होते. ही समजूत नुसती निराधारच नव्हे तर सत्याच्या दक्षिणोत्तर विरुद्ध आहे हे हल्ली मनोमितीने सिद्ध केले आहे. मनाच्या पुष्कळशा क्षमता मोजता येतात व या मापांचा वयाशी काय संबंध आहे हे सांख्यिकीने रेषांकित करता येते. प्रेसी आणि कूल्हमन यांच्या development through Life Span या ग्रंथात अशा पुष्कळशा क्षमतांची व वयाची वाढ यांचा संबंध दाखविणाऱ्या अन्वेषणांची माहिती दिलेली आहे. या अन्वेषणात पंधरा वर्षांच्या मुली मानसिकदृष्ट्या अपरिपक्व असतात या समजुतीला काहीही आधार सापडत नाही. प्रेसी व कूल्हमन यांनी दिलेल्या सर्वच क्षमतांचा येथे विचार करण्याचे कारण नाही. जी क्षमता सर्वात अधिक वस्तुनिष्ठपणे मोजता येते, जिचे मानसिक परिपक्वतेच्या दृष्टीने सर्वाधिक महत्त्व आहे, व जी जन्मसिद्ध असल्याबद्दल पुरेशी प्रमाणे उपलब्ध आहेत अशा बुद्धिमत्तेचा विचार पुरेसा आहे. मन आपल्या Fundamentals of Psychology मध्ये म्हणतो : ‘सर्वसाधारण व्यक्ति पंधराव्या वर्षी बौद्धिक-दृष्ट्या परिपक्व होते. हे विधान मुले व मुली यांच्या संयुक्त गटाच्या अध्ययनावर आधारलेले आहे. केवळ मुलींचाच गट घेतला असता तर हे वय पंधराच्या खालीच मिळाले असते असे समजण्यास हरकत नाही, कारण मुली मुलांच्या आधी परिपक्व होतात हे सर्वश्रुत आहे.

मी स्वतः बुद्धिमत्तेच्या दोन कसोट्यांवर १४ व त्यावरील वीस हजार मुलांच्या बुद्धिनिकषावरील गुणांचा अभ्यास केला आहे. या दोन्ही कसोट्यांवर १४ नंतर बुद्धिगणात घटच होते, वाढ होत नाही. (Intelligence Test Scores of Candidates at the Services Selection Boards) बुद्धिमत्तेच्या कसोट्यांतून, जे प्रश्न सोडविण्यात अर्जित ज्ञानाची मदत होते असे प्रश्न गाळून टाकण्यात आले तर अशा कसोट्यांवरील माकांत पंधरा वर्षांच्या वयानंतर फारशी वाढ होताना दिसणार नाही याबद्दल मला शंका नाही.

पराईतला पोरगा
मुलांच्या वासना मुलीपिक्षा तीव्र असतात. किन्सेने १२००० पुरुषांच्या काम जीवनाची पाहणी केली. त्यात ९५ टक्के मुले वयाच्या पंधराव्या वर्षी कामुकदृष्ट्या क्रियाशील होती असे आढळून आले. या वयात साधारणपणे लग्न होत नसल्यामुळे या कामक्रिया समाज – अमान्य व कधीकधी बेकायदा देखील असतात. बेकायदा क्रियांत वेश्याव्यवसाय सममैथुन, पशुसंपर्क इत्यादिकांचा समावेश होतो. कायद्याची शंभर टक्के अंमलबजावणी झाली तर ८५ टक्के मुलांना दण्ड होईल. किन्सेच्या मते कामभावना चौदाव्या वर्षाच्या पूर्वीच अत्युत्कट झालेली असते.

पाश्चात्य देशात तसेच आपल्याही देशात व्हिक्टोरियन युगापासून पराईतल्या मुलांना कामवासना नसतेच अशी बतावणी करणे समाजमान्य झाले आहे. त्यापूर्वी साऱ्या जगात या तथ्याची जाण होती. शरीराची स्वाभाविक भूक भागविण्याची सोय नसल्यामुळे तेरावे ओलांडलेल्या मुलावर भयंकर ताण पडतो. कामशान्ति नियमितपणे करण्याचा सध्यातरी विवाह हा एकमात्र उपाय आहे. लालनादि इतर क्रिया विवाहाची बरोबरी करू शकणार नाहीत. शिवाय समाधानाशिवाय उद्दीपन मज्जातन्तूंना हानिकारक ठरण्याचाच संभव आहे. लालनामुळे एकाग्रतेची शक्ती कमी होते व जांघा अधून मधून दुखू लागतात. दीर्धकालापर्यंत वारंवार समाधानाशिवाय उद्दीपन करण्याचा क्रम ठेवला तर यापेक्षा जास्त अपाय होण्याचा संभव आहे. जरी कामशान्ति ही प्रशामक व स्वास्थ्यकारक असते. ज्या वयात तिची अत्यन्त जरूर असते त्याच क्यात ती नाकारल्यामुळे स्वास्थ्याला अपाय होतो. मर्यादशील युवकांच्या समस्यांपैकी ही समस्या फार महत्वाची आहे. शरीराची भूक अत्यन्त प्रबळ असताना ती शान्त होऊ नये म्हणून आमच्या सान्या समाजशास्त्रीय कल्पनांनी जणू चंगच बांधला आहे. समाजशीलता, लोकप्रियता, व प्रतिष्ठा यांचे मापन केले असता पराइतला मुलगा याबाबतीत फार खालच्या स्तरावर असतो असे दिसून आले आहे. (Hurlock : Developmental Psychology) पराईतल्या युवकांच्या समाजविरोधी वर्तनाचे अतृप्त वासना हे एक कारण असले पाहिजे.

हिन्दुधर्म आणि सुधारणा
तेव्हा कामवासना प्रबळ होऊ लागण्याच्या म्हणजे चौदापंधरा वर्षांच्या वयात युवक युवती विवाहित असणे वैयक्तिक व सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. या वयात गर्भधारणा होऊ नये म्हणून उपाय करण्याइतका विवेक आलेला असतो हे वर दाखवून दिलेच आहे.

या आकारशील वयात विवाह झाल्याने पति व पत्नीमध्ये समायोजन घडन येणे सुकर होईल. दोघांच्याहि व्यक्तित्वाने आकार घेतल्यावर परस्परांशी जुळवून घेणे कठिण होते. शिवाय पुरुष आपल्या व्यवसायात स्थिर झाल्यावर विवाह करण्याच्या प्रघातामुळे त्याच्या मिळकतीवरून त्याची लानाच्या बाजारातील किंमत ठरते व विवाहाला व्यापारी स्वरूप येते. उलट व्यवसायात स्थिर होण्याच्या आधीच लाग्न झाले व व्यवसायाचा प्रश्न दोषांनी परस्पर सहकायनि सोडवला तर व्यापारापेक्षा वैयक्तिक संबंधांना विवाहात जास्त महत्त्व येईल. यांसारखे मुद्दे वामन शिवराम गोळे यांनी आपल्या हिन्दुधर्म व सुधारणा या ग्रंथात मांडले होते. या पुस्तकाचे श्री. कृ. कोल्हटकरांनी विस्तृत परीक्षण केले आहे, पण या मुद्द्याबद्दल त्यात अवक्षरही नाही.

तिशीच्या आत मुले होण्याचे काही फायदेही आहेत. आईबापांच्या व मुलांच्या ‘वयांत आईबापांपेक्षा वीस वर्षाहून फारसे अधिक अंतर नसले तर त्यांना एकमेकांना समजून घेणे सोपे होईल. तसेच म्हातारपणाच्या आधी मुले जीवनात स्थिर झालेली असणे हितावह आहे. अर्धी हाडे मसणात गेली तरी मुलांच्या कामधंद्याला व विवाहाला पत्ता नाही ही परिस्थिती स्वागतार्ह नाही.

तेराव्या वर्षीच्या विवाहामुळे मुलाच्या जोडीला आणखी सुनांना पाळण्याचा बोझा येऊन पडेल ही भीति विवाहाच्या सुरवातीला ७/८ वर्षे कसोशीने संतति नियमन केल्यास निराधार ठरेल, सुना घरात येतील तशाच मुली घरातून जातील त्यामुळे सर्वसाधारणपणे अनर्जक व्यक्तींना पोसण्याची जबाबदारी वाढणार नाही.

काही आयुर्वैज्ञानिक मला म्हणाले की तुमचे म्हणणे वैज्ञानिक दृष्ट्या खरे असले तरी जननसंख्येला आळा घालण्यासाठी जरठ विवाह आवश्यक आहेत. या म्हणण्याला फारसा आधार नाही. कारण विसाव्या वर्षी विवाह केला तरी २०-४५ म्हणजे पंचवीस वर्षे प्रजोत्पादनाला मिळतात. सन्तति-नियमन केले नाही तर एवढ्या काळात सर्वसाधारणपणे दहा मुले होऊ शकतात. तेराव्या वर्षी लग्न केले तर यापेक्षा जास्त मुले होऊ शकतील असे समजणे सुबुद्ध नाही.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.