ज्या दिवशी जपानमधील हिरोशिमा ह्या नगरावर परमाणुबाँबचा भयानक विस्फोट झाला तो दिवस—-६ ऑगस्ट १६४५-—मानवाच्या संपूर्ण इतिहासात (व प्रागैतिहासातही) अत्यंत महत्त्वाचा मानावा लागल, जीवोत्क्रांतीच्या पदार्थ वाटचालीत पायात प्रथमत:च स्व-जाणीव व बुद्धी निर्माण झाली. त्या काळाच्या विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत मानवापुढील मृत्यूचे संकट हे व्यक्तिगत स्वरूपाचे होते. पण ज्या वेळी मानवाने भौतिकशास्त्राच्या साहाय्याने परमाणु विदनापर्यंत ‘गनि’ गाठली, न्या अागृत मानवापुढे नुसत्या व्यक्तिगत किंवा लहान समूहाच्या मृत्यूची नव्हे, तर अरिवल मानवजातीच्या संपूर्ण विनाशाची व मानवी संस्कृतीच्या आमूलाग्र विध्वंगावी भयप्रद शक्यता निर्माण झाली आहे. मानवजातीच्या गळ्याभोवती जणू काही एक भयानक काल – विस्फोटक (time bomb) बांधला गेला आहे. त्याचा केव्हा विस्फोट होईल व त्या सर्वनाशी विस्फोटात केव्हा संपूर्ण मानबजात नष्ट होईल याचा भरवसा नाही. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ज्याप्रमाणे बोललेला शब्द परत घेता येत नाही, त्याप्रमाणे एकदा लावलेला शोधही परत घेता येत नाही. सर्व राष्ट्रांत गुरू असलेल्या परमाणु ऊर्जेच्या स्पर्धेमुळे पृथ्वीचे पर्यावरण अधिकाधिक दृषित होत आहे. पाणु युद्धाचा संभाव्य धोका बाजूला ठेवृनही ह्या दृषित पर्यावरणाचे दूरगामी परिणाम आपल्याला सतत भेडसावीत राहणार.
मानवाच्या संपूर्ण इतिहासात समृहा-समूहांतील, देशादेशांतील युद्धाच्या नगान्यांचे ध्वनी निनाद आले आहेत. जगात – युद्धे (tribal wars), धार्मिक युद्धे, गृहयुद्धे, राजघराण्यातील युद्धे (dynastic wars), स्वातंत्र्य युद्धे, आक्रमक पद्ध, प्रादेशिक युद्ध, (territorial wars), क्रांतियुद्धे, वसाहत – युद्धे (colonial wars) अशा अनेक प्रकारच्या युद्धाची कधी न संपणारं मालिका हाच मानवाचा इतिहास आहे. १९१४ -१८ च्या पहिल्या महायुद्धाचे वर्णन तर ‘युद्धे संपवण्याकरता केलेले युद्ध’ (A war to end all wars) असे केले होते. पण ते युद्ध संपून उणीपुरी वीस वर्षे होतात न होतात तो दुसर्या जागतिक युद्धाला सुरुवात झाली. १९४५ साली हे युद्ध संपल्यानंतरही ठिकठिकाणी अनेक युद्धे सुरू आहेतच. १९४६ ते १९८० ह्या काळात लहानमोठी ५० हून जास्त युद्धे वेगवेगळ्या देशांत झाली आहेत.
अशा ह्या निराशेच्या व वैफल्यग्रस्त अवस्थेत–जगावर सर्वनाशाची टांगती तलवार असताना–‘पांडा’ ह्या आता दुर्मिळ झालेल्या प्राण्याला वाचविण्याच्या प्रयत्नाला किंवा गंगानदीच्या शुद्धीकरण्याच्या प्रयत्नाला कांय अर्थ आह? ह्याला एक उत्तर हान्स फाइहिंगर {Hans Vaihinger) ह्याने प्रतिपादलेल्या ‘जणू काही’ तत्त्वज्ञानाच्या (Philosophy of ‘as-if) आधारे देता येईल. इंद्रियांना प्रतीत होणारी बाह्य- सृष्टी आभासात्मक (illusory) असली तरीही तीच ‘वास्तव’ आहे असे मानून मनुष्य जगत असतो. त्याशिवाय दुसरा मार्गच मानवापुढे नाही. जणू काही’ प्रतीत होणारी सृष्टीच अंतिम सत्य आहे, जणू काही’ मानवाला इच्छेचे स्वातंत्र्य (free will) आहे, ‘जणू काही’ सुष्ट व दुष्ट (good and evil) ह्यांचा निवाडा करणारा व विश्वाचा नियंता असा परमेश्वर आहे, अशा कल्पितांवरच मनुष्य जगत आलेला आहे. तसेच मानवजात सध्या वैफल्याने व निराशेने कितीही ग्रासली असली तरी तिचा विनाश होणार नाही ह्या कल्पितावरच आपण जगले पाहिजे. त्यामुळेच आपले जगणे सुसह्य होईल. शिवाय वर उल्लेखिलेले मानवी सर्वनाशाचे भवितव्य निश्चित आहेच असे नाही. पण त्याची संभाव्यताही नाकारता येत नाही.
वर उल्लेखिलेल्या अवस्थेत मनुष्य का व कसा आला, व ह्या अवस्थेतून मुक्त होण्याचा काही उपाय आहे काय, याचा ऊहापोह प्रस्तुत लेखात केला आहे.
मानवाच्या ह्या अवस्थेची चिकित्सा अनेकांनी केली आहे. बायबलमध्ये अॅडम व ईव्ह ह्या ईश्वराने निर्माण केलेल्या प्रथम पुरुषाने व स्त्रीने ईश्वराज्ञेची अवज्ञा करून ‘ज्ञानवृक्षा’ – चे फळ तोडून खाल्ले व त्यामुळे त्यांचे पतन झाले अशी कथा आहे. सर्व मानवजातीला ह्या प्रथम पापा’चा (original sin) वारसा मिळाला आहे व शेवटी सर्व जगाचा अंत होईल असे त्यात म्हटले आहे. पण ही गोष्ट धार्मिक प्राक्कथा (religious myth) म्हणून सोडून दिली तरी तिचा गर्भित, सांकेतिक अर्थ विचारात घेण्यासारखा आहे.
अलीकडच्या काळात फ्रॉईड (Freud) ह्या मनोवैज्ञानिकाने मानवाच्या मनाचे प्रदीर्घ व सखोल विश्लेषण करून मानवाच्या सुप्त मनामध्येच निहित (inherent) असलेली एक ‘मृत्यूची इच्छा’ (death-wish) असते असे म्हटले आहे. ही ‘आत्मनाशाची ओढ’ (urge to self-destruction) आपल्याला सर्वमानवी इतिहासातवेगवेगळ्याप्रकारे आढळते. इतिहासात झालेली व आजही होत असलेली––अनेक युद्धे ह्या ‘आत्मनाशाच्या ओढीतूनच होतात असा त्याचा सूर आहे. आर्थर कोस्लर (Arthur Koestler) ह्या विचारवंताने एका वेगळ्याच दिशेने ह्या विषयाचा अभ्यास केला असून एक नवीन सिद्धांत मांडला आहे.
ह्या लेखात मुख्यत: कोएस्लरच्या सिद्धांचाचेच स्पष्टीकरण व विवेचन केले आहे.
मनुष्याला बुद्धी आहे, पण ती मनुष्यजातीच्या कल्याणाकरिता वापरण्याचा समजूतदारपणा त्याच्यात असेल असे दिसत नाही. शिवाय नजीकच्या काळात असा समजूतदारपणा किंवा शहाणपण त्याच्यात निर्माण होईल हेही शक्य वाटत नाही. याउलट असे मानण्यास मळ पुरावा आहे की जीवोत्क्रांतीच्या वाटचालीत शवटी टी जव्हा मनुष्य पशुसृष्टीपासून आपल्या जाणिवेच्या व बुद्धीच्या द्वारा वेगळा होत होता, त्यावेळी काहीतरी गडबड झाली. निसर्गाच्या हातून काहीतरी चूक झाली. त्या संक्रमणावस्थेत मनुष्याच्या शरीररचनेत–विशेषत: त्याच्या मेंदूच्या रचनेत–एक विलक्षण दोष राहिला. ह्यान अंगभूत सदोषतेचा परिणाम आपल्याला हजारो वर्षांच्या मानवी इतिहासात पाहायला मिळतो.
ह्याच अंगभूत दोषामुळे मानवजातीमध्ये आपणाला बुद्धिविग्रहाचे लक्षण (paranoid streak) दिसते. उत्क्रांतीमध्ये निसर्गाने अनंत चुका केल्या आहेत. सध्या अस्तित्वात असणार्या प्रत्येक प्राणिजातीच्या निर्मितीच्या प्रयोगात शेकडो प्राणिजाती निर्माण झाल्या व कालांतराने नष्ट झाल्या. अजूनही त्या नष्ट झालेल्या दोकडो प्राणिजातींचे अवशेष (fossils) आपल्याला उत्खननात आढळतात. पृथ्वीचा आतला भाग निसर्गाने आतापर्यंत नष्ट केलेल्या प्राणिजातींची कचरा–पेटी’च (waste-basket) बनली आहे. मानव जातिदेवील अटाच प्रकारे निसरच्या चुकीचा वारस असण्याची दाट शक्यता आहे.
हा निसर्गनिर्मित दोष माणसाच्या मेंदूच्या रचनेत असावा. ह्याच मदोषतेमुळे माणसात आभासात्मक जीवनाची व आन्मनाशाची प्रवृत्ती निर्माण झाली असावी.
पण त्याचबरोबर मनुष्याला निसर्ग नियंत्रिक जीवोत्क्रांतीच्या वर जाऊन–बाहेर निघून–दारीररचनेत असलेल्या दोषांची भरपाई इतर प्रकारे करण्याची क्षमता देवील आहे. एकीकडे मनोरचनेत प्रक्षिप्त असलेली आत्मनाशाची ओढ व दुसरीकडे जीवनाला मर्यादित करणाच्या भौतिक परिस्थितीला उल्लंघून, त्याच्यावर मात करण्याची–जीवोत्क्रांतीच आपल्या नियंत्रणाखाली आणण्याची–मनुष्याची क्षमता व बुद्धी ह्या दोहोंचा मेळ कसा लावायचा?
पुरातन काळी ऋषि-मुनींपासून आधुनिक काळातील अनेक तन्वज्ञ व समाजशास्त्रज्ञांपर्यंत अनेकांनी मनुष्याच्या स्वभावाचे व त्याच्यातील ह्या विरोधी प्रवृत्तींचे निदान व विश्लेषण अनेक प्रकारांनी केले आहे. पण कोणीही मनुष्यजातीच्या शारीरिक रचनेतच काही निर्गनिर्मित अंगभूत दोष किंवा त्रुटी असण्याच्या शक्यतेचा विचार केला नाही. कोएस्लरच्या मते मनुष्यजाती ही जीवोत्क्रांतीमध्ये एक पथभ्रष्ट झालेली जाती (aberrant species) आहे, व तिच्यामध्ये एक विलक्षण जैविक दोष (biological malfunction) राहिला आहे. मानवी इतिहासात आपल्याला ह्या दोषाचे दर्शन घडते. प्रथम ह्या दोषांच्या लक्षणांचे विवेचन करून कोएस्लर त्याच्या कारणमीमांसेकडे वळतो.
सर्वांत प्रथम मानवी संस्कृतीच्या प्राथमिक अवस्थेत आढळणार्या एका प्रचलित रिवाजाकडे किंवा प्रवृत्तीकडे कोएस्लर आपले लक्ष वेधतो. ही प्रवृना म्हणजे प्राथमिक अवस्थेतील मानवात दिसणारी मनुष्यबळीची (human sacrifice) प्रवृत्ती किंवा चाल. ह्या प्रवृत्तीकडे व तिच्या विश्लेषणाकडे मानववंशशास्त्रज्ञांनी म्हणावे तसे लक्ष दिले नाही असे कोएस्लरचे मत आहे. निव्वळ एक कुतूहल म्हणून ह्या चालीकडे पाहणे व दुर्लक्ष करणे योग्य होणार नाही. मनुष्यजातीतील निसर्गदत्त द्विधा वृत्तीचे (streak of parancia} द्योतक म्हणून व त्याच्या दुभंगित मनोरचनेचे लक्षण म्हणूनच त्याकडे पाहिले पाहिजे.
मानवजातीचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे आपल्या जातिबांधवांनी व स्वत:ची हत्या. स्वजातीतील इतरांची हत्या किंवा आत्महत्या (suicide) करण्याची प्रवृनी सर्व प्राणिमात्रांत फक्त मानवातच आहे. हा मानवाच अनन्यसाधारण (unique) गुण आहे. हिंस्र प्राणी व त्याचे सावज (predator and prey) यांची तुलना मनुष्यहत्येदी करता येणार नाही. कारण मारक प्राणी व त्याचे सावज हे वेगवेगळ्या प्राणिजातीचे असतात. प्राण्यांमध्ये आपल्याला आंतरजातीय (inter-specific) हत्या आढळते, स्व- जातिहत्या (intra-Specific) आढळत नाही. एकाच प्राणिजातीतील प्राण्यांची परस्परांमधील स्पर्धा किंवा वैमनस्यही वरपांगी, प्रतीक- स्वरूपाच्या भांडणाद्वारे किंवा एका प्राण्याच्या शारीरिक क्रियेने हार मानण्याच्या अभिव्यक्तीने (उदा. शेपूट खाली घालणे, जमिनीवर लोळणे, इ.) मिटतात. त्यांच्या भांडणाचा शेवट कचितच पकाच्या हत्यमध्ये होतो. याउलट असे मानण्यास सबळ गवा आहे की आपल्याच जातीतील प्राण्यांना न मारण्याबद्दल काहीतरी शरीरस्थित जन्मजात इन्धिटार्क (Inhibitory force) सर्व प्राण्यांमध्ये असावी.
अटा प्रतिपदाक्तीचा अभाव भाणसात असल्याने, त्यांच्यात सतत स्वजातीय युद्धे व मंहार आढळतो. जातिसंहार, जातियुद्धे, जातिद्वेष व छळ ह्या गोष्टी फक्त मानवजातीमध्येच आढळतात.
ह्याशिवाय मानवातील दुसरा दोष म्हणजे त्याची तर्कबुद्धी व त्याची भावनामिश्रित श्रद्धा यांनील भेद किंवा अंतर हा आहे. त्याचा परिणाम म्हणून माणसाच्या वैज्ञानिकर्यांत्रिक प्रगतीचा सतत वाढणारा वेग, त्याच्या भौतिक प्रगतीची वाढती कमान व त्याची अविकसित नैतिक वृत्ती यांतील महदंतर आपल्या दृष्टीस येते. ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकात ग्रीक संस्कृतीमध्ये सुरू झालेल्या शास्त्रीय शोधांचा व प्रगतीचा परमोत्कर्ष म्हणून माणसाने विसाव्या शतकात चंद्रावर पदार्पण केले. हा भौतिक प्रगतीचा वेग स्तिमित करणारा आहे. पण त्याच ख्रिस्तपूर्व काळात बुद्ध, कन्फ्यूशिअस, रित्रस्त ह्यांच्या विचारसरणीचा जन्म व प्रसार झाला. त्याच्यानंतर २० व्या शतकात मात्र हिटलर, मुसोलिनी, स्टालिन ह्या हुकुमशहांच्या तत्त्वांचा प्रसार झाला. म्हणजेच नैतिक व वैचारिक क्षेत्रात, भौतिक प्रगतीच्या तुलनेने, मुळीच प्रगती किंवा विकास झालेला आढळत नाही. एकीकडे आपल्याला मानवाचा चंद्राला पकडण्यासाठी उंचावलेला हात दिसतो, तसेच दुसरीकडे त्याच्या चेहर्यावरील पाशवी विकट हास्यही दिसते.
मानवाच्या व्याधींची वरीलप्रकार लक्षणे सांगितल्यानंतर कोस्लर त्या व्याधींच्या संभाव्य कारणाकडे वळतो.
माणसांच्या मेंदूचे जुना मेंदू व नवीन मेंदू असे दोन भाग करता येतात. ह्या दोन भागांमध्ये रचना व कार्य या बाबतीत बराच फरक आहे. त्यामुळे मेंदूतून निर्माण झालेल्या मानवी मनातही एक द्विधा – वृत्ती किंवा संघर्ष आहे. माणसाच्या मेंदूची रचना एका अर्थाने त्रिविध आहे, व ह्या विविध गेंदूच्या प्रत्येक विभागाची रचना वेगळी असूनही त्यांना एकत्र कार्य करावे लागते व परस्परांशी संवाद (communication) राखावा लागतो. मेंदूचा सर्वांत जुना भाग मूलत: सरपटणाच्या प्राण्यांपासून (reptiles) आला आहे. एकूण जीवसृष्टीत मनुष्याचे स्थान अत्युच्च आहे. तो जीवसृष्टीचा मुकुट – मणी आहे. पण मनुष्यपदाला घोचण्यासाठी त्याला जीवसृष्टीच्या प्रत्येक अवस्थेतून जावे लले. सुमारे एक हजार कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर उत्पन्न झालेल्या एकपेशीय आदिजीवाची उत्क्रांती होत होत मनुष्य निर्माण झाला. ह्या प्रदीर्घ जीवोत्क्रांतीच्या खुणा अजूनही मानवी शरीररचनेत आढळतात.
वाइझमानच्या संस्मरण- सिद्धांतानुसार (theory of recapitulation) प्रत्येक नवजात मानव गभावस्थेत ह्या सर्व जीवावस्थेतून क्रमशः जात असतो.
–वर म्हटल्याप्रमाणे माणसाच्या मेंदूचा सर्वात जुना व आकाराने मटा असलेला भाग मूलत: सरपटणार्या प्राण्यांचा वारसा आहे. त्यावरचा दुसरा भाग मरतन प्राण्यांपासून (mammals) आला आहे, व तिसरा–सर्वात वरचा व नवीन—भाग २वास मानवी मेंदू आहे. ह्याच अत्याधुनिक नवीनतम भागामुळे त्याला विचारदाक्ती, आत्मभान व मन ही प्राप्त झाली. ह्याच भागात त्याचे ‘मनुष्य’त्व निहित आहे. एकाच मानवी मेंदूत अशा प्रकार ३ मेंदू समाविष्ट असल्याने आपण अशी कल्पना करू शकतो की जेव्हा एखादा मनोविकारशास्त्रज्ञ (psychiatrist) आपल्या रोग्याची तपासणी करतो हा तो त्या माणसाबरोबरच घोडा (mammal) व मगर (reptile) ह्यांचीही तपासणी करीत असता.
माणसाच्या ह्या विविध मेंदूचा सर्वात वरचा व दुधावरील पायीप्रमाणे असणार्या पातळ पापुद्र्याला cerebral cortex म्हणतात. त्यालाच thinking cap अमेही नाव दिले आहे, कारण त्याच भागात माणसाच्या विचारशक्तीचा जन्म होतो. भाषा – शक्ती, स्मृती, आत्मभान, विचारशक्ती, प्रतीक- निर्माणदाक्ती, सदसद्विवेकबुद्धी इ. खास मानवी मनाचे गुण ह्याच भागात असतात. जीवोत्क्रांतीच्या वाटचालीत हा वास मानवी मेंदू इतक्या जलद गतीने विकास पावला की त्याचा खालच्या प्राणी- मेंदी एकसंध संबंध प्रस्थापित होऊ शकला नाही. हा नवीन मेंदू जुन्या मेंदूपासून बराचसा वेगळा राहिला. त्या दोहोंमध्ये एक प्रकारचे अंतर—हा दुरावा–निसर्गाकडून घडलेली घोर चूक म्हणता येईल.
ह्याच निसर्गनिर्मित दोषातून मानवजातीत आढळणारी द्विधा वृनी (paranoia) निर्माण झाली. माणसाच्या मानसिक-व पर्यायाने सामाजिक-—संघर्षाचे मूळ ह्याच दोषात आहे. ह्याच द्विधा वृत्तीमुळे आपल्याला माणसांत अविवेकी श्रद्धाही (irrational faith) आढळते. मानवी इतिहासात आढळणार्या युद्धांचे व संहाराचे मूळ ह्या अविवेकी श्रद्धेतच आहे.
मानवाच्या सद्य:स्थितीला दुसरेही एक कारण म्हणजे बाल्यावस्थेतील मानवी अपत्यांचे आपल्या पितरांवर संपूर्णपणे असणारे अवलंबन. माणसाचे मूल दीर्घकाळपर्यंत माता-पित्यांच्या छत्राखाली असल्याने त्याच्या मनावर चिरस्थायी परिणाम होतो. ‘आज्ञापालन’ हा गुण त्याचवेळी निर्माण होता. ह आज्ञापालन एका अधिकारी व्यझीच असते किंवा व्यक्तिसमूहाचे असते. समाजाचा घटक म्हणून राहण्याची वृत्ती (urge to belong) ह्यामुळे निर्माण होते. त्याचाच परिणाम म्हणजे विशिष्ट मनुष्य- समूहाशी—-राष्ट्रांकरूप होण्याची वृत्ती किंवा एका विशिष्ट मतप्रणालीशी किंवा श्रद्धाप्रणाली (ideology or religion) तादात्म्य पावण्याची वृत्ती. पुष्कळदा अशा प्रकारे एका श्रद्धाप्रणालीशी किंवा मानवसमूहाशी तादात्म्य पावणे वैचारिक शक्तीच्या, विवेकाच्या विरुद्ध असते. कारण विशिष्ट श्रद्धाप्रणालीशी वा समूहाशी तादात्म्य पावण्यास माणसाला आपल्या स्वतंत्र, चिकित्सक बुद्धीचा त्याग करावा लागतो. ह्या चिकित्सक बुद्धीच्या त्यागातूनच त्याची भावनिक, प्रक्षोभक वृनी बळावते, व ह्या भावना- प्राबल्यामुळे म्हणजेच समूहांशी, श्रद्धांगी, अवैचारिकपणे तादात्म्य पावल्याने युद्धे निर्माण होतात व मनुष्यसंहार होतो. अशा प्रकार आंधळ्या श्रद्धांमुळे युद्धे निर्माण झाल्याची अनेक ज्वलंत उदाहरणे इतिहासात आहेत. सर्व धार्मिक युद्धे यामधूनच उद्भवली. अत्याधुनिक काळात जर्मनीत हेच घडले. “आन्यंतिक राष्ट्रीयता मई युद्धांचे मूळ आहे” असे म्हटले जाते ते याचमुळे. माणसामध्ये जन्मजात असलेल्या आक्रमक किंवा युयुत्सु – प्रवृत्तीमुळे {aggressive instincत्) कलह व युद्धे होतात असा सर्वसाधारण समज आहे. पण तो चुकीचा आहे. त्याचप्रमाणे दुसन्या समूहाचा–राष्ट्राचा_प्रदेश मिळवण्यासाठी (territorial imperative) युद्धे होतात हाही समज चुकीचा आहे.
युद्धांच्या इतिहासाचे परिशोधन केल्यास आढळून येते की निवळ प्रदेश मिळवण्यासाठी ती झालेली नसून एखादा ‘सद्धर्म’ वाढविण्यासाठी, विचारप्रणाली प्रस्थापित करण्यासाठी किंवा तत्सम कारणासाठी ती झाली आहेत. सारांश, जन्मजात आक्रमकवृत्ती युद्धांच्या मुळाशी नसून एरवाद्या समूहाविषयी, राष्ट्रान्निषयी आत्यंतिक प्रेम त्याच्या मुळाशी आहे. गुरखादा प्रेमिक जमा प्रेमातिशयाने प्रेयसीसाठी प्राणार्पण करतो त्याप्रमाणे समूहप्रेमामुळे, श्रद्धाप्रेमामुळे मनुष्य त्या समूहासाठी व श्रद्धांसाठी प्राणार्पण करण्यास व संहार करण्यास प्रवृत्त होता. ही एक प्रकारची अवैयक्तिक (depersonalised) हिंसावृत्ती आहे.
मनुष्य प्रतीक निमिणारा प्राणी आहे (symbol-making anirmal) व ह्याच प्रतीकनिर्मितीची परिणती भाषेत झाली. भाषेमुळे जशी मनुष्याला विचार करण्याची व विचार – संवहनाची शक्ती प्राप्त झाली, तसेच त्यापासून एक संकटही निर्माण झाले. आपण नेहमी भाषेच्या शक्तीविषयी बोलतो. पण तिच्यापासून निर्माण झालेल्या संकटांचा विचार करीत नाही. एका मानवसमूहाला एकत्र आणण्याचे काम भाषा करते. पण दोन भाषिक गटांत भाषाच अड-पर बनते. सध्याच्या जगामध्ये लोक ३००० ते ४००० वेगवेगळ्या भाषिक गटांत विभागले गेले आहेत. भाषेच्या ह्या विभाजन करण्याच्या परिणामाशिवाय दुसराही एक विवातक परिणाम भाषेमुळे होतो. विशिष्ट मानवी समूहाच्या एकीकरणाबरोबरच अनेकविध भाषांमुळे संपूर्ण मानवजातीमध्ये अनुलंध्य अशा भिंतीही भाषेमुळेच उत्पन्न झाल्या. आपल्यापेक्षा वेगळी भाषा बोलणाच्या मानवसमूहाला आपण वेगळेच — परके — समजतो. त्यांच्यात खरे सौहार्द निर्माण होत नाही.
ह्याशिवाय भाषेमुळे काही अमूर्त संकल्पना (abstract concepts) तयार होतात व ह्या संकल्पनातून विशिष्ट श्रद्धाप्रणाली (belief systerms) उदयाला येतात. अशा अनेकविध श्रद्धाप्रणालींचा परस्परांशी संघर्ष होऊन कलह व युद्धे जन्माला येतात. मानवात आढळणाच्या वरील दोषापैकी एकही आपल्याला मानवेतर प्राण्यांमध्ये आढळत नाहीत.
मानवजातीतील वरील गुण त्याला अनन्यसाधारण स्थान देतात, पण तेच त्याच्या अनन्यसाधारण दुःखान्तिकेलाही कारणीभूत आहेत. हे सर्व गुण त्याच्या वंशपरंपरागत आढळणाच्या आनुवंशिक गुणांवरच आधारित असल्याने त्यांवर मानवाचा अधिकार चालत नाही. त्यासाठी हे मानवी वंशगुणच बदलले पाहिजेत हा एक उपाय. सध्या हे वंशगुण बदलण्याचे अनेक प्रयोग झाले आहेत व त्यांत बरेच याही आले आहे. अशा जीववैज्ञानिक प्रयोगांद्वारे मनुष्य आपल्यातील जैविक दोष काढू शकेल अशी आशा करू या.
स्वानंद, गणेश कॉलनी, अमरावती ४४४६२५.