सोलापूरकर अपरिचिता’चा पहिला प्रश्न असा आहे की ‘समाजात एकंदर सुधारणा हव्यात तरी कोणत्या?’ सुधारकाला असा प्रश्न करणे म्हणजे काय झाले असता तू ‘सुधारक या पदवीचा त्याग करण्यास तयार होशील, असे त्यात विचारण्यासारखेच आहे! यावर त्याचे उत्तर एवढेच आहे की, बालविवाहाचे नाव नाहीसे झाले, प्रत्येक स्त्रीस शिक्षण मिळू लागले, विधवावपन अगदी बंद झाले, स्त्रीपुनर्विवाह सर्वत्र रूढ झाला, व संमतिवयाच्या कायद्यासारखे अनेक कायदे पसार झाले, तरी त्याची तृप्ती होण्याचा संभव नाही! त्याच्या सुधारणावुभुक्षेस मर्यादाच नाही असे म्हटले तरी चालेल! ज्याप्रमाणे समुद्राला नद्यांचा, लोभ्याला द्रव्याचा, कर्णाला दानाचा व धमला शांतीचा कंटाळा कधी येत नाही किंवा आला नाही, त्याप्रमाणे खच्या सुधारकाला सुधारणेचा वीट येण्याचा कधीच संभव नाही…. सध्या आपल्या देशात ज्या सुधारणांची वाटाघाट चालली आहे त्या अमलात आल्यावर जातिभेद मोडणे, धर्मसुधारणा करणे, मदिरा व मांस यांचे सेवन बंद होणे वगैरे अनेक गोष्टींकडे लोकांचे लक्ष लागले पाहिजे. सर्वात सार्वजनिक शिक्षणाची फार आवश्यकता आहे. हिंदुस्थानातील एकूण एक प्रौढ स्त्रीपुरुपांस लिहितावाचता आले पाहिजे; तसेच प्रत्येक व्यक्तीस आपला चरितार्थ चालविण्यासारखा एखादा तरी धंदा येत असला पाहिजे. सारांश, वयात आलेल्या कोणत्याही व्यक्तीस आपल्या उदरनिर्वाहासाठी दुसन्याच्या तोंडाकडे पाहण्याची पाळी येऊ नये असे झाले पाहिजे, इतकेच नव्हे, तर सहजगत्या उदरपोपण करता येऊन दिवसाचा काही वेळ आत्मचिंतनाकडे, आवडत्या शास्त्राच्या अभ्यासाकडे, मनास रुचेल ती करमणूक करण्याकडे, किंवा विश्रांतीकडे लावता आला पाहिजे.