ऑगस्ट ९० च्या अंकातील ‘धर्म की धर्मापलीकडे’ हा लेख वाचला. धर्म हा भीतीवर आधारित आहे असे लेखकाने म्हटले आहे. ‘सृष्टीच्या खर्याखुर्या ज्ञानाने भीतीचा समूळ नाश होणार आहे हे सर्वसामान्य लोकांना पटवून द्यावे लागेल’ असे विधान लेखकाने केले आहे. या विधानाला सबळ पुरावा लेखकाने लेखात कोठेही दिलेला नाही. हे विधान वस्तुस्थितीला धरून आहे असे वाटत नाही. सृष्टीच्या ज्ञानामुळे भीतीचा समूळ नाश होतो ही कल्पनाच चुकीची असल्यामळे ती सर्वसामान्यांना पटवून देता येणार नाही. हृदयरोगाबद्दल संपूर्ण ज्ञान असलेले डॉक्टर्ससुद्धा हृदयविकाराचा झटका आल्यानंतर भीतिग्रस्त होतात. भीती ही जीवसृष्टीतील नैसर्गिक स्वसंरक्षणात्मक उपजत प्रेरणा व स्वभाव (प्रोटेक्टिव्ह इन्स्टिंक्ट) आहे. व ती समूळ नष्ट होणे अशक्य! ..त्यामुळे भीतीवर आधारित धर्म पी समाजातून नाहीसा करणे शक्य नाही हे अघिाने आलेच…. लेखातील बरेचसे मुद्दे आशावादी व युटोपियन स्वरूपाचे वाटतात.
डॉ. आनन्द जोशी
३/३४ ज्ञानयोग, एस्. टी. रोड, बोरिवली (प), मुंबई,