मासिक संग्रह: मार्च, १९९१

आगरकरांचे अग्रेसरत्व

गोपाळ गणेश आगरकर हे कर्ते सुधारक होतेच. पण त्यांनी संतति-नियमनाचा पुरस्कार केला होता हे किती जणांना माहिती आहे? ‘केसरी’ च्या १८८२ च्या १५. व्या अंकात आगरकरांनी ‘स्त्रीदास्य-विमोचन’ हा लेख लिहिला होता. त्यावर त्यांचे नाव नसले तरी त्या लेखातील विचारसरणी आणि लेखनशैली यावरून तो लेख आगरकरांचाच आहे याविषयी शंका राहात नाही. त्या लेखात प्रारंभीच त्यांनी, नवे विचार आले की नवे शब्द बनवावे लागतात, असे सांगून स्त्रीदास्य-विमोचन’ हा शब्द आपण बनवीत आहो, असे सांगितले आहे. यावरून ‘स्त्रीदास्य-विमोचन ‘ हा शब्द प्रथम आगरकरांनी प्रचारात आणला हे दिसून येते.

पुढे वाचा

संपादकीय मागे वळून पाहताना

‘नवा सुधारका’चा पहिल्या वर्षाचा हा शेवटचा अंक. आज नवा ‘आजचा सुधारक’ एक वर्षाचा झाला. त्याची एक वर्षातील वाटचाल कशी झाली याकडे मागे वळून पाहणे उपयुक्त होईल असे वाटल्यावरून त्यांकडे टाकलेला हा दृष्टिक्षेप.

चोहोबाजूंनी होणाऱ्या अंधश्रद्धा, शब्दप्रामाण्य आणि बुवाबाजी यांच्या आक्रमणापुढे हतबल झालेल्या आपल्या समाजाला जागे करण्याकरिता, आणि त्याला योग्य मार्ग दाखविण्याकरिता आगरकरांनी सुरू केलेले कार्य त्यांच्या अकाली निधनाने अपुरेच राहिले. ते यथाशक्ति पुढे चालविण्याकरिता विवेकवादाचे कंकण बांधलेले हे मासिकपत्र आम्ही काढले आणि गेले सबंध वर्ष ते काम पार पाडण्याचा प्रयत्न केला.

पुढे वाचा

पुस्तकपरिचय, चार्वाकदर्शन

द्वितीयावृत्तीत ( १९८७ ) पदार्पण केलेले ‘चार्वाकदर्शन’ हे डॉ. आ. ह. साळुंखे यांनी लिहिलेले पुस्तक म्हणजे उपलब्ध ग्रंथांच्या मदतीने चार्वाकमताचे विवेचन करण्याचा प्रयत्न होय. चार्वाकदर्शन हे एक नास्तिक दर्शन, वैदिक परंपरेची चाकोरी सोडून अनुभव व त्यावर आधारलेली विचारप्रणाली निर्भीडपणे मांडणारे. त्यामुळे इतर दर्शनांच्या तुलनेत त्याचे वेगळेपण जाणवते. दुर्दैवाने भारतात या दर्शनाची सदैव उपेक्षाच झाली. जडवादाचा पुरस्कार करणारे हे दर्शन खऱ्या अर्थाने ‘दर्शन’ (तत्त्वज्ञान) नाहीच, हे दर्शन लिहिणाऱ्या व्यक्ती व त्यांचे अनुयायी अगदीच यथातथा बौद्धिक कुवत असलेल्या व्यक्ती असून हे अत्यंत हास्यास्पद असे दर्शन आहे, अशी याच्याविषयीची अन्य दार्शनिकांची व विद्वानांची भूमिका आहे.

पुढे वाचा

यमद्वितीयायाः उपायनम्

१९५७ मध्ये संसदेमध्ये हिन्दु-दाय-वितरण-विधेयक Hind code Bill मांडले गेले. त्याच्या योगाने महिलांना पूर्वी कधीही न मिळालेले हक्क प्राप्त होणार होते. त्या विधेयकाचे रचनाकार डॉ. वा. शि. बारलिंगे (त्याकाळचे राज्यसभेचे सदस्य) ह्यांनी त्यानिमित्ताने काही श्लोक रचले ‘ हिन्दु कोड बिला’ ने स्त्रियांना प्राप्त होणारे अधिकार हीच जणू भाऊबीज अशी कल्पना करून त्यांनी त्या श्लोकांना यमद्वितीयायाः उपायनम’ असे संबोधिले. ते पाच श्लोक आम्ही खाली देत आहोत. त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या देशामधून दारिद्र्य हटवावयाचे असल्यास धनाचे वा मुद्रेचे प्रमाण वाढवीत नेऊन तिचे वितरण करण्याऐवजी उपभोग्य वस्तूंचे वितरण करणे योग्य होईल असा विचार सांगणारे सात श्लोक त्यांनी रचले आहेत.

पुढे वाचा

सांप्रदायिकतेचा जोर की सामाजिक सुधारणांचा असमतोल ?

देशाचा राजकीय चेहरा झपाट्याने बंदलत आहे हे सांगायला कोणा तज्ज्ञांची गरज नाही. राजकीय पक्षांची पडझड होत आहे. नवीन संयुक्त आघाड्या बनत आहेत. जुन्या मोडत आहेत. अखिल भारतीय पातळीवर परिणामकारकरीत्या काम करणाऱ्या पक्षांची संख्या घटत आहे. भ्रष्टाचार, हिंसाचार वाढत आहेत. गुन्हेगार जग व राजकीय पुढारी यांची जवळीक वाढतच आहे, व अनेक गुन्हेगार, आरोपी, भ्रष्टाचारी समाजात उजळ माथ्याने वावरत आहे. या खेरीज आणखी एका क्षेत्रातही राजकीय चित्र झपाट्याने बदलत आहे. देशातील धार्मिक असहिष्णुता, कडवेपणा वाढत आहे. जातीयता, सांप्रदायिकता फोफावत आहे.

राजकारणात एका वर्षात घडून आलेला एक मोठा फरक ताबडतोब जाणवतो.

पुढे वाचा

विवाह आणि नीती (भाग १०)

विवाह
या प्रकरणात मी विवाहाची चर्चा केवळ स्त्रीपुरुषांमधील संबंध या दृष्टीने, म्हणजे अपत्यांचा विचार न करता, करणार आहे. विवाह ही कायदासंमत संस्था आहे हा विवाह आणि अन्य लैंगिक संबंध यांतील भेद आहे. विवाह ही बहुतेक सर्व देशांत एक धार्मिक संस्थाही असते, पण ती कायदेशीर आहे ही गोष्ट महत्त्वाची आहे. आदिम मानवांतच केवळ नव्हे तर वानरांत आणि अन्यही अनेक प्राणिजातीत प्रचलित असलेल्या व्यवहाराचे विवाह ही कायदेशीर संस्था एक रूप आहे. जिथे अपत्यसंगोपनात नराचे सहकार्य आवश्यक असते तिथे प्राण्यांतही विवाहसदृश व्यवहार आढळतो. सामान्यपणे प्राण्यांमधील ‘विवाह’ एकपत्नीक-एकपतिक असे असतात, आणि काही अधिकारी अभ्यासकांच्या मते मानवसदृश वानरांमध्ये (anthropoid apes) ते विशेषत्वाने आढळतात.

पुढे वाचा

विवेकवाद – ११

श्रद्धेचे दोन प्रकार – विधानांवरील आणि मूल्यांवरील ‘श्रद्धा’ किंवा ‘विश्वास’ हा शब्द दोन वेगळ्या अर्थानी वापरण्यात येतो. एका अर्थी श्रद्धा म्हणजे एखादे विधान सत्य आहे असा दृढविश्वास, तर दुसऱ्या अर्थी श्रद्धा म्हणजे एखाद्या मूल्यावरील निष्ठा. ह्या दुसऱ्या अर्थी ‘श्रद्धा’ या शब्दाऐवजी ‘निष्ठा’ हा शब्द वापरणे श्रेयस्कर आहे, कारण तो व्यर्थी नसल्यामुळे त्याच्याविषयी गैरसमज होण्याची भीती नाही. अमुक गोष्ट मूल्य आहे म्हणजे ती स्वार्थ १. वांछनीय आहे अशी दृढनिष्ठा. याच्या उलट पहिल्या प्रकारची श्रद्धा म्हणजे एखादे विधान सत्य आहे अशी पक्की खात्री.

पुढे वाचा