‘सर्वेऽपि सुखिनः सन्तु’मधील सुख ह्या शब्दाची व्याप्ती मोठी, त्यामुळे त्याचे मोजमापही अवघड. greatest good मध्ये ‘सुख’ ह्या शब्दाची छटा आहे. अधिकाधिक लोकांचे अधिकाधिक भले व्हावे, अर्थात अधिकाधिक लोक सुखी असावेत, हा तो भाव.
पण, ‘सर्वेऽपि’चा भाव greatest number मध्ये येऊ शकत नाही, त्यामुळे हे उद्दिष्ट बहुसंख्याकवादात अडकण्याची शक्यता जास्त. तसेच ह्यात सार्वकालिक भाव नसल्याने त्यात शाश्वत सुख अभिप्रेत आहे, की तात्कालिक, हादेखील संभ्रम.
जे असेल ते असो. दोन्हीं उद्दिष्ट्ये प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करावयाचा म्हटले तर आधी सुख म्हणजे नेमके काय असते ते निश्चित करावे लागेल.