खरे म्हटले तर चंद्रगुप्तापूर्वीच आमचा राष्ट्रचंद्र मावळला होता. असे म्हणण्यास हरकत नाही. दोन किंवा अडीच हजार वर्षांपूर्वी ज्या प्रकारच्या राज्यविचारांनी, धर्मविचारांनी व सामाजिक विचारांनी आम्ही निगडीत झालो होतो, व त्यावेळी ज्या आचारांचे आम्ही गुलाम होतो तेच विचार आणि तेच आचार अद्यापि आम्हास बहुधा आपल्या कह्यात ठेवीत नाही काय? कोणतीही सचेतन वस्तू बहुधा दोन हजार वर्षे टिकत नाही. पण टिकलीच तर तीत जमीनआस्मानाचे अंतर झाल्याखेरीज राहावयाचे नाही. पण आमच्या शोचनीय राष्ट्रस्थितीत गेल्या दोन हजार वर्षांत म्हणण्यासारखा फेरफार झाला आहे, असे बहुधा कोणाही विचारी पुरुपास म्हणता येणार नाही! येथे राहणार्या पाच कोटी लोकांच्या जागी दहा कोटी लोक झाले असतील, किंवा दहाचे जागी वीस कोटी झाले असतील, सिथियन लोकांनी आमची मानगुटी सोडली अरोल तर ती मुरालमानांनी धरती असेल, व मुसलमानांनी ती सोडली असेल, तर इंग्रजांनी धरली असेल; जेथे पूर्वी जमिनीचा एक बिधा लागवडीत होता तेथे आता कदाचित शंभर असतील; कधी मुसलमानांपुढे घट्ट तुमान आणि लांब अंगरखा घालून कोपरापासून सलाम करीत पळावे लागत असेल, तर कधी पाटलून व बूट चढवून आणि कोट घालून विलायतेच्या गोव्यांपुढे धावावे लागत असले; पूर्वी मर्जीविरुद्ध कर द्यावे लागत असेल, तर आता कदाचित ते कायद्याने द्यावे लागत असतील; पूर्वीचे राज्यकर्ते उघडउघड पक्षपात करीत असले तर अता कदाचित न्यायाच्या पांघरुणाआड करीत असतील — पण असल्या स्थित्यंतरास स्थित्यंतर : गावे किंवा नाही याचा आम्हारा बराच संशय आहे. अगदी अलिकडे लाख पन्नास हजार लोकांच्या आचारविचारांत जे अंतर पडले आहे ते सोडून द्या, ते पडू लागेतापर्यंत आमचा म्हणण्यासारखा काय फेरफार झाला होता, वे या घटकेस देखील सामान्य लोकांच्या स्थितीत म्हणण्यासारखा काय फरक पडला आहे हे आम्हांसं कोणी समजावून सांगेल तर आम्ही त्याचे मोठे आभारी होऊ.