आंबेडकरांच्या चरित्राचा अभ्यास करीत असताना मी एक टिपण टिपले. ते असे —-
अस्पृश्यतेचे चटके बसलेले आंबेडकर जर साहित्यिक बनले असते, तर विद्रोद्दा व संघर्षाची भाषा स्वीकारून, त्यांनी ‘दलित साहित्य’ निर्माण केले असते. पण असे ‘साहित्यिक’ ते झाले नाहीत. ते ‘समाजसुधारक’ झाले. मृाची भावना जोपासण्याऐवजी त्यांनी क्रांतिकारकता जापासली. ते ‘समतेचे’ पुरस्कर्ते बनले. सामाजिक व आर्थिक ममतेप्टे त्यांनी देशाच्या स्वातंत्र्याचा प्रश्न अंमळ गौण मानला. देशभक्ती गौण मानली, असे मात्र नाही.
मनुस्मृति जाळणे हिंदत्व – विरोधी दिसले तरी कालबाह्य झालेल्या दोघांना बाजूला सारण्याचा तो एक संकेत होता. स्पृश्यांची वा ब्राह्मणांची घरेदार जाळण्याचा तो संकेत नव्हता.
हिंदुधर्म सोडून बौद्ध धर्मात जाणे, हे धर्मांतर होते जरूर, पण ते ‘राष्ट्रांतर’ नव्हते.
आंबेडकरांनी अस्पृश्यांना जागविले, आत्मनिरीक्षण करावयास लाविले आणि स्वावलंबन व आत्मोद्धार यांची शिकवण दिली, बुद्धिवाद न सोडता, किंबहुना सर्वत्र बुद्धिवाद प्राप्त मानून, आंबेडकरांनी सामाजिक क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न केला. हा त्यांचा प्रयत्न, सनातनी हिंदुत्वनिष्टांना मानवण्याजोगा नव्हता; मानवला नाहीच, म्हणून त्यांनी धर्मांतर अवलंबिले; उद्देश मात्र, समाजपरिवर्तन हाच होता.
आज परििस्थती पुष्कळ बदलली आहे. पण पन्नास पाऊणशे वर्षानंतरही हिंदुमय लोक अस्पृश्यता पाळत आहेत. एवढ्या दीर्घ काळात अणि विदोपतः देगा। यानंत्र्य मिळाल्यानंतर, अस्पृश्यता इतिहासजमा व्हायला पाहिजे होती. पण तसे झालेले नाही,
अस्पृश्यता समूळ नष्ट न होण्याची कारणे —-
(१) आंबेडकरांच्या काळातील टिळक-गांधींगारवे थोर हिंदही, अस्पृश्यतानिवारणाचे कैवारी
असले तरी अंमळ सनातनीच होते.
(२) आंबेडकरांच्या नंतरचे अस्पृश्य पुढारी आंबेडकरांच्या उंचीच नव्हत-नाहीत. इतकेच काय, जी काय थाडी ‘नि:स्वार्थता’ समाजकार्यात लागते, तिचा अभावच ह्या पुढान्यात जाणवला आहे. नि:स्वार्थतेच्या अभावीच, अस्पृश्यांनी चालवलेली चळवळ एकसंध राहिलेली नाही.
(३) आंबेडकरांच्या पुढारीपणात ‘विद्रोह’ कचित होता, पण तो प्रासंगिकच. लोकशाही
समाजवाद’ हाच त्यांचा स्थायीभाव होता. पण नंतरच्या पुढारीपणात विद्रोह पुढारला आणि मानवता मागासली. मानवता ह्या पायावर अश्यानिवारण व्हायला हवे होते. सनातनी स्पृश्यांनी व अधीर अस्पृश्यांना ही मानवता अव्हेरिली आहे.
बौद्ध झालेल्या अस्पृश्यांना परत हिंदू व्हावेसे वाटणे शक्य आहे. पण सनातन हिंदूंना, त्यांचे ते ‘स्वगृही परत येण’ मानवेल काय ?
जन्मसिद्ध चातुर्वर्ण्य असिद्ध होऊनही, गुणकर्माधिष्ठित चातुर्वर्ण्य अशक्यच होऊन बसले आहे. हिंदधर्म कोडगा बनून राहिला आहे! तो अस्पृश्यांना मुसलमान होऊ देईल, ख्रिस्ती होऊ देईल आणि मगच चवदार तळ्याचे पाणी पिऊ देईल; मगच मंदिरात प्रवेश करू देईल. बौद्ध झालेले अस्पृश्य परत हिंदु झालेच तर ते पुनः अस्पृश्यच मानले जातील, आणि कालबाह्य झालेले चातुर्वच परिपुष्ट होईल, असे कबूल करणे प्राप्त आहे.
परमेश्वर-कृत चातुर्वर्ण्य बिचार्या हिंदुस्थानच्याच नशीबी आले! ते खरोखरच परमेश्वरकृत असते, तर ते कालाह्य ठरले नसते. पण चातुर्वर्ण्य आहे मनुष्यकृतच. मनुष्यकृत गोष्टी बहुधा मतलबी धोरणाच्याच असतात!
विषमतेविरुद्ध दिलेला, समतावादी आंबेडकरांचा वैचारिक व कृतिशील लढा आणि फुले, सावरकर, शिंदे व गांधी यांनी अस्पृश्यतेविरुद्ध दिलेला लढा, यांची तुलना केल्यास, फुलेग्रणीत लदा मालिक म्हणावा लागेल. कारण, फुले अस्पृश्य नव्हते, शिकलेले नव्हते, अस्पृश्यांचे पुढारी नव्हते. पण त्यांचे धैर्य विलक्षण अतुलनीय! ह्या चळवळीत तनमनधनाने कार्य करणारांत सावरकरांचे स्थानही लक्षणीय आहे. सावरकर अस्पृश्य तरे नव्हतेच पण (आंबेडकरांच्या मते) विषमता प्रस्थापित करणान्यांच्या जातीचे, म्हणजे ब्राह्मण होते; भारतीय स्वातंत्र्य हा त्यांच्या जीवनकार्याचा गाभा होता. म्हणजे, त्या काळात सामाजिक लढ्यापेक्षा राजकारणातील लदा रे ते होते. तरीही त्यांनी अस्पृश्यतानिर्मूलनाकडे दुर्लक्ष केले नाही. गांधींचे अस्पृश्यता निवारण विषमतेविरुद्ध असले तरी ‘भूतदया व मानवता’ ह्या पायावरच त्यांची चळवळ होती. पण तरीही ती चळवळ ढोंगीपणाची किंवा संधिसाधूपणाची नव्हती.
आंबेडकर आखाड्यात उतरले ते ‘वर्णाश्रमथर्म’ नेस्तनाबूत करण्यासाठी. नाही म्हटले तरी, स्वत: अस्पृश्य असल्यामुळे या कार्यात ते आवेशी होते. दुसरा कोणताच विचार त्यांच्या लढ्याला सबळ करू शकला नाही. त्या काळी जो स्वातंत्र्यलढा अग्रक्रमाचा व अग्रेसर होता, तोदेखील आंबेडकरांनी दुय्यम मानला.
आंबेडकरांनी गांधींना पूर्णतया नाकारले. शिंद्यांचीही उणीव दाखविली. सावरकरांना आदरिल; पण सावरकर अस्पृश्य नसल्यामुळे, सावरकरप्रणीत अस्पृश्यविरोधी लढा, स्वतः। दिलेल्या लढयाच्या तुलनेत कमीच मानला. ‘भारतीय अस्पृश्यांचा पुढारी’ असल्याबद्दल
आंबेडकरांना खरा वरा अभिमान होता. देशभक्त व घटना-शिल्पकार ह्या भूमिका त्यांना तितक्या अभिमानास्पद वाटल्या नाहीत.
चातुर्वर्ण्य व तदंतर्गत विषमता याबद्दल पुरुषसूक्तकार ब्राह्मणांना आंबेडकरांनी धारेवर धरले. ब्राह्मणावर, विशेषत: मनूवर आग पारवडणार्या आंबेडकरांनी, शूद्रांच्या अवनतीसाठी ज्या वेदोक्त सूक्ताला जबाबदार धरले आहे, ते हे पुरुषसूक्त!
थोडक्यात पुरुषसूक्ताच्या परामर्श घेण्याने विषयांतर होणार नाही. विश्वोत्पत्ती कशी झाली ? पुरुषसूक्त सांगते—वेतनापासून सचेतन व अचेतन सृष्टी निर्माण झाली. विराट पुरुषाने (सचेतनाने) प्रथम एक पुरुष निर्माण केला. त्या उत्पादित पुरुषाने पुढची सर्व वृष्टी उत्पन्न केली. विश्वोत्पत्तीचे सर्वच सिद्धान्त (भारतीय व अभारतीय) ह्या पुरुषसूक्ताप्रमाणेच असमाधानकारक आहेत. न पटणाच्या ह्या सिद्धांतावर आंबेडकर चिडतात. श्रेष्ठ अशा वेदांनी ब्राह्मणाला दिले श्रेष्ठत्व व शूद्राला ठरविले कनिष्ठ (हलकट). हा फरक वेदांनी कां बरे केला ? आंबेडकर म्हणतात,”हा फरक वेदांनी केला नाही; केला ब्राह्मणांनी, चारही वर्ण समान योग्यतेचे आहेत, असे म्हटले असते, तर काय बिघडले असते?” ‘अपौरुषेय अपौरुषेय’ म्हणून ह्या ब्राह्मणांनीच यूक्त रचली व त्यात 37प्पलपाटेपणाने ही अशी विषमता दरली! ‘ब्राह्मण: अस्य भुखम् आसीत्’ व ‘पद्भ्यां शूद्रः अजायत’ ह्या वाक्यांवर आंबेडकरांचे वरील भाष्य आहे.
शूद्र व अस्पृश्य हे शब्द एकाच अर्थाने वापरले जातात, पण तसे ते नाहीत. ‘शूद्र कोण होते’ ह्या प्रश्नावर प्रकाश टाकताना आंबेडकर म्हणतान-भारतातील प्राचीन चातुर्वण्र्यांतर्गत शूद्रत्व वेगळे आणि भारतीय अस्पृश्यांचे शूद्रत्व वेगळे आहे. भारतात पूर्वी त्रैवर्यच होते. त्या तीन वर्षांपैकी एक वर्ण जो क्षत्रियवर्ण’ त्या क्षत्रियांपैकीच काही त्रिय शूद्र होते. शूद्र असा चौथा वर्ण नव्हता. पण क्षत्रियांतर्गत शूद्रांचे व ब्राह्मणांचे झगडे झाले. जेत्या ब्राह्मणांनी, जित शूद्रांवर जुलमी कायदे लादले. परिणामी, धन व ज्ञान यांदाचून वंचित झालेल्या क्षत्रियशृद्राचा चौथा वर्ण ‘शूद्र’ म्हणून गणला गेला. आजच्या शूद्रांना, त्यांचे क्षत्रिय’ हे स्थान द्यावे, धन व ज्ञान यांचा संचय करण्याचा मार्ग शूद्रांना खुला करावा, हेच आंबेडकरांना सांगायचे होते.
आजच्या स्पृश्य हिंदंकडे व विशेषतः ब्राह्मणांकडे पाहण्याचा आंबेडकरांचा दृष्टिकोन ऐतिहासिक, मंदाधिनपर व म्हणून पूर्वग्रहरहित असला, तरी त्यांचा ब्राह्मणांबद्दलचा तीव्र तिरस्कार,’शूद्र कोण होते’ ह्या ग्रंथातील विवेचनात काही ठिकाणी जाणवतो. विद्रोहरहित समाजक्रांतीच हितकर ठरणार ना?
‘रिडल्स इन हिंदइझम’ हे आंबेडकरी लेखनही विचारात घेतले पाहिजे. हे पुस्तक मुख्यतः ब्राह्मणांची कानउघाडणी करण्यासाठी आंबेडकरांनी लिहिले. ब्राह्मणांचे विकृत स्वरूपाचे विचार उघडे पाडून त्यांच्या कृत्या आणि त्यांचे भाग्दर्शन के चुर्कीच हात, है या ग्रंथात आंबेडकरांनी दाखविले आहे. लोकांच्या मनांतून ‘राम’ उतरावा हा आंबेडकरांचा उद्देश नाही. पण, लोकांनी बुद्धिवादी व्हावे, अंधश्रद्ध राहू नये, परंपरावादी होऊन राहू नये आणि आजच्या विचारप्रवाहाची भाषा वापरायची तर, भारतीयानी विज्ञानवादी व्हावे. हाच ‘रिडल्स इन हिंदुइझम’ चा उद्देश होता. पण बुद्धिवादी म्हणविणार्या व संशोधक बुद्धीच्या आंबेडकरांची बुद्धिमना या ग्रंथात विद्वेषी व विद्राही बनला आहे, हे ग्वः दिन. असे व्हायला नको होते.
डॉ. आंबेडकरांविषयींच्या माझ्या चिंतनाचा निष्कर्ष मी असा काढतो —
भावनाविरहित बुद्धिवादाचे निर्णय प्रमाणिक वाटले, तरी त्या प्रामाणिकपणान मर्यादा पडतातच. बुद्धिवादाला डावलून, केवळ भावनाधिष्ठित होऊन केलेला अभ्यास व घेतलेले निर्णय हेसुद्धा सदोष.
भारतातील समाज, जातीजमातींचा बनलेला आहे. पण म्हणून, जातीयवादी बनून, जातीचेच हित पाहून, भारतीय समाजाचे कल्याण साधणार नाही.
स्वत:च्या वामनांना आणि लालसांना कठोरपणे किण आणि त्यानंतर प्रेमाने रात्रंना जिंकणे हेच धोरण कोठेही इष्ट ठरेल.
दर्यापूर ४४४८०३
जि. अमरावती