प्रा. स. ह. देशपांडे यांच्या लेखाला उत्तर(१)
आजचा सुधारकन्या सप्टेंबर-ऑक्टोबर १९९१ च्या अंकातील प्रा. स. ह. देशपांडे यांच्या ‘सावरकरांचा हिंदुत्वविचार’ या लेखात उपस्थित केलेल्या मुद्द्यांसंबंधी माझी प्रतिक्रिया व विचार नोंदवीत आहे.
सावरकर थिोनटिक स्टेटचा पुरस्कार करीत होते असे मी म्हटलेले नव्हतेच. राष्ट्रवादाची कोणती जातकुळी त्यांना अभिप्रेत होती, हा प्रश्न मग उरतो. याच लेखातले आ. देशपांडे यांचे एक वाक्य असे आहे : “सावरकरांच्या मते हिंदुस्थानात हिंदू हाच ‘राष्ट्रीय समाज आहे आणि हा समाज ते इतर समाजापासून धर्माच्या निकपावर वेगळा काढतात.” व्याख्येमुळेच काही समाज कायमचे ‘अराष्ट्रीय ठरतात.