मराठी वाङ्येतिहासातील १८८५ ते १९२० या महत्त्वपूर्ण कालखंडात दामन मल्हार जोशी यांचा उदय झाला; इतकेच नव्हे तर कादंबरीकार व कथाकार म्हणून त्यांनी नावलौकिकही मिळवला. हा नावलौकिक दुहेरी स्वरूपाचा होता. एकीकडे वामन मल्हारांनी तत्कालीन बुद्धिजीवी, रसिक वाचकांशी आपल्या कादंबच्यातून — विशेषतः रागिणीतून — संवाद साधला; आणि दुसरीकडे श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांसारख्या साक्षेपी समीक्षकाचे तत्काल लक्ष वेधून घेतले. वाचक व समीक्षक यांना एकाच वेळी आवाहन करणे, त्या कालातील सगळ्याच मोठ्या लेखकांना साध्य झाले, असे म्हणता येणार नाही. हे खास वामन मल्हारांचे वैशिष्ट्य आहे.
त्यांचे दुसरे वैशिष्ट्य हे की, त्यांच्या या आवाहनातील सातत्यही वेगवेगळ्या कारणांमुळे टिकून राहिले. वा.ल. कुळकर्णी, कुसुमावती देशपांडे, प्रभाकर पाध्ये यांच्यासारखे व्यासंगी समीक्षक, वामन मल्हारांच्या साहित्याच्या विविध अंगांचा, वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून विचार करत राहिले; आणि वाचकही हे साहित्य वाचत राहिले. या अर्थाने वामन मल्हार कधीच वाङ्येतिहासजमा झाले नाहीत. या लेखकाला वर्तमानाच्या संदर्भातही लक्षणीय स्थान आहे असे समीक्षक — वाचकांना नेहमीच जाणवत राहिले. समीक्षकांची वामन मल्हारांच्या साहित्यासंबंधीची ही भावना आजतागायत कायम आहे. त्यांच्या कांदबया हा या भावनेचा प्रमुख संदर्भ आहे. त्यामुळे आजच्या वाङ्मयीन, सामाजिक – राजकीय, सांस्कृतिक वास्तवात या कादंबर्या का प्रस्तुत वाटतात, याचा शोध घेणे फलदायी ठरेल.
त्यापूर्वी एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे. ती अशी की, वामन मल्हारांचा हेतु उद्याचे वर्तमान चित्रित करण्याचा नव्हता. म्हणजेच, त्यांच्या कादंबच्या ‘भविष्यवादी’ नव्हत्या. त्यांच्या कादंबर्यातून समकालीन वर्तमानच चित्रित झाले. त्यांची त्या वर्तमानाकडे पाहण्याची दृष्टी मात्र भविष्यसंमुख होती; ते बदलावे असे त्यांना उत्कटपणे वाटत होते. पण परिवर्तनाच्या, नवनिर्माणाच्या प्रक्रियेत जुन्या पिढीचा कसा हस्तक्षेप होत असतो, हेही त्यांनी जाणले होते. या वस्तुस्थितीकडे त्यांनी अजिबात डोळेझाक केली नाही. म्हणूनच त्यांच्या कादंबर्यांत नवविचारांनी प्रेरित झालेल्या नव्या पिढीइतकेच, जुन्या पिढीलाही स्थान राहिले. या भानामुळे अपेक्षित परिवर्तन कितपत वेगाने घडेल याविषयी त्यांच्या मनात शंका राहिली; आणि त्यांची ही शंका योग्य असल्यामुळेच, वामन मल्हारांच्या कादंबरीलेखनाचा काळ उलटल्याला साठ एक वर्षे होऊन गेल्यानंतरही, त्यांच्या कादंबर्यांची प्रस्तुतता कमी झालेली नाही. ही गोष्ट वामन मलांच्या वाङ्मयीन श्रेष्ठतेच्या दृष्टीने पोषक असली तरी सामाजिक दृष्टीने दुर्दैवाची आहे, असेच म्हणावे लागेल.
१९१५ ते १९३९, अशा वीस वर्षांच्या कालखंडात वामन मल्हारांनी एकूण पाच कादंबच्या लिहिल्या. या कादंबच्या 37शय व.आविष्कार या दोन्ही दृष्टींनी पृथगात्म आहेत. त्यांच्यावर पूर्वकालीन कादंबरीची अजिबात छाया नाही, असे नव्हे. हरिभापूर्वीच्या अद्भुतरम्य कादंबरीचा संस्कार रागिणी मधील आश्रमखंडावर किंवा इदु काळे व सरला भोळे मधील ‘जखिणरिवंडीत’ सारख्या पत्रांवर जाणवतो. पण हा संस्कार अगदी पुसट आहे. नव्या वर्तनाच्या भानामुळे वामन मल्हार त्या संस्काराच्या अधीन झालेले नाहीत. त्याच्यावर हरिभाऊंचाही संस्कार आहे. त्यामुळे त्यांची कादंबरी मध्यमवर्गीय कुटुंबात घडते. पण फरक हा की वामन मल्हारांनी या कुटुंब नवविचारप्ररित तरुण पिढीला हरिभाऊंपेक्षा अधिक प्राधान्य दिले आहे. आश्रमहरिणीतील सत्याचा आभास निर्माण करण्याची पद्धती हरिभाऊंनी पण लक्षात कोण घेतो? मध्ये अवलंबिलेल्या त्याच प्रकारच्या पद्धतीची आठवण दिल्यावाचून राहत नाही. पण ही केवळ कृप्ती नव्हती; तत्त्वचिंतक वामन मल्हारांची पुराणकालीन वातावरणात रमण्याची ती ओढ होती; सीविषयक प्रश्नांना प्राचीन संदर्भ देण्याचाही तो प्रयत्न होता. त्यामुळे आश्रमहरिणीही कादंबरी बाह्यतः रागिणीपेक्षा वेगळ्या वळणाने गेल्या सारखी वाटली तरी तिचेही रागिणीशीच अंतर्गत नाते राहिले. वर्तमानाचे भान येथेही सुटले नाही. या दृष्टीने आश्रमहरिणीनंतर प्रसिद्ध झालेली नलिनीही कादंबरीही तिची वाङ्मयीन गुणवत्ता बेताचीच असली तरी, महत्त्वाची आहे. कारण या कादंबरीतही तत्कालीन राजकीय वातावरणावर थोडेफार भाष्य आहे. जीवनाचे हे एक महत्त्वाचे अंग कादंबरीत सामावून घेण्याचा प्रयत्न अधुरा असला तरीही लक्षणीय आहे. कारण या प्रयत्नाचा इंदु काळे व सरला भोळेच्या लेखनासाठी वामन मल्हारांना चांगला उपयोग झाला आहे. इंदु काळेला असलेली राजकीय पार्श्वभूमी अधिक परिपक्व आहे; तिच्यामुळे कादंबरीतील व्यक्तिचित्रणही अधिक उठावदार झाले आहे. नलिनी व इंदु काळे व सरला भोळे या कादंबर्याच्या दरम्यान लिहिली गेलेली सुशीलेचा देव ही कादंबरीही वर्तमानसंलग्न आहे. या वर्तमानाच्या संदर्भातच ती जीवनातील विविध तात्त्विक सत्यांना भिडते. वामन मल्हारांमधील तत्त्वचिंतकाला येथे रागिणी पेक्षाही अधिक अवसर मिळतो. वामन मल्हार वर्तमानाचे दर्शन किती विविध अंगांनी, त्याला किती विविध परिमाणे देऊन घेतात, हे या सर्वच कादंबर्यांतून प्रत्ययाला येते. वर्तमानाचे इतके एकाग्रे व अनेकांगी भान त्या काळातील कादंबरीकारांमध्ये विरलपणेच आढळते. या भानानेच वामन मल्हारांच्या कादंबर्यांतील आशयाला पृथगात्मता प्राप्त झाली.
या कादंबर्यांच्या अविष्कारात इतकी मूलभूत पृथगात्मता नाही हे खरे. पण चर्चा हा कादंबरीच्या संरचनेचा एक घटक बनवण्याचा प्रयत्न, व्यक्तिरेखांतील वैचारिक उत्क्रांती दाखवून त्यांना विकसनशील करण्यामागील दृष्टी, इंदु काळे व सरला भोळे या कादंबरीची पत्रात्मक मांडणी हे अविष्कार खासच उल्लेखनीय आहेत. मराठी कादंबरीला तिच्या भावी प्रवासात या प्रयोगांचे मोलाचे साहाय्य झाले आहे.
वामन मल्हारांच्या कादंबच्या आशयदृष्ट्या आजही प्रस्तुत व पृथगात्म वाटतात, त्या मुख्यतः त्यांच्यातील स्त्रीचित्रणामुळे. स्त्री हे त्यांच्या कादंबर्याचे केंद्र खरेच; पण या केंद्राभोवतीचा परिघही त्यांनी अतिशय जाणीवपूर्वक रेखाटला आहे. या परिघात सामावून घेतलेले प्रमुख घटक दोनः कुटुंब व समाज, त्यापैकी कुटुंब या घटकाचा प्रथम विचार करू: येथे रागिणीचा आधार घेता येईल. रागिणी व उत्तरा या दोघीही सुशिक्षित, स्वतंत्र. त्यांच्या अस्तित्वामुळे त्यांच्या कुटुंबांचे वळणही बदलते, वेगळे होते. पण हा बदल आकस्मिकपणे होत नाही; आणि तो निर्विवादही राहात नाही. जुन्यानव्या पिढ्यांमधील भावनिक – वैचारिक – संघर्ष शेवटपर्यंत चालूच राहतो. पण शेवटी कुठेतरी या संघर्षातून पुढे गेलेल्या कौटुंबिक जीवनाचे प्रतिबिंब वाचकांच्या मनात स्थिरावते. या दृष्टीने रागिणी च्या आरंभी, रागिणीची आई व उत्तरेची आई या दोघींमध्ये आपल्या मुलींच्या लग्नासंबंधी वारंवार होणारी संभाषणे पाहावीत आणि पुढे त्यांनी केलेला वस्तुस्थितीचा स्वीकारही पाहावा. हे चित्र आजही, निदान भावनिक पातळीवर तरी, कायम आहे. वामन मल्हारांनी स्वीचित्रणाला मानसशास्त्रीय बैठक दिल्यामुळेच हे घडले. ही बैठक सुशीलेचा देव आणि इंदु काळे व सरला भोळे या कादंबर्यांनाही आहे.
हा झाला स्त्रीचा स्वीकडे पाहण्याचा दृष्टिकोन. त्याहून अधिक प्राधान्य आहे ते पुरुषाच्या स्त्रीविषयक दृष्टिकोनाला, हा दृष्टिकोन सर्वसाधारणपणे उदार आहे असेच आनंदराव, भैय्यासाहेब, भाऊ काळे, विनायकराव भोळे यांसारख्या पुरुष-व्यक्तिरेखांच्या आधारे म्हणावे लागेल, हे समंजस, स्त्रीच्या कुचंबणेची जाणीव असणारे, तिला स्वत:च्या मार्गाने जाऊ देण्यासाठी साहाय्य करणारे असे पुरुष आहेत. त्यांच्या या दृष्टिकोनात भावनिकतेपेक्षाही बौद्धिकतेचे प्रमाण अधिक आहे. या पुरुष – व्यक्तिरेखा वामन मल्हारांनी हेतुपूर्वक निर्माण केल्या आहेत असेही जाणवते. त्यांच्या स्त्रीविषयक दृष्टिकोनाची सर्वसाधारण समाजातही प्रस्थापना व्हावी, आणि समाजाचे मनही स्त्रीशिक्षणाला, स्त्रीस्वातंत्र्याला अनुकूल व्हावे, हा तो हेतू होय.
यासाठी वामन मल्हारांनी आणखीही एक गोष्ट केली : त्यांनी ‘नवी खी’ एकेरी, आक्रमक न रंगवता, तिच्या स्वभावाला मृदुतेची, समंजसपणाची जोड दिली. उत्तरा व इंदु काळे या थोड्या वेगळ्या खन्या. पण त्या रागिणी व सरला भोळे यांच्या जोडीने आल्या. त्यामुळे नव्या स्वीविषयी एकदम प्रतिकूल मत बनविणे सोपे राहिले नाही. समाज दोन्ही बाजूंनी विचार करू लागला. वामन मल्हारांना नेमके हेच हवे होते. अशा रीतीने, एकीकडे जुनी पिढी व दुसरीकडे पुरुष यांचा नव्या स्त्रीशी होणारा वादसंवाद हे वामन मल्हारांच्या परिघरेखाटनाचे स्वरूप राहिले. दुर्दैवाने अद्यापही पुरुषप्रधान राहिलेल्या समाजात हा वादसंवाद प्रस्तुत ठरतो, यात शंका नाही. त्यामुळे पुरुषाचे स्त्रीविषयक भान अधिक सुजाण व अनेकांगी कसे असू शकेल ह्याचे वामन मल्हारांनी घडवलेले दर्शन आजही कालबाह्य झालेले नाही.
वामन मल्हारांनी रंगवलेल्या पुरुष-व्यक्तिरेखांचा त्यांच्या कादंबर्यांना आणखी एक लाभ झाला. तो असा की, ‘समाज’ या खीभोवतीच्या परिघातले दुसर्या घटकाचे दर्शन, त्यांना या व्यक्तिरेखांकरवीच अधिक ठाशीवपणे घडवा आले. यासाठी त्यांनी आणखीही काही पुरुष – व्यक्तिरेखा निर्माण केल्या, आणि त्यांच्याकरवी नव्या स्त्रीविषयी वाटणारे केवळ आकर्षण वा आदर नव्हे, तर साशंकता, भय, विरोध या भावनाही चित्रित केल्या. या गोष्टींची त्यांच्या कादंबर्या ‘वास्तव’ राहण्यास मदत झालीच; शिवाय या व्यक्तिरेखांतून समाजाच्या इतर काही प्रश्नांनाही भिडता आले. या प्रश्नांच्या मांडणीमुळे तत्कालीन महाराष्ट्रातील वैचारिक वातावरणाचे चित्र अधिक सुस्पष्ट व सर्वांगीण झाले.
हे विलग चित्र नव्हते. नव्या स्त्रीचा या चित्राशी संबंध होता. या वातावरणाची तिच्या कौटुंबिक व सामाजिक जीवनाला मदत होत होती; अणि झळही पोचत होती. त्या प्रश्नांशी संपर्क आल्यामुळे ती अधिक खंबीर होत होती; निय घेत होती: निष्कर्ष काढत होती. हे सगळे तिच्या व्यक्तिमत्त्वविकासाला पोषक ठरत होते. कसे, ते एकदोन उदाहरणांच्या आधारे पाहता येईल, नलिनीतील ‘खीशिक्षण’ या विषयावरील वादातून नव्या स्त्रीला त्यासंबंधी पडलेल्या विविध प्रश्नांची कल्पना येते; या शिक्षणात कम लेने व पुढे इंदु काळे कलाशिक्षणालाच प्राधान्य दिले आहे; आणि या दृष्टिकोनाची झळ तिच्या जीवनाला पोचली आहे. देशभक्त पतीच्या सहवासामुळे सरलेचे मानसिक सामर्थ्य वाढले आहे, आणि याच्या मृत्यूनंतर, त्याचे कार्य पुढे चालू ठेवण्याचा निर्णय तिने घेतला आहे; अस्पृश्य चिंगीबद्दलही सरलेच्या पोटात अपार माया आहे. सुशीला तत्त्वनिष्ठ आहे; तिची समाजवादी तत्वज्ञानाबद्दल काही स्वतंत्र मते आहेत. पूर्वीच्या समाजव्यवस्थेने आतापर्यंत अव्यवस्थाच भाजविली’ हे तिचे मत विशेष लक्षणीय आहे. असा हा वेगवेगळ्या विषयांवरील विचारमंधनात तिचा सुज्ञ सहभाग होता. ती विविध संदर्भात स्वत:च्या वर्तमान – भविष्याचा विचार करत होती. तिला हे अधिष्ठान अर्थातच तत्त्वचिंतक व विचारवंत मन मल्हारांनी दिले होते. ते नव्या स्त्रीकडे या अस्सल देशी संदर्भात पाहात होते. म्हणूनच त्यांच्या कादंब हा इंग्लंडमधील सफ़ेजे चळवळीचा केवळ पडसाद ठरला नाही. या देशी गाने धामन मल्हारांच्या कादंबर्यांची प्रस्तुतता अधिकच वाढवली.
वामन मल्हार आपल्या विविध व्यक्तिरेखांकरवी तत्कालीन जीवनातील विविध प्रश्न मांडत होते. वर्तमानाशी संवाद ठेवण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे त्यांना राजकीय प्रश्नही महत्त्वाचे वाटले. या दृष्टीने त्यांच्या विविध कादंबर्यातून आलेली सुधारकांची, जहाल-मवाळांची गांधीवाद्यांची स्वभावचित्रे लक्षणीय आहेत. हिंदु-मुसलमानांमधील तंटे, कर्झनशाही इत्यादींविषयीचे उल्लेखही येथे आढळतात. या सगळ्यामुळे वाचकाच्या मनांत लो. टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, न.चिं. केळकर, महात्मा गांधी पः महाराष्ट्रातील राजकारणावर प्रभाव गाजवणाच्या वेगवेगळ्या धुरीणांची आठवण जागी होते, त्यांच्या विचारसरणींनी तत्कालीन तरुण भारलेले होते. म्हणूनच ते मूलतः ध्येयवादी होते. त्यांच्या या ध्येयवादाला वामन मल्हारांच्या नव्या स्त्रीने चांगली साथ दिली. या चित्राच्या पार्श्वभूमीवर आजच्या भ्रष्ट, गढूळ, मतलबी राजकारणाचे चित्र ताडून पाहण्याची गोह बाचकाला साहजिकच होतो; आणि ते जुने चित्र मनाला दिलासा देते. या अर्थाने वःमन मल्हारांच्या कादंबच्या आजही काही आधार पुरवितात.
या कादंबर्यांतील राजकारणाच्या अनुषंगाने, जाता जाता उल्लेख करण्याजोगा आणखी एक मुद्दा : वामन मल्हारांनी रेखाटलेले वृत्तपत्रसृष्टीचे वि. इंदु काळे व सरला भोळे मधील विचारप्रकाश या दैनिकात प्रसिद्ध झालेले वृत्तान्त या दृष्टीने पाहावेत. वृत्तपत्रांच्या सनसनाटी बातम्या देण्याच्या स्वभावावर हे वृत्तांत प्रकाश टाकतात. ही ‘पिवळी’ पत्रकारिता आता चांगलीच फोफावली आहे. वामन मल्हारांना त्या काळातही तिची चुणूक दाखवादीशी बाटली हे विशेष वाटते.
तत्त्वचिंतक वामन मल्हारांना राजकारणाइतकाच ‘कला-नीती’ वादातही रस होता. इंदु काळे व सरला भोळे या कादंबरीत हे विशेष प्रत्ययाला येते. या विषयासंबंधी त्यांची मते काहीशी सनातनी होती. म्हणूनच त्यांनी ना.सी. फडके, ग.त्र्यं. माडखोलकर यांच्या कादंबर्यांतील कामुक वर्णनांवर आक्षेप घेतला; ‘कलेच्या मागे बोधाचा गुप्त हेर लावू नये’ या न.चिं. केळकर यांच्या दृष्टिकोनाशी सहमत होताना,‘पण कलावंतिणीच्या मागे गुप्त हेर असला तर तो योग्यच होणार नाही का?’ असा प्रश्न विचारला. ह्यावरून असे लक्षात येते की त्यांना व्यक्तीवर काही बंधने असणे आवश्यक वाटत होते. टोकाचे व्यक्तिस्वातंत्र्य त्यांना अमान्य होते. त्यांच्या या मतांची छाया इंदु काळे या व्यक्तिरेखेच्या निर्मितीवर पडली आहे. ती धीटपणे काही प्रश्न उपस्थित करते. ते नव्या स्त्रीला पडलेले प्रश्न आहेत; पण कादंबरीने घेतलेल्या वळणांतून या प्रश्नांना जी उत्तरे मिळतात ती मात्र समन्वयवादी आहेत. आजच्या मुक्त स्त्रीला ती पटणार नाहीत कदाचित. पण आजही स्त्रीस्वातंत्र्याच्या या विशिष्ट अंगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वामन मल्हारांच्या दृष्टिकोनाशी जुळणारा असाच राहिला आहे. ललितवाड्:मय व समीक्षा या दोन्ही क्षेत्रांत या दृष्टिकोनाचा आढळ होतो. म्हणूनच वामन मल्हारांच्या कादंबच्या आजच्या वाड्:मयीन वास्तवाशीही संवाद साधतात.
या संदर्भात वामन मल्हारांनी इंद काळे व सरला भोळेमध्ये मांडलेल्या शुद्धलेखनविषयीच्या विचारांचा आणि त्यांनी निर्माण केलेल्या ‘अहंगंड’, ‘न्यूनगंड’ यांसारख्या काही मराठी प्रतिशब्दांचाही उल्लेख केला पाहिजे. वाङ्मयक्षेत्रातील या दोन्ही विषयांसंबंधीच्या चर्चा आजही सुरूच आहेत.
वामन मल्हारांच्या कादंबर्या आजच्या वाङ्मयीन, सामाजिक-राजकीय सांस्कृतिक वास्तवात प्रस्तुत का वाटतात, याचा शोध, याच मार्गाने पर अधिक खोलात जाऊन, अधिक सविस्तरपणे घेणे शक्य आहे. त्यांनी स्वकालीन वाचकांनाही वेधून घेतले. हे सोपे नव्हते. कारण तो वाचक वेगळ्या प्रकारच्या कादंबरीत गुंतलेला होता. त्याला जे हवे होते ते वामन मल्हारांनी मुळीच दिले नाही. त्या बाबतीत मुळीच तडजोड न करता ते आपल्या मार्गानेच गेले. या मार्गाने जात असताना जुन्या कादंबरीत गुंतलेला वाचक आपल्याकडे थोडाफार वळेल हा आत्मविश्वास त्यांना होताच, पण त्यापेक्षाही, त्या वातावरणात घडलेल्या नव्या, गंभीर प्रकृतीच्या वाचकाच्या हाती वेगळ्या प्रकारचे साहित्य देण्याची गरज आहे, याचे भान वामन मल्हारांना होते. प्रत्येक लेखकाने आपला विशिष्ट वाचक कसा हेरला पाहिजे व त्याच्याशी कोणत्याही तडजोडी न करता कसा संवाद साधला पाहिजे, याचे प्रात्यक्षिकच जणू वामन मल्हारांनी दाखवले. अशा रीतीने त्यांच्या वाचकवर्गात जुने वे नवे असे दोन्ही प्रकारचे वाचक एकत्र आले. त्या संपर्काचा दोघांनाही ले भ झाला. भविष्यकाळातील वाचकावर विसंबून न राहता वर्तमानकाळातील वाचकावरच: क्षि केंद्रित करणे आणि त्याच्यातच आपल्या भावी वाचकाचेही प्रतिबिंब पाहणे या दोन्ही गोष्टी वामन मल्हारांनी समांतरपणे साधल्या.
अणि त्यांची कादंबरी जितक्या सहजपणे उत्तरकालीन वाचकांकडे पोचली, तितक्याच सहजपणे तिने उत्तरकालीन लेस्वकांवरही आपला ठसा उमटवला. या दृष्टीने, वामन मल्हारांचे लगतचे वारस म्हणून चटकन नाव आठवते ते वि.स. खांडकरांचे. खांडेकरांच्या कादंबरीतील समकालीन आशयसूत्रे, त्यांच्या खी-व्यक्तिरेखा, त्यांच्या कादंबर्यांत येणाच्या चर्चा — आणि त्यांची शैलीही — वामन मल्हारांशी जवळचे नाते सांगते. गांधीवादी कादंबरीचा प्रवाहही वामन मल्हारांपासूनच उगम पावला; आणि राजकीय कादंबरीच्या उद्भवालाही त्यांचाच हातभार लागला. हे आशयाच्या अंगाने रचनेच्या दृष्टीने पाहायचे झाल्यास पु. शि. रेग्यांच्या सावित्रीसारख्या कादंबर्या हे वामन मल्हारांच्या पत्रात्मक कादंबरीचे परिणत रूप आहे असे म्हणता येईल. रोजनिशी, वर्तमानपत्रातील बातम्या, इत्यादींचा उपयोग कादंबरीच्या बांधणीसाठी करून घेणार्या लव्हाळी (श्री.ना. पेंडसे), रोहिणी (केशव केळकर), कारावासातील पत्रे (गौरी देशपांडे) यांसारख्या कादंबर्याही येथे आठवतील. याचा अर्थ हा की वामन मल्हारांनी कादंबरी आजच्या वाचकांत व आजच्या लेखकांतही भिनलेली आहे.
– वामन मल्हार वाड्मयेतिहासजमा झाले नाहीत असे वाटते, ते त्यांच्या या लेखक – वाचकांत भिनलेल्या अस्तित्वामुळेच!
अभंग साहित्यसहवास, वांद्रे (पू.), मुंबई ४०००५१